Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Maharashtra Breaking News LIVE 26th March 2025 : विधानसभेतील वीजपुरवठा खंडीत, कामकाज सुरु असताना अचानक बत्तीगुल

| Updated on: Mar 26, 2025 | 4:15 PM

Maharashtra Political News LIVE in Marathi : आज 26 मार्च 2025. देश, विदेश, राज्य पातळीवरील राजकीय, सामाजिक, आर्थिक, गुन्हेगारी क्षेत्र, क्रीडा अन् मनोरंजन क्षेत्रातील महत्वाच्या घडामोडी जाणून घ्या. तुमच्या जिल्ह्यातील, तुमच्या गावातील बातमी तुम्हाला इथे वाचायला मिळेल.

Maharashtra Breaking News LIVE 26th March 2025 : विधानसभेतील वीजपुरवठा खंडीत, कामकाज सुरु असताना अचानक बत्तीगुल

LIVE NEWS & UPDATES

  • 26 Mar 2025 04:15 PM (IST)

    विधानसभेतील वीजपुरवठा खंडीत, कामकाज सुरु असताना अचानक बत्तीगुल

    विधानसभेतील वीजपुरवठा खंडीत झाला आहे. कामकाज सुरु असताना अचानक बत्तीगुल झाल्याने विधानसभेचे कामकाज रखडलं आहे. आज अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा शेवटचा दिवस आहे. या शेवटच्या दिवशी वीजपुरवठा खंडीत झाल्याने कामकाज थांबवण्यात आले आहे.

  • 26 Mar 2025 03:41 PM (IST)

    हाय सिक्युरिटी नंबरप्लेट संदर्भात ठाणे RTO चा डेमो

    1 एप्रिल 2019 पूर्वीच्या सर्व वाहनांना हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट बसविण्याची सक्ती केली आहे. ही नंबर प्लेट ३१ मार्चपर्यंत बसविण्याची मुदत होती. आता ही नंबरप्लेट बसविण्यास आता ३० जुनपर्यंत मुदतवाढ दिली आहे.काही जण बनावट साईट उघडून फसवणूक करीत आहेत, त्यामुळे ठाणे आरटीओ कार्यालयाने डेमोस्ट्रेशन केले आहे.

  • 26 Mar 2025 03:04 PM (IST)

    वाल्मिक कराड याने कोर्टात डिस्चार्जसाठी अर्ज दाखल केला आहे.

    संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी वाल्मीक कराड याचे  वकिल विकास खाडे याने डिस्चार्ज एप्लीकेशन केले आहे. वाल्मीक कराडवर लावलेले गुन्हे मान्य नसल्याचे वाल्मीक कराडच्या वकिलाने कोर्टाला सांगितले आहे.

  • 26 Mar 2025 02:52 PM (IST)

    आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या नामकरणाचा वाद टोकाला

    आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या नामकरणाचा वाद टोकाला गेला आहे. नाशिकचे महंत सुधीरदास नकली, त्यांचा आखाड्यांशी काय संबंध? महंत सुधीरदास यांनी महामंडलेश्वर पद कुठून आणलं? असा प्रश्न त्र्यंबकेश्वरच्या आनंद आखाड्याचे शंकरानंद सरस्वती महाराज यांनी उपस्थित केला.

  • 26 Mar 2025 02:31 PM (IST)

    आगामी कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर बैठक

    आगामी कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर आज त्र्यंबकेश्वरमध्ये अखिल भारतीय आखाडा परिषदेची महत्त्वाची बैठक पार पडली. वेगवेगळ्या मुद्द्यांवर ही बैठक झाली. अखिल भारतीय आखाडा परिषदेची आगामी कुंभमेळ्याचे अनुषंगाने ही पहिलीच बैठक त्र्यंबकेश्वरमध्ये पार पडली.

