AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Maharashtra Breaking News LIVE 12 March 2025 : प्रो गोविंदासंदर्भात एकनाथ शिंदे यांच्या दालनात बैठकीला सुरुवात

| Updated on: Mar 31, 2025 | 6:21 PM

Maharashtra Political News LIVE in Marathi : आज 12 मार्च 2025. देश, विदेश, राज्य पातळीवरील राजकीय, सामाजिक, आर्थिक, गुन्हेगारी क्षेत्र, क्रीडा अन् मनोरंजन क्षेत्रातील महत्वाच्या घडामोडी जाणून घ्या. तुमच्या जिल्ह्यातील, तुमच्या गावातील बातमी तुम्हाला इथे वाचायला मिळेल.

Maharashtra Breaking News LIVE 12 March 2025 : प्रो गोविंदासंदर्भात एकनाथ शिंदे यांच्या दालनात बैठकीला सुरुवात
live breaking

सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाची आज पहिलीच सुनावणी आहे. आज केज न्यायालयात होणाऱ्या सुनावणीला देशमुख कुटुंबातील संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख उपस्थित राहणार. सकाळी 11 ते साडे अकरा वाजता केज न्यायालयात ही सुनावणी पार पडणार आहे. कुठल्या कलमान्वये खटला चालवायचा याबाबत या सुनावणी दरम्यान न्यायालयामध्ये चार्ज फ्रेम करण्यात येणार असल्याची माहिती. पुण्यात सिंहगड रस्त्यावरील नांदेड गाव परिसरात जीबीएसचे सर्वाधिक रुग्ण आढळून आले होते. पुण्यातील जीबीएस उद्रेकग्रस्त भागात 18 फेब्रुवारीपासून एकही नवीन रुग्ण आढळून आलेला नाही. जीबीएसबाबत राज्य सरकारने नेमलेल्या शीघ्र प्रतिसाद पथकाची नुकतीच बैठक झाली. या बैठकीत पुण्यातील जीबीएस उद्रेकाच्या स्थितीवर चर्चा झाली. उद्रेकग्रस्त भागात नवीन रुग्ण आढळले नसल्याची बाब या बैठकीत अधोरेखित करण्यात आली.

LIVE NEWS & UPDATES

The liveblog has ended.
  • 12 Mar 2025 05:55 PM (IST)

    माझ्या कामासाठी जनतेने मला बक्षीस दिले: मंत्री अनिल विज

    अंबाला येथील हरियाणा सरकारचे मंत्री अनिल विज म्हणाले, “अंबाला कॅन्टोन्मेंट नगरपरिषदेच्या निवडणुकीत भाजपने ३२ पैकी २५ जागा जिंकल्या आहेत. अंबाला कॅन्टोन्मेंटच्या लोकांनी माझ्या कामासाठी मला बक्षीस दिले. हरियाणातील बहुतेक ठिकाणी पक्षाने आपला झेंडा फडकवला आहे. यावरून हे सिद्ध होते की हरियाणामधून विरोधी पक्षांचा नाश झाला आहे.

  • 12 Mar 2025 05:50 PM (IST)

    पंतप्रधान मोदी पोर्ट लुईसहून रवाना

    मॉरिशसच्या दोन दिवसांच्या दौऱ्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी पोर्ट लुईसहून मायदेशी परतण्यासाठी रवाना झाले.

  • 12 Mar 2025 05:29 PM (IST)

    मुख्यमंत्री ममता व्याख्यान देण्यासाठी ऑक्सफर्डला जाणार

    पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना ऑक्सफर्ड विद्यापीठात व्याख्यान देण्यासाठी भारत सरकारकडून अधिकृत परवानगी मिळाली आहे.

  • 12 Mar 2025 05:17 PM (IST)

    जाफर एक्सप्रेस: 190 प्रवाशांची सुटका, 30 दहशतवादी ठार

    पाकिस्तानमध्ये अपहरण झालेल्या जाफर एक्सप्रेस ट्रेनमध्ये बचाव कार्य सुरू आहे. आतापर्यंत 190 प्रवाशांना वाचवण्यात आले आहे तर बलुचिस्तान लिबरेशन आर्मी (बीएलए) चे 30 दहशतवादी मारले गेले आहेत. बीएलए दहशतवादाविरुद्ध सुरू असलेल्या कारवाईदरम्यान सुरक्षा दलांनी एक्सप्रेसमधून 190 प्रवाशांना यशस्वीरित्या वाचवले आहे. सुरक्षा दलांनी धोक्याचे निष्प्रभीकरण करण्यासाठी आणि प्रवाशांची सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी त्यांचे प्रयत्न सुरू ठेवल्याने आतापर्यंत 30 दहशतवादी मारले गेले आहेत.

