AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘टीव्ही 9’ इम्पॅक्ट : एपीएमसीत हजारो कामगारांची कोरोना चाचणी, आणखी 59 जणांना लक्षणं

एपीएमसी मार्केट हे सध्या कोरोनाचं नवं हॉटस्पॉट बनलं आहे. येथील पाच बाजारपेठांमध्ये 48 कोरोना रुग्ण आढळून आले आहेत.

'टीव्ही 9' इम्पॅक्ट : एपीएमसीत हजारो कामगारांची कोरोना चाचणी, आणखी 59 जणांना लक्षणं
| Updated on: May 03, 2020 | 7:26 PM
Share

नवी मुंबई : मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीतील सर्व व्यापारी (APMC Market Corona Update), कामगार, कर्मचारी, माथाडी, मापाडी, वाहतूकदार, सुरक्षारक्षक यांची कोरोना तपासणी केली जात नव्हती. त्यामुळे एपीएमसी मार्केटमधील कोरोनाचे रुग्ण दिवसेंदिवस वाढत होते. याबाबतचे वृत्त ‘टीव्ही 9 मराठी’ने वारंवार दिलं. या बातमीची दखल घेत नगरविकास मंत्री एकनाथ शिंदेंनी कामगार आणि व्यापाऱ्यांची तपासणी करण्याच्या सूचना दिल्या. त्यानंतर आज जवळपास 5 हजार जणांची तपासणी (APMC Market Corona Update) करण्यात आली.

एपीएमसी मार्केटमधील भाजीपाला आणि फळ मार्केटमध्ये नवी मुंबई महापालिका, तेरणा आणि डी. व्हाय. पाटील रुग्णालयातील 30 वैद्यकीय टीमने जवळपास 4,500 ते 5,000 जणांची तपासणी केली. यामध्ये परप्रांतीय कामगार, एपीएमसी कर्मचारी, सुरक्षा कर्मचाऱ्यांची स्क्रिनिंग टेस्ट करण्यात आली. यामध्ये 59 जणांना कोरोनाची लक्षणं आढळून आल्याने त्यांचे स्वॅब नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत, अशी माहिती नवी मुंबई महानगरपालिकेच्या आरोग्य अधिकारी वंदना नारायणी यांनी दिली.

एपीएमसी कोरोनाचं नवं हॉटस्पॉट, 48 जणांना संसर्ग

एपीएमसी मार्केट हे सध्या कोरोनाचं नवं हॉटस्पॉट बनलं आहे. येथील पाच बाजारपेठांमध्ये 48 कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे प्रशासनाची चिंता वाढली आहे. शासनाच्या आदेशामुळे या बाजारपेठेतील पाचही घाऊक बाजार सुरु आहेत. दोन आठवड्यांपूर्वी फळ बाजार सुरु करण्यात आला. एपीएमसीने काही प्रतिबंधात्मक उपाययोजना करुन हे बाजार खुले (APMC Market Corona Update) केले.

एपीएमसीमधील एका व्यापाऱ्याला आणि एका सुरक्षारक्षकाला कोरोनाची लागण झाली होती. ही बातमी उघड होताच बाजारातील सर्वांचे धाबे दणाणले. कारण तो व्यापारी अनेक व्यापारी, अधिकारी, ग्राहकांच्या संपर्कात आला होता. त्यानंतर एपीएमसी मार्केटमधील तब्बल 48 जणांना आतापर्यंत कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलं आहे. त्यामुळे व्यापारी, कर्मचारी, कामगार, माथाडी, मापाडी आणि वाहतूकदारांमध्ये भीती पसरलेली आहे.

याच पार्श्वभूमीवर बाजारातील सर्वांती कोरोना चाचणी करण्यास आता सुरुवात झाली आहे. रविवारी बाजार बंद असल्याने भाजीपाला आणि फळ बाजारात प्रत्येक विंगमध्ये सोशल डिस्टन्स ठेवून कोरोनाची चाचणी करण्यात आली. सर्वांची टप्प्याटप्प्याने तपासणी केली जाणार असल्याची माहिती एपीएमसीचे प्रशासक आणि सचिव अनिल चव्हाण यांनी दिली. एपीएमसीतील धान्य, मसाला, कांदा, भाजी आणि फळ या पाचही बाजारांतील घटकांची तपासणी होणार असून या रोगाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी तपासण्या महत्त्वाच्या असल्याचे माथाडी नेते नरेंद्र पाटील यांनी सांगितले.

एपाएमसीत परप्रांतीय कामगारांना आश्रय

आशिया खंडातील सर्वात मोठी बाजारपेठ असलेल्या मुंबई एपीएमसीच्या फळे आणि भाजीपाला मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणात परप्रांतीय कामगार वास्तव्यास आहेत. येथे राहणाऱ्या हजारो कामगारांना आणि व्यापाऱ्यांची कुठल्याही प्रकारची कोरोना चाचणी करण्यात आलेली नव्हती. त्यामुळे येथील परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं.

धक्कादायक बाब म्हणजे, व्यापाऱ्यांनी भाजीपाला आणि फळ बाजारातील त्यांच्या कार्यालयात आणि गाळ्यांमध्ये परप्रांतीय कामगारांना आश्रय दिला आहे. या कामगारांकडे माथाडी बोर्ड किंवा बाजार समितीचे कुठलेही ओळखपत्र नाही आणि ज्या व्यापाऱ्याकडे हे कामगार काम करतात त्यांच्याकडे त्यांची नोंदही नाही. बिंधास्तपणे कामगार मार्केटमध्ये वास्तव्य करत असून मुक्तपणे फिरत होते. त्यामुळे बाजार आवरात समुह संसर्ग होण्याची दाट शक्यता आहे. आज भाजीपला आणि फळ बाजारात कामगारांची कोरोना चाचणी (APMC Market Corona Update) झाल्याने कामगारांना थोडाफार का होईना दिलासा मिळाला आहे.

संबंधित बातम्या :

Lockdown : लॉकडाऊनमध्ये राज्यात 91 हजार गुन्हे, 3 कोटी 25 लाखांचा दंड

राजकारण बाजूला ठेवा, राष्ट्रीय मुद्दा समजून निर्णय घ्या, IFSC वरुन पवारांचं मोदींना खरमरीत पत्र

महाराष्ट्रात दारुची दुकानं उघडणार, पण नियम काय?

Lockdown : सहा दिवस पायपीट करुन परतलेल्या मजुरांना जंगलात क्वारंटाईन, वाशिममधील ग्रामपंचायतचा प्रताप

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.