  • 26 Mar 2025 02:11 PM (IST)

    कांदिवली येथील ४ वर्षांच्या मुलाच्या अपहरण आणि हत्येचा गुन्ह्यात आरोपीस अटक करण्यात आली. सुरत येथून एका आरोपीला अटक करण्यात आली आहे. २२ तारखेला पहाटे १:४५ ते ४ च्या दरम्यान कांदिवलीतील इराणी वाडी येथे एक ४ वर्षांचा मुलगा त्याच्या नातेवाईकासोबत झोपला असताना त्याचे अपहरण झाले होते.
  • 26 Mar 2025 01:36 PM (IST)

    कॉमेडियन कुणाल कामराला पोलिसांकडून दुसऱ्यांदा समन्स जारी

    कॉमेडियन कुणाल कामराला पोलिसांकडून दुसऱ्यांदा समन्स जारी. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर विडंबनात्मक कविता केल्याने दाखल गुन्ह्यात समन्स जारी केला. पहिल्या समन्सनंतर हजेरी न लावल्याने त्याला आता पोलिसांकडून दुसरं समन्स पाठवण्यात आल आहे. आता दुसऱ्या समन्सनंतर तरी कुणाल उपस्थित राहणार का हे पाहणं महत्त्वाचं आहे.

  • 26 Mar 2025 01:16 PM (IST)

    दिशा सालियान प्रकरण: आदित्य ठाकरे नैतिकता म्हणून राजीनाम देणार का? संजय गायकवाड यांचा सवाल

    दिशा सालियान प्रकरणावरून संजय गायकवाड यांनी थेट सवाल विधान परिषदेच्या सभागृहात उपस्थित केला आहे. आदित्य ठाकरेंचा थेट संबंध या प्रकरणाशी असल्याचं दिशा सालियान यांचे वडिल सतीश सालियान यांनी आरोप केल्याचंही गायकवाड यांनी म्हटलं आहे. आदित्य ठाकरे नैतिकता म्हणून राजीनामा देणार का? असा सवाल संजय गायकवाड यांनी उपस्थित केला आहे.

  • 26 Mar 2025 12:59 PM (IST)

    कल्याण – शीळ रोडवर सकाळ पासूनच ट्रॅफिक जॅम, विद्यार्थ्यांना फटका, दुपारच्या शाळांना दिली सुट्टी…

    कल्याण – शीळ रोडवर सकाळ पासूनच ट्रफिक जॅम झाले होते. त्यामुळे याचा फटका नागरिकांना आणि विद्यार्थ्यांनाही पडला आहे. विद्यार्थ्यांना सकाळी जाण्यासाठी तब्बल दोन तास लागले, त्यामुळे दुपारी शाळेत येणाऱ्या विद्यार्थ्यांना सुट्टी दयावी लागली. ऐन परीक्षेच्या तोंडावर शाळा बुडत असल्याने पालकांनी नाराजी व्यक्त केली आहे.

  • 26 Mar 2025 12:43 PM (IST)

    कोल्हापूर : प्रशांत कोरटकरच्या आवाजाचे सॅम्पल घेण्यासाठी फॉरेन्सिक टीम लवकरच होणार दाखल

    प्रशांत कोरटकरच्या आवाजाचे सॅम्पल घेण्यासाठी फॉरेन्सिक टीम राजारामपुरी पोलीस ठाण्यात थोड्याच वेळात दाखल होणार आहे.

    इतिहास संशोधक इंद्रजीत सावंत यांना कोरटकर याने दिलेल्या धमकीच्या तपासाच्या अनुषंगाने कोरटकरचे आवाजाचे सॅम्पल महत्त्वाचे आहेत.  3 दिवसाच्या पोलीस कोठडी दरम्यान प्रशांत कोरटकरची सखोल चौकशी होणार आहे.

  • 26 Mar 2025 12:35 PM (IST)

    संतोष देशमुख हत्याप्रकरण – बीड कोर्टात सुनावणी सुरू

    संतोष देशमुख हत्याप्रकरणी बीड कोर्टात सुनावणी सुरू आहे. सरकारी वकील उज्ज्वल निकम यांच्याकडून युक्तीवाद सुरू आहे. सर्व आरोपी व्हीसीद्वारे कोर्टात उपस्थित होते.

  • 26 Mar 2025 12:32 PM (IST)

    पुणे – अलका चौकात कुणाल कामराच्या समर्थनात बॅनर

    पुण्यातील अलका चौकात कुणाल कामराच्या समर्थनात बॅनर लावण्यात आले आहेत.  पुण्यातील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या पदाधिकाऱ्यांकडून बॅनर लावण्यात आले असून त्यावर एकनाथ शिंदेंचे व्यंगचित्र देखील काढण्यात आले आहे.