  • 12 Mar 2025 04:57 PM (IST)

    प्रो गोविंदासंदर्भात एकनाथ शिंदे यांच्या दालनात बैठकीला सुरुवात

    प्रो गोविंदासंदर्भात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दालनात बैठकीला सुरुवात झाली आहे. प्रताप सरनाईक यांची एकनाथ शिंदे यांच्या दालनात बैठक सुरू झाली आहे. प्रो गोविंदाच्या मानधनाबाबत आज महत्वाचा निर्णय होणार असल्याची माहिती आहे. त्यामुळे या बैठकीकडे साऱ्यांचं लक्ष लागून आहे.

  • 12 Mar 2025 04:44 PM (IST)

    धनंजय मुंडेंचं मंत्रिपद दादा स्वत:कडेच ठेवणार, सूत्रांची माहिती

    राजकीय वर्तुळातून मोठी बातमी समोर आली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार त्यांच्या पक्षातील सहकारी धनंजय मुंडें यांच्याकडे असलेलं मंत्रिपद स्वत:कडेच ठेवणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. दादा अन्न-नागरी पुरवठा मंत्रालय स्वत:कडेच ठेवणार असल्याचं समजत आहे. पक्षांतर्गत वाद वाढू नयेत यासाठी ही खेळी असल्याचं म्हटलं जात आहे. धनंजय मुंडे यांनी बीड प्रकरणावरुन मंत्रि‍पदाचा राजीनामा दिला आहे.

  • 12 Mar 2025 04:13 PM (IST)

    स्वारगेट बलात्कार प्रकरणातील आरोपी दत्ता गाडेबाबत मोठी अपडेट

    स्वारगेट बलात्कार प्रकरणातील आरोपी दत्ता गाडेबाबत मोठी अपडेट आली आहे. दत्ता गाडेची येरवडा कारागृहात रवानगी करण्यात आली आहे. दत्ता गाडेची पोलीस कोठडी संपली. त्यानंतर पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने आज दत्ता गाडेला न्यायालयात हजर केले होते. यावेळी दत्ता गाडेला न्यायालयाने 26 मार्चपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.

  • 12 Mar 2025 03:46 PM (IST)

    मनसेच्या गोंधळानंतर एअरटेलच्या महिला कर्मचाऱ्याने मागितली माफी

    चारकोप येथील एअरटेल गॅलरीच्या एका महिला कर्मचाऱ्याने एका मराठी तरुणाशी मराठीत बोलण्यास नकार दिला होता. त्यानंतर काल मनसे विभागप्रमुख दिनेश साळवी यांनी महिला कार्यकर्त्यांसह गॅलरीत जाऊन धरणे आंदोलन केले होते.  एअरटेलच्या महिला कर्मचाऱ्याने मनसेने केलेल्या गोंधळा नंतर एका व्हिडिओद्वारे मनसे कार्यकर्त्यांची जाहीरपणे माफी मागितली आहे.

  • 12 Mar 2025 03:34 PM (IST)

    शक्तिपीठ महामार्गविरोध आंदोलन शेतकऱ्यांनी थांबवलं…

    मुंबईतील आझाद मैदानावर शक्तिपीठ महामार्गाला विरोध करण्यासाठी १२ जिल्ह्यातील हजारो शेतकऱ्यांनी आंदोलन केलेल्या आंदोलनास विरोधी पक्षातील अनेक नेत्यांनी समर्थन दिलं.  एक दिवसाचं हे आंदोलन शेतकऱ्यांनी आता थांबवलेलं आहे, मात्र शक्तिपीठ महामार्गाला शेतकऱ्यांचा कायमच विरोध असेल अशी शेतकऱ्यांची भूमिका आहे हे आंदोलन आता प्रत्येक जिल्ह्यामध्ये शेतकरी करणार आहेत.

