तुर्कस्तानचा 100 टन आयात कांदा पिंपळगाव बसवंत इथं दाखल, कांदा उत्पादक शेतकरी आक्रमक
या कांद्याचा उग्र वास येत असून प्रतवारी ही खालवली असल्याचे व्यापारी सांगत आहे.
नाशिक : आशिया खंडातील अग्रसर कांद्याची दुसऱ्या क्रमांकावर असलेली बाजारपेठ पिंपळगाव बसवंत इथं तुर्कस्तानचा 100 टन तर 10 टन इजिप्तचा कांदा दाखल झाला आहे. तुर्कस्तानचा कांदा दाखल झाल्याने कांदा उत्पादक शेतकऱ्यांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. यामुळे महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक संघटनेकडून आयात करणाऱ्या व्यापाऱ्यांना स्थानिक कांदा न देण्याचा निर्णय घेत बहिष्कार घालण्यात आला आहे. तसंच केंद्र सरकारने आठ दिवसात कांदा आयात न थांबवल्यास थेट तीव्र आंदोलनाचाही इशारा दिला आहे. (Turkey imports 100 tonnes of onion to Lasalgaon onion growers aggressive)
अतिवृष्टीमुळे चाळीत साठवलेल्या कांदा सडल्याने मोठ्या प्रमाणात नुकसान झालं. अशात नवीन लाल कांद्याचं पीक वाया गेल्याने कांद्याचे बाजार भाव 8 हजार रुपयांवर गेले. केंद्र सरकारच्यावतीने कांद्याचे बाजार भाव नियंत्रणात आणण्यासाठी इजिप्त, इराण, इराक, तुर्कीस्तान इथून मोठ्या प्रमाणात कांदा आयात करण्यासाठी परवानगी दिल्याने नाशिकच्या पिंपळगाव बसवंत इथल्या एका आयातदार कांदा व्यापाऱ्याने शंभर टन कांदा आयात केला आहे.
या कांद्याचा उग्र वास येत असून प्रतवारी ही खालवली असल्याचे व्यापारी सांगत आहे. यामुळे स्थानिक कांद्याच्या बाजार भावावर कुठलाही परिणाम होणार नसल्याचे व्यापारी सांगत असले तरी सात दिवसात कांदा दाखल होण्याअगोदर 2200 रुपये प्रतिक्विंटल मागे बाजार भाव कोसळला अशी माहिती आयातदार कांदा व्यापारी सुजित दायमा यांनी दिली.
आज पिंपळगाव बसवंत इथं तुर्कस्तानचा 100 टन तर इजिप्तचा 10 टन कांदा दाखल झाल्याने महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक संघटना आक्रमक झाली आहे. व्यापाऱ्यांनी परदेशातील कांदा आयात करू नये आणि स्थानिक कांद्याला देशांतर्गत पाठवण्यासाठी खरेदी करण्याचे आव्हान केलं आहे. आयात करणाऱ्या कांदा व्यापार्याला एकही कांदा न देण्याचा निर्णय घेतला आहे. केंद्र सरकारने आठ दिवसात कांदा आयात न थांबल्यास तीव्र आंदोलन करण्याचा थेट इशारा दिला.
इतर बातम्या –
Onion Auctions | कांदा उत्पादकांना दिलासा, आजपासून महाराष्ट्रात कांदा लिलावाला सुरुवात
कांदा उत्पादक व्यापाऱ्यांची साठा मर्यादा चारपट वाढवा, चंद्रकांत पाटलांची केंद्राकडे मागणी
(Turkey imports 100 tonnes of onion to Lasalgaon onion growers aggressive)