  • 26 Mar 2025 12:24 PM (IST)

    अन्ननलिकेत हाड अडकले, पाणीही पिता येत नव्हते, अखेर यशस्वी शस्त्रक्रिया

    पुणे जिल्ह्यातील इंदापूर येथील एका 70 वर्षीय वृद्धाने विवाह सोहळ्यात मांसाहार असलेले जेवण करताना चुकून हाडही गिळले. ते अन्ननलिकेत आडवे होऊन अडकले. या हाडामुळे रुग्‍णाच्‍या अन्ननलिकेत छिद्र झाले. त्‍यामुळे रुग्णाला पाणीदेखील पिता येत नव्‍हते व श्‍वासही घ्यायला त्रास होत होता. ‍ससून रुग्‍णालयातील शल्‍यविषारदांच्‍या पथकाने ‘एंडोस्कोपी’द्वारे यशस्वीपणे हाड बाहेर काढून त्‍याला जीवनदान दिले. तसेच अन्‍ननलिकेचे छिद्र बुजविण्यासाठी स्‍टेंटही टाकला.

  • 26 Mar 2025 12:19 PM (IST)

    जळगाव जिल्ह्यातील २५० ग्रामपंचायतींच्या ग्रामसेवकांना जिल्हा परिषद प्रशासनाकडून कारणे दाखवा नोटीस

    जळगाव जिल्ह्यातील २५० ग्रामपंचायतींच्या ग्रामसेवकांना जिल्हा परिषद प्रशासनाकडून कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. २५० पैकी १५० ग्रामपंचातींनी १५ व्या वित्त आयोगातून ६० ते ६५ टक्क्यांपेक्षा अधिकचा निधी खर्च केलेला नाही, अशी बाब समोर आली आहे. अशा ग्रामपंचायतींच्या ग्रामसेवकांना ग्रामपंचायतींचे दप्तर घेऊन जिल्हा परिषदेत तपासणीसाठी बोलाविण्यात आले आहे. १५ व्या वित्त आयोगाच्या निधीतून होणाऱ्या कामांचे नियोजन न केल्यास या ग्रामसेवकांवर निलंबनाची कारवाई केली जाणार आहे. जिल्हा परिषदेकडून २५० ग्रामसेवकांना नोटीस बजावल्यानंतर त्यांच्याकडून खुलासा घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. जिल्हा परिषद प्रशासनाकडून ग्रामपंचातींना दि. ७ एप्रिलपर्यंतचा अल्टिमेटम देण्यात आला आहे. दप्तर तपासणी दरम्यान काही तफावत आढळल्यास ग्रामसेवक व ग्रामपंचायतीचे सदस्यही अडचणीत येऊ शकतात.

  • 26 Mar 2025 12:16 PM (IST)

    संभाजीराजेंनी शिवरायांच्या समाधीच्या जीर्णोद्धारावेळचे फोटो दाखवले

    वाघ्या कुत्र्याच्या अस्तित्वाचा एकही पुरावा नाहीयेत. एक टक्काही पुरावा नाही, असं सांगत माजी खासदार छत्रपती संभाजी राजे यांनी शिवरायांच्या समाधीच्या जीर्णोद्धारावेळचे फोटोच दाखवले. तसेच शिवाजी महाराजांच्या समाधीपेक्षा वाग्या कुत्र्याची समाधी मोठी असल्याबाबत त्यांनी हरकतही घेतली.

  • 26 Mar 2025 12:13 PM (IST)

    वाघ्या कुत्र्याचे पुरावे असल्याचं एकाही इतिहासकाराने सांगितलं नाही : संभाजी राजे

    वाघ्या कुत्र्याच्या अस्तित्वाबद्दलचे कोणतेही पुरावे नाहीत. कोणत्याही इतिहासकारांनी त्याबाबतचे पुरावे दिले नाहीत. इतिहासकारही तसे पुरावे देऊ शकले नाहीत, असं सांगतानाच रायगडावरील कुत्र्याची समाधी हटवण्यासाठी मी पत्र लिहिलं होतं, असं संभाजी महाराजांनी स्पष्ट केलं आहे. माजी खासदार संभाजी छत्रपती यांनी पत्रकार परिषद घेऊन ही मागणी केली.