  • 12 Mar 2025 03:11 PM (IST)

    प्रशांत कोरटकरला 17 मार्चपर्यंत अटकेपासून दिलासा

    प्रशांत कोरटकरला 17 मार्चपर्यंत अटकेपासून दिलासा मिळाला आहे. इंद्रजित सावंत यांना धमकी दिल्याप्रकरणी आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या संदर्भात अवमानजनक वक्तव्य केल्याप्रकरणी प्रशांत कोरटकरविरोधात अनेक गुन्हे दाखल करण्यात आले होते. त्यांच्या अटकेची मागणीही करण्यात आली होती. आता 17 मार्चला यासंदर्भात कोल्हापूर सत्र न्यायलयात सुनावणी होणार आहे.

  • 12 Mar 2025 03:08 PM (IST)

    बीडमधील पाणी प्रश्न गंभीर, लक्ष घालणं गरजेचं – संदीप क्षीरसागर

    बीडमधील पाणी प्रश्न गंभीर, लक्ष घालणं गरजेचं आहे. पाणी असूनही बीडमध्ये 20-21 दिवसांनी पाणी येतं – संदीप क्षीरसागर

  • 12 Mar 2025 02:56 PM (IST)

    गजा मारणे याची सांगली कारागृहात रवानगी

    मोक्का अंतर्गत कारवाई झालेला पुण्याचा कुख्यात गुंड गजा मारणे याची सांगली कारागृहात रवानगी झाली आहे.

  • 12 Mar 2025 02:36 PM (IST)

    जालना महानगर पालिकेसमोर भटक्या कुत्र्यांविरोधात आंदोलन

    जालना शहरात नागरिकांना भटक्या कुत्र्यांनी चावा घेतल्याच्या घटना घडल्या आहेत. याचा निषेध म्हणून ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख भास्कर आंबेकर यांच्या नेतृत्वाखाली आज जालना शहर महानगरपालिकेच्या समोर आंदोलन करण्यात आले.

  • 12 Mar 2025 02:24 PM (IST)

    जळगावात राखेने भरलेले वाहन RTO च्या ताब्यातून पळवून नेले

    जळगावात आरटीओ विभागाने जप्त केलेले राखेने भरलेले वाहन आरटीओ कार्यालयातून पळवून नेल्याची घटना उघडकीस आली आहे.

  • 12 Mar 2025 01:42 PM (IST)

    संतोष देशमुख हत्या प्रकरणातील पुढील सुनावणी 26 मार्चला; सरकारी वकिलांची महत्त्वाची माहिती

    संतोष देशमुख हत्या प्रकरणातील पुढील सुनावणी 26 मार्च होणार आहे. सरकारी वकील बाळासाहेब कोल्हे यांनी याबाबतची माहिती दिली आहे. सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात आज केज जिल्हा आणि सत्र न्यायालयात पहिली सुनावणी पार पडली. या सुनावणीला संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख देखील न्यायालयात उपस्थित होते. या खटल्याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले असून, आरोपींवरील कारवाई कशी होईल, यावर पुढील न्यायप्रक्रिया अवलंबून असेल. बीडच्या मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात केज जिल्हा आणि सत्र न्यायालयात झालेल्या पहिल्या सुनावणीदरम्यान सर्व आरोपींना सुरक्षेच्या कारणास्तव व्हिडिओ कॉन्फरन्सिंग (VC) द्वारे हजर करण्यात आले.

    आतापर्यंत कोर्टात आरोपीच्या वकिलांनी विविध कागद पत्राची मागणी केली आहे तसेच त्यांना पुढील तारखेला ही सर्व कागजपत्र जमा करण्याबाबत सांगण्यात आले आहे. आज आरोपींवर चार्जेस लावण्यात आले नसले तरी ते पुढील तारखेच्या सुनावनीत होणार असल्याचंही ते म्हणाले. पुढील सुनावनीवेळी ऍड. उज्जल निकम हे स्वतः उपस्थित राहणार असल्याचंही सांगितलं जात आहे.