  • 26 Mar 2025 11:54 AM (IST)

    प्रशांत कोरटकरच्या तीन दिवसांच्या कोठडीच्या सीसीटीव्ही फुटेजची मागणी

    प्रशांत कोरटकरच्या तीन दिवसांच्या कोठडीच्या सीसीटीव्ही फुटेजची मागणी करण्यात आली आहे. तक्रारदार इंद्रजीत सावंत यांनी वकिलांमार्फत ही मागणी केली आहे. जुना राजवाडा पोलीस स्टेशनकडे इंद्रजीत सावंतांनी लेखी मागणी केली. सीसीटीव्ही फुटेज कोर्टाच्या कामासाठी आवश्यक असल्याचं कारण त्यांनी दिलंय.

  • 26 Mar 2025 11:38 AM (IST)

    विरोधी पक्षनेत्याची निवड करायची नसेल तर सरकारने तसं जाहीर करावं- भास्कर जाधव

    “विरोधी पक्षनेत्याची निवड करायची नसेल तर सरकारने तसं जाहीर करावं. सरकारकडे बहुमत आहे, तरी का घाबरतंय? आम्ही आमच्याकडून प्रयत्न केला, अध्यक्षांना पत्र दिलंय,” असं भास्कर जाधव म्हणाले.

  • 26 Mar 2025 11:35 AM (IST)

    बाजूच्या खुर्चीचा निर्णय अध्यक्ष जो घेतील तो मान्य असेल- फडणवीस

    “बाजूच्या खुर्चीचा निर्णय अध्यक्ष जो घेतील तो मान्य असेल,” असं वक्तव्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधी पक्षनेतेबाबत केलं आहे.

  • 26 Mar 2025 11:30 AM (IST)

    विधानभवन परिसरात झाडावर चढून तरुणाचं आंदोलन

    विधानभवन परिसरात झाडावर चढून तरुणाचं आंदोलन सुरू आहे. आंदोलक ईश्वर शिंदे बीडमधील रहिवाशी असल्याचं समजतंय. तरुणाला झाडावरून खाली उतरवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. आंदोलकाच्या हाती सेंद्रीय मॉलच्या संकल्पनेचा बॅनर आहे.

  • 26 Mar 2025 11:20 AM (IST)

    मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून अण्णा बनसोडेंचं अभिनंदन

    अण्णा बनसोडेंची विधानसभेच्या उपाध्यक्षपदी निवड झाल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी त्यांचं अभिनंदन केलं. फडणवीसांनी बनसोडेंच्या निवडीचा प्रस्ताव मांडल्यानंतर एकमताने त्यांची निवड झाली.

  • 26 Mar 2025 11:10 AM (IST)

    अण्णा बनसोडेंची विधानसभेच्या उपाध्यक्षपदी निवड

    अण्णा बनसोडेंची विधानसभेच्या उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बनसोडेंच्या निवडीचा प्रस्ताव मांडला. फडणवीसांच्या या प्रस्तावाला एकनाथ शिंदेंकडून अनुमोदन देण्यात आलं.

  • 26 Mar 2025 10:59 AM (IST)

    प्रेमासाठी वाट्टेल ते

    छत्रपती संभाजीनगरमध्ये दोघांनी प्रेमविवाह साठी 14 तर एकाने पत्नीच्या विरहात चोरल्या 15 दुचाकी चोरल्या. सिडको पोलिसांनी आरोपींना ताब्यात घेतले आहे.

  • 26 Mar 2025 10:50 AM (IST)

    ठाणे मनपाच्या कारभाराची चौकशी करा-भाजप नेते संजय केळकर

    ठाणे शहरातील विकासकामांसाठी राज्य शासनाने तीन हजार कोटी पाठवले, पण अधिकाऱ्यांनी शिल्लक निधी परत पाठवला नाहीच, शिवाय जुन्याच कामांच्या नव्याने निविदा आणि नवीन बिले काढत निधी लुटला. महापालिकेत अधिकारी आणि ठेकेदारांची अभद्र युती असून कोट्यवधींचा भ्रष्टाचार होत आहे. या प्रकरणी निवृत्त न्यायाधीशांची समिती स्थापन करून महापालिकेची सखोल चौकशी करावी, अशी मागणी आमदार संजय केळकर यांनी विधिमंडळात केली.

  • 26 Mar 2025 10:38 AM (IST)

    उष्माघाताचा पहिला बळी

    छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात दिवसेंदिवस उन्हाची तीव्रता वाढत चालली असल्याने तापमान वाढताना बघायला मिळत आहे.जिल्ह्यातील सोयगाव तालुक्यात काल 39 अंश सेल्सिअस तापमान नोंदवण्यात आले होते.या वाढत असलेल्या तापमानामुळे सोयगाव तालुक्यात पहिला बळी गेला आहे.निमखेडी बस थांब्यावरील ही घटना असून उन्हात बसथांब्यात विसावा घेणाऱ्या एका प्रवाशाचा उष्मघातामुळे मृत्यू झाला आहे.अमोल दामोदर बावस्कर असे उष्मघातामुळे मृत्यू झालेल्या 25 वर्षीय तरुणाचे नाव आहे.

  • 26 Mar 2025 10:30 AM (IST)

    सुपारी घेऊन कामरा बोलला

    अभिव्यक्ती स्वातंत्र्य हवेच. विडंबन आम्ही समजू शकतो. अनेक कवी विडंबन करायचे. पण हा एक प्रकारचा स्वैराचार, व्याभिचार आहे. हे सुपारी घेऊन बोलण्याचे काम आहे, अशी प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.

  • 26 Mar 2025 10:20 AM (IST)

    प्रत्येक आरोग्य केंद्रात एक आयुर्वेदिक डॉक्टर असावा

    राज्यातील प्रत्येक आरोग्य केंद्रात किमान एक तरी आयुर्वेदिक डॉक्टर असावा अशी मागणी एकनाथ खडसे यांनी केली.

  • 26 Mar 2025 10:10 AM (IST)

    दावोसमधील १७ प्रकल्पांना मंजूरी

    दावोसमधील १७ प्रकल्पांना मंजूरी मिळाली आहे. त्यामुळे हजारो नोकऱ्या निर्माण होतील.

  • 26 Mar 2025 10:00 AM (IST)

    कुणाल कामराची मानसिक स्थिती ठीक नसावी

    अशा पद्धतीने वारंवार सर्वोच्च पदावर बसलेल्या नेत्यांचा अपमान कारणं अशी वक्तव्य त्याने वारंवार केली आहेत. आधी एक गाणं म्हटलं… परत सरकारची खिल्ली उडवण्यासाठी त्याने गाणं बनवलं आहे. त्याची मानसिक स्थिती त्याची ठीक नसावी, असा टोला गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी लगावला.

  • 26 Mar 2025 09:57 AM (IST)

    Maharashtra News: काँग्रेस आमदार धीरज लिंगाडे यांनी दाखल केला हक्कभंग

    काँग्रेस आमदार धीरज लिंगाडे यांनी दाखल केला हक्कभंग… टक्कल पडण्याच्या घटनेविषयी खोटी माहिती दिल्याचा आरोप… बुलढाण्यातल्या घटनेशी वि.परिषदेत खोटी माहिती दिल्याचा आरोप… आरोग्य राज्यामंत्री मेघना बोर्डीकरांविरोधात हक्कभंग दाखल

  • 26 Mar 2025 09:49 AM (IST)

    Maharashtra News: भाजपाने पोसलेले अनेक युट्यूबर आमच्यावर टीका करतात – संजय राऊत

    भाजपाने पोसलेले अनेक युट्यूबर आमच्यावर टीका करतात… राजकारणात टीकेचे घाल सोसले पाहिजेत… राजकारणात व्यंग सहन करायचे असतात… कुणाल कामराने प्रत्येकांवर व्यंग केलं आहे… राजकीय नेत्यांनी अशा टीकांकडे दुर्लक्ष केलं पाहिजे… असं वक्तव्य संजय राऊत यांनी केलं आहे.