  • 12 Mar 2025 01:24 PM (IST)

    सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेत 14 कोटी 72 लाखांच्या जुन्या नोटा धुळखात

    सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेकडे तब्बल 14 कोटी 72 लाख रुपयांच्या जुन्या नोटा शिल्लक असल्याची बाब समोर आली आहे. नोटा बंदीनंतर 500 आणि एक हजारच्या जुन्या नोटा बँकेत धूळखात पडून आहेत. रिझर्व्ह बँकेकडे नोटा जमा करण्याबाबत जिल्हा मध्यवर्ती बँकेकडून वारंवार पाठपुरावा करण्यात आला होता. या जुन्या नोटांच्या बाबतीत जिल्हा मध्यवर्ती बँकेकडून सर्वोच्च न्यायालयासोबतच केंद्रीय अर्थ सचिवांकडे देखील दावा दाखल करण्यात आला आहे, मात्र अद्याप सुनावणी पूर्ण झाली नाही. दिलेल्या मुदतीत पैसे जमा केले नसल्याने या जुन्या नोटा रिझर्व बँकेकडून जमा करून घेण्यात आलेल्याच नाहीत. त्यामुळे आता तब्बल 14 कोटी 72 लाखांची ही रक्कम बॅंकेत चक्क धुळखात पडलेली आहे .

  • 12 Mar 2025 01:05 PM (IST)

    लाडक्या बहिणींच्या पश्नावरून विरोधकांचा सभात्याग; विरोधकांकडून सरकारवर प्रश्नांचा भडीमार

    लाडक्या बहिणींच्या पश्नावर विरोधकांनी सभात्याग केला आहे. विरोधकांनी लाडक्या बहिणींना मिळणाऱ्या पैशांच्या आकड्यांवरून प्रश्न उपस्थित केला. निवडणुकीनंतर किती लाडक्या बहिणींना अपात्र करण्यात आलं असा सवाल विधान परिषदेतठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार वरुण सरदेसाईंनी उपस्थित केला. तर, लाडक्या बहिणीला 2100 रुपये देणार आहात का? असा सवाल रोहित पवार यांनी उपस्थित केला. बनवाबनवी करून लाडजक्या बहिणीला विसरले का?असा खोचक सवालही विरोधकांकडून सरकारला विचारण्यात आला आहे.

  • 12 Mar 2025 12:52 PM (IST)

    शक्तीपीठ महामार्गाची काही आवश्यकता नाही, विधानभवनात मुद्दा मांडणार- अंबादास दानवे

    “शक्तीपीठ महामार्गाची काही आवश्यकता नाही. एकनाथ शिंदे यांनी निवडणुकीपूर्वी शक्तीपीठ महामार्ग होणार नाही असं वक्तव्य केलं होतं. मात्र निवडणुकीच्या नंतर हे वेगळंच बोलत आहेत. बाकीचे मार्ग असताना शक्तीपीठ महामार्गाची काय आवश्यकता आहे? आहे ते रस्ते दुरुस्त करण्याची आवश्यकता आहे. विधानभवनात आम्ही हा मुद्दा मांडणार आहोत,” असं विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे म्हणाले.

  • 12 Mar 2025 12:42 PM (IST)

    स्वारगेट बलात्कार प्रकरणी सरकारी वकील म्हणून अजय मिसर यांच्या नावाचा प्रस्ताव

    स्वारगेट बलात्कार प्रकरणी सरकारी वकील म्हणून अजय मिसर यांच्या नावाचा प्रस्ताव सरकारकडे दाखल करण्यात आला. पुणे पोलिसांनी अजय मिसर यांच्या नावाचा प्रस्ताव पाठवला आहे. दरम्यान अजय मिसर यांच्या नावावर अद्याप निर्णय नाही. मात्र पीडित तरुणीकडून सरकारी वकील म्हणून असीम सरोदे देण्याची मागणी करण्यात आली आहे. मात्र पीडित तरुणीने अर्ज देण्यास उशीर केल्याचं पुणे पोलिसांकडून स्पष्टीकरण देण्यात आलं.

  • 12 Mar 2025 12:35 PM (IST)

    बीड- संतोष देशमुख खून प्रकरणी खटल्याची आजची सुनावणी संपली

    बीड- संतोष देशमुख खून प्रकरणी खटल्याची आजची सुनावणी संपली असून पुढील सुनावणी येत्या 26 मार्च रोजी होणार आहे. सीआयडीचे तपास अधिकारी अनिल गुजर सुनावणी दरम्यान गैरहजर होते. आरोपींना VC द्वारे न्यायालयासमोर हजर करण्यात आलं. आरोपीच्या वकिलांनी आरोपी आणि फिर्यादींच्या जबाबाच्या कॉपी देण्यासाठी कोर्टाकडे वेळ मागितला. सरकारी वकिलांनी यासाठी 26 तारखेची वेळ मागितली.

  • 12 Mar 2025 12:16 PM (IST)

    बीड : सतीश भोसले उर्फ खोक्या याचा जामीन अर्ज वकिलाने मागे घेतला

    बीड : सतीश भोसले उर्फ खोक्या याचा जामीन अर्ज वकिलाने मागे घेतला. खोक्याला पोलिसांनी अटक केल्यामुळे अर्ज मागे घेतला. ज्यावेळी बीड पोलीस बीड कोर्टामध्ये सादर करतील, त्यावेळेस पुन्हा नव्याने अर्ज केला जाणार असल्याची माहिती खोक्याचे वकील शशिकांत सावंत यांनी दिली.

  • 12 Mar 2025 12:07 PM (IST)

    संतोष देशमुख प्रकरणातील आरोपी व्हीसीद्वारे कोर्टासमोर हजार

    संतोष देशमुख प्रकरणातील आरोपी व्हीसीद्वारे कोर्टासमोर हजार राहिले. आरोपींची व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे ओळख परेड झाली. सुनावणीला ऑनलाइन पद्धतीने वाल्मिक कराड आणि इतर आरोपी हजर राहिले.

  • 12 Mar 2025 11:50 AM (IST)

    मास्क लावलेला कृष्णा आंधळे?

    फरार आरोपी कृष्णा आंधळे हा नाशिकमध्ये पुन्हा दिसल्याचा दावा करण्यात येत आहे. स्थानिक रहिवाशींना हा दावा केला आहे. दरम्यान या परिसरात पोलीस तपास करत आहेत.

  • 12 Mar 2025 11:40 AM (IST)

    खोक्या भोसलेला अटक ही चांगली गोष्ट

    खोक्या भोसले गेल्या काही दिवसांपासून फरार होता. त्याला प्रयागराज येथून अटक करण्यात आली. त्याला अटक झाली ही चांगली गोष्ट झाल्याची प्रतिक्रिया आमदार सुरेश धस यांनी दिली. खोक्या हा त्यांचा कार्यकर्ता असल्याचे त्यांनी अगोदरच मान्य केले आहे.

  • 12 Mar 2025 11:30 AM (IST)

    पंकजा मुंडेंच्या दौऱ्याला का केला विरोध

    पंकजा मुंडे यांनी मला भेटायला येण्यासाठी फोन केला होता परंतु या ठिकाणी कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला असता, म्हणून त्यांना मस्साजोग येथे येण्यास विरोध केल्याचे धनंजय देशमुख म्हणाले.

  • 12 Mar 2025 11:20 AM (IST)

    ठाणे जिल्ह्यातील १४ गावांचा फुटबॉल?

    जनता दरबारनंतर 14 गावांच्या समावेशावरून भाजप आणि शिवसेना शिंदे गटात मतभेद दिसून आले. भाजप-शिंदे गट आमने-सामने आला आहे. 14 गावांचा समावेश नवी मुंबई महापालिकेत नको असे पत्र वनमंत्री गणेश नाईक यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांना पाठवले आहे.

  • 12 Mar 2025 11:10 AM (IST)

    औरंग्याचे स्टेटस ठेवणाऱ्यांच्या मुस्क्या आवळा, नांग्या ठेचा

    औरंग्याचे स्टेटस ठेवणाऱ्यांच्या मुस्क्या आवळा, नांग्या ठेचा अशी मागणी अक्कलकोटचे भाजप आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी विधानसभेत केली. औरंगजेबाचे स्टेटस ठेवणाऱ्यांच्या विरोधात आमदार सचिन कल्याणशेट्टी विधानसभेत आक्रमक दिसले.

  • 12 Mar 2025 11:00 AM (IST)

    मी लढत राहणार

    संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांना फाशीची शिक्षा होत नाही, तोपर्यंत लढणार असल्याचे आमदार सुरेश धस यांनी सांगितले. त्यांनी पंकजा मुंडे या संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांना भेटायला गेल्या नाहीत, असे धस म्हणाले.