  • 26 Mar 2025 09:20 AM (IST)

    Maharashtra News: राज्यातील पाच आय ए एस अधिकाऱ्यांच्या बदल्या

    सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिकेचे आयुक्त शुभम गुप्ता यांची नागपूरच्या विदर्भ वैधानिक विकास महामंडळाच्या सचिवपदी बदली झाली आहे. सांगलीचे आयुक्त शुभम गुप्ता यांची तडकाफडकी झाली आहे. सांगली महापालिका पदभार स्वीकारल्या नतंर अनेक जाचक निर्णयामुळे नागरिकांसह नेते मंडळीच्या रोषाला सामोरे जावे लागल्याच्या घटना घडली असल्याची चित्र आहे.

  • 26 Mar 2025 09:07 AM (IST)

    Maharashtra News: सोलापूर जिल्ह्यातीला शेतीला अवकाळी पाऊस आणि वादळी वाऱ्याचा बसला फटका

    अचानक आलेल्या अवकाळी पावसामुळे बार्शी तालुक्यातील राळेरासमधील टरबूज बाग झाली मातीमोल… एकीकडे सोलापूर जिल्ह्यातील तापमान दिवासेंदिवस चाळीशीच्या पल्याड जातं असल्याने फळपिकांना तग धरणे झाले होते मुश्किल… त्यात अचानक आलेल्या पावसामुळे टरबूज बाग झाली नेसस्तनाबूत… यामुळे शेतकऱ्यांचे लाखोंचे नुकसान झाल्याचं चित्र सध्या सोलापूर जिल्ह्यात दिसून येत आहे…

  • 26 Mar 2025 08:53 AM (IST)

    स्वारगेट बलात्कार प्रकरण

    स्वारगेट एसटी स्थानकाच्या आवारात प्रवासी तरुणीवर बलात्कार प्रकरणातील आरोपी दत्ता गाडे यांच्या विरोधात लवकरात लवकर आरोप पत्र दाखल करण्यासाठी त्याची डीएनए चाचणी करण्यात आलीय. चाचणीचा अहवाल अद्याप उपलब्ध झालेला नाही. या घटनेला 25 मार्चला एक महिना पूर्ण झाला.

  • 26 Mar 2025 08:51 AM (IST)

    ठाण्यात सरकारी रक्तपेढ्यामध्ये दहा दिवस पुरेल इतकाच रक्तसाठा

    ठाण्यात सरकारी रक्तपेढ्यामध्ये दहा दिवस पुरेल इतकाच रक्तसाठा. आरोग्य विभागाच्या चिंतेत भर पडली आहे. एम एम आरमध्ये सहा रक्तपेढ्या. रक्तदान शिबिरातील तरुणांचा सहभाग वाढवण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे. ठाणे जिल्ह्यातील विविध महापालिका तसेच ग्रामीण भाग येथे लोकसंख्या पाहता जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणांवर कायम ताण असल्याचे जाणवते.

  • 26 Mar 2025 08:49 AM (IST)

    हायवा ट्रक चोरीप्रकरणी आंतरराज्यीय टोळी जेरबंद

    हायवा ट्रक चोरीप्रकरणी आंतरराज्यीय सराईत टोळी जेरबंद करण्यात आलीय. पुणे ग्रामीण स्थानिक गुन्हे आणि यवत पोलिसांनी ही कारवाई केलीय. यात चार जणांना अटक करण्यात आलीय तर आरोपींकडून 20 लाखांचा मुद्देमाल ही जप्त करण्यात आलाय.

  • 26 Mar 2025 08:46 AM (IST)

    सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिक-त्र्यंबक वादाला सुरुवात

    सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिक-त्र्यंबक वादाला सुरुवात. जिल्हाधिकारी जलज शर्मा: रेकॉर्ड तपासूनच चर्चा आणि निर्णय. महापालिकेत साधू-महंतांची बैठक, जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केली भूमिका. मुख्यमंत्र्यांनी रविवारी ज्योतिर्लिंग पूजनानंतर घेतली बैठक. त्र्यंबकेश्वर आणि नाशिक दोन्ही ठिकाणी कुंभमेळ्याचे महत्त्व. आचार्य प्रवक्त्यांच्या बैठकीत वादावर चर्चा. सरकारच्या निर्देशानुसार पुढील निर्णय होणार.