  • 12 Mar 2025 10:56 AM (IST)

    Maharashtra News: खोक्या भोसलेला अटक

    खोक्या भोसलेला अटक करण्यात आली आहे.. धसांचा कार्यकर्ता खोक्या भोसलेला अटक झाली आहे. यूपीतील प्रयागराजमधून खोक्या भोसलेला अटक…

  • 12 Mar 2025 10:40 AM (IST)

    Maharashtra News: सिंधुदुर्ग आणि पालघर जिल्ह्यातील समुद्रात तेलाचे साठे सापडले…

    सिंधुदुर्ग आणि पालघर जिल्ह्यातील समुद्रात तेलाचे साठे सापडले… पालघरमध्ये 18 चौरस किलोमीटर क्षेत्रफळावर तेलसाठे… मालवणमध्ये 19 हजार क्षेत्रफळावर तेलसाठे असल्याची माहिती… अरबी समुद्रात 8 वर्षांच्या कालावधीनंतर नवा तेलसाठा सापडला आहे…

  • 12 Mar 2025 10:30 AM (IST)

    Maharashtra News: जेजुरीच्या मार्तंड देवस्थानाकडून मंत्री नितेश राणेंना पत्र

    जेजुरीच्या मार्तंड देवस्थानाकडून मंत्री नितेश राणेंना पत्र… ‘मल्हार सर्टिफिकेट’ या योजनेच्या नावाला देवस्थानाचा विरोध…

  • 12 Mar 2025 10:12 AM (IST)

    Maharashtra News: विरारमध्ये बविआ आणि भाजप पदाधिकाऱ्यांमध्ये बाचाबाची

    विरारमध्ये बविआ आणि भाजप पदाधिकाऱ्यांमध्ये बाचाबाची… विकासकामाच्या श्रेयवादावरुन रस्त्यातच बाचाबाती झाल्याचा प्रकार…

  • 12 Mar 2025 09:55 AM (IST)

    नांदेडमध्ये आयसीयूमध्ये झुरळ

    नांदेडच्या शासकीय रुग्णालयात धक्कादायक प्रकार समोर आला आहे. लहान मुलांच्या आयसीयूमध्ये झुरळ आढळले आहे. आयसीयूमधील व्हिडियो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

  • 12 Mar 2025 09:45 AM (IST)

    देशात पुन्हा फाळणीचे बीजे रोवण्याचा प्रयत्न- संजय राऊत

    देशात पुन्हा फाळणीचे बीजे रोवण्याचा प्रयत्न सुरु आहे. मोदींची पिलावळीला आवरावे, यासंदर्भात आपण नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिणार आहे, असे संजय राऊत यांनी म्हटले आहे.

  • 12 Mar 2025 09:24 AM (IST)

    शक्तीपीठ महामार्गाच्या विरोधासाठी आंदोलन

    शक्तीपीठ महामार्गाला विरोध करण्यासाठी मुंबईतील आझाद मैदानावर १२ जिल्ह्यातील हजारो शेतकरी आंदोलन करत आहे. ते आपल्या बायका मुलांसह आंदोलनात सहभागी होत आहेत. या मार्गामुळे हजारो शेतकऱ्यांच्या जमिनी जाऊन ते भूमिहीन होणार आहेत. त्यामुळे हा महामार्ग रद्द झालाच पाहिजे. अशी भूमिका आंदोलनकर्त्यांची आहे.

  • 12 Mar 2025 09:03 AM (IST)

    सतीश भोसलेच्या अटकपूर्व जामिनावर आज सुनावणी

    सतीश भोसले उर्फ खोक्या भाई मागील सहा दिवसांपासून फरार आहे. मागील आठवडाभरामध्ये त्याच्यावर तिसरा गुन्हा दाखल झाल्यानंतर त्याच्या जामिनासाठी अडचण येऊ शकते. बीडच्या जिल्हा सत्र न्यायालयात त्याच्या जामीन अर्जावर आज सुनावणी होत आहे. त्यामुळे त्याच्या अडचणीत निश्चित वाढ होण्याची शक्यता आहे.

  • 12 Mar 2025 08:59 AM (IST)

    स्वारगेट बस स्थानकातील अत्यंत धक्कादायक प्रकार

    स्वारगेट बलात्कार प्रकरण ताजे असताना स्वारगेट बस स्टँडवर मध्यरात्री वीज नाही. स्वारगेट डेपो प्रशासनाचा भोंगळ कारभार समोर.स्वारगेट बस स्थानकातील वीज मध्यरात्री गायब. स्वारगेट डेपो प्रशासन मात्र झोपलेलं.

  • 12 Mar 2025 08:18 AM (IST)

    प्रश्न सोडवणं आमचं काम – अजित पवार

    “प्रश्न सोडवणं आमचं काम आहे. त्यासाठी लोकांनी निवडून दिलेलं आहे. त्यात कुठलाही हलगर्जीपणा केला जाणार नाही. कायदा-सुव्यवस्था अडचणीत येईल अशी विधानं करु नयेत. राज्यात जातीय सलोखा निर्माण करण्याचा प्रयत्न. दोन्ही बाजूच्या नेत्यांनी आधी बोलताना विचार करावा” असं उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले.

  • 12 Mar 2025 08:14 AM (IST)

    सगळ्या बाबी विचारात घेऊन अर्थसंकल्प मांडला – अजित पवार

    यशवंतराव चव्हाण यांची आज 112 वी जयंती. “सुसंस्कृत महाराष्ट्राची शिकवण यशवंतराव चव्हाण यांनी दिली. यशवंतराव चव्हाणांची शिकवण पुढे नेण्याचा प्रयत्न. यशवंतराव चव्हाणांची विचारधार कधीही सोडणार नाही. सगळ्या बाबी विचारात घेऊन अर्थसंकल्प मांडला” असं उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले.

  • 12 Mar 2025 08:11 AM (IST)

    सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाची आज पहिलीच सुनावणी

    आज केज न्यायालयात होणाऱ्या सुनावणीला देशमुख कुटुंबातील संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख उपस्थित राहणार. सकाळी 11 ते साडे अकरा वाजता केज न्यायालयात ही सुनावणी पार पडणार आहे. कुठल्या कलमान्वये खटला चालवायचा याबाबत या सुनावणी दरम्यान न्यायालयामध्ये चार्ज फ्रेम करण्यात येणार असल्याची माहिती. या प्रकरणातील आरोपींना vc द्वारे हजर करण्यात येण्याची शक्यता. कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न पाहता व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे आरोपींना न्यायालयात हजर करण्यात येणार असल्याची सूत्रांची माहिती.

Published On - Mar 12,2025 8:09 AM

Follow us
पाकचा ड्रोन हल्ला उधळला, ड्रोनचे भाग छतावर; घराचं नुकसान...व्हिडीओ बघा
पाकचा ड्रोन हल्ला उधळला, ड्रोनचे भाग छतावर; घराचं नुकसान...व्हिडीओ बघा.
वर्षभराच्या चिमूकल्याला घरी सोडून आई सीमेवर रवाना
वर्षभराच्या चिमूकल्याला घरी सोडून आई सीमेवर रवाना.
CSMTला क्लिनिंग मशीन ट्रॅकवर अन् मोटारमॅनने जागीच थांबवली ट्रेन...
CSMTला क्लिनिंग मशीन ट्रॅकवर अन् मोटारमॅनने जागीच थांबवली ट्रेन....
पंतप्रधान मोदी थेट आदमपूर एअर बेसवर पोहोचले, त्यानंतर..
पंतप्रधान मोदी थेट आदमपूर एअर बेसवर पोहोचले, त्यानंतर...
भारताकडे आता रशियाची S-500 मिसाईल सिस्टीम, S-400 पेक्षा खतरनाक
भारताकडे आता रशियाची S-500 मिसाईल सिस्टीम, S-400 पेक्षा खतरनाक.
...तर ते अ‍ॅक्ट ऑफ वॉर, सिंधू जल करारावरुन पाक मंत्री पुन्हा बरळला
...तर ते अ‍ॅक्ट ऑफ वॉर, सिंधू जल करारावरुन पाक मंत्री पुन्हा बरळला.
अवकाळीचा फटका; भाज्यांच्या दराने गाठली शंभरी, गृहीणींचं बजेट कोलडलं
अवकाळीचा फटका; भाज्यांच्या दराने गाठली शंभरी, गृहीणींचं बजेट कोलडलं.
गैरप्रकार झालेल्या परीक्षा केंद्राची मान्यता रद्द होणार
गैरप्रकार झालेल्या परीक्षा केंद्राची मान्यता रद्द होणार.
तीन दिवस सतर्कतेचे; राज्यात बॉम्बब्लास्टची धमकी
तीन दिवस सतर्कतेचे; राज्यात बॉम्बब्लास्टची धमकी.
प्रलंबित मागण्यांसाठी आशा सेविकांचा 20 मेपासून बेमुदत संप
प्रलंबित मागण्यांसाठी आशा सेविकांचा 20 मेपासून बेमुदत संप.