सध्या सुरू असलेली रस्त्यांची कामे पूर्ण करण्यासाठी मुंबई महानगरपालिका प्रशासनाने कंत्राटदारांना 31 मे ची अंतिम मुदत दिली आहे. तोपर्यंत येत्या 70 दिवसात ही कामे पूर्ण करा, त्यासाठी नियोजन करा, रस्तानिहाय काम पूर्ण करण्याची तारीख निश्चित करा असे आदेश पालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी मुंबई महानगरपालिकेच्या रस्ते विभागाला दिले आहेत. रस्तेकामे सुरू असताना वरिष्ठ अभियंत्यांनी प्रत्यक्ष कार्यस्थळी आकस्मित भेट द्यावी, अधिक गती आणि गुणवत्ता यावर लक्ष केंद्रित करावे. काँक्रिटीकरण झालेल्या रस्त्यांवर खोदकामास पूर्णपणे बंदी घालावी, असे निर्देशदेखील गगराणी यांनी दिले आहेत. सोलापुरात मध्यरात्री प्लास्टिक कारखान्याला लागली आग. सोलापुरातील शांतीनगर परिसरातील घटना. या आगीत प्लस्टिक कारखान्याचे मोठे नुकसान. सुदैवाने यात कुठलीही जीवित हानी नाही. अग्निशामक दलाकडून आग विझण्यात आली. आगीचे कारण अद्याप अस्पष्ट आहे

Published On - Mar 26,2025 8:44 AM

Follow us
बीडचे निलंबित पोलीस उपनिरीक्षक रणजित कासलेंचे मुंडेंवर गंभीर आरोप
बीडचे निलंबित पोलीस उपनिरीक्षक रणजित कासलेंचे मुंडेंवर गंभीर आरोप.
कसा झाला दिशाचा मृत्यू? पोस्टमार्टम रिपोर्टमधून समोर आलं खळबळजनक सत्य
कसा झाला दिशाचा मृत्यू? पोस्टमार्टम रिपोर्टमधून समोर आलं खळबळजनक सत्य.
सत्य परेशान हो सकता है, पराजित नहीं - अरविंद सावंत
सत्य परेशान हो सकता है, पराजित नहीं - अरविंद सावंत.
'संभाजीराजे बोलले ते 100% चूक', वाघ्यासंदर्भात गुरूजींचं मोठं वक्तव्य
'संभाजीराजे बोलले ते 100% चूक', वाघ्यासंदर्भात गुरूजींचं मोठं वक्तव्य.
गीतेचा उपदेश याच संविधानात दाखवलेला आहे - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
गीतेचा उपदेश याच संविधानात दाखवलेला आहे - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस.
आव्हाड-राणे विधानभवनाच्या पायऱ्यांवर आमने-सामने, मग हस्तांदोलन अन्...
आव्हाड-राणे विधानभवनाच्या पायऱ्यांवर आमने-सामने, मग हस्तांदोलन अन्....
'...त्याला महाराष्ट्र बाहेर हाकला', कोणत्या मुद्द्यावरून कडूंचा संताप
'...त्याला महाराष्ट्र बाहेर हाकला', कोणत्या मुद्द्यावरून कडूंचा संताप.
वाल्मिक कराडच्या वकिलांनी आरोप मुक्तीसाठी केला अर्ज
वाल्मिक कराडच्या वकिलांनी आरोप मुक्तीसाठी केला अर्ज.
मुंबईत येत्या शनिवारपासून उकाडा तर 'या' महिन्यात धुव्वाधार बरसणार
मुंबईत येत्या शनिवारपासून उकाडा तर 'या' महिन्यात धुव्वाधार बरसणार.
'ठाणे, रिक्षा, चश्मा..', पुण्यात कुणाल कामराच्या समर्थनार्थ बॅनरबाजी
'ठाणे, रिक्षा, चश्मा..', पुण्यात कुणाल कामराच्या समर्थनार्थ बॅनरबाजी.