AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Maharashtra Breaking News LIVE 10th April 2025 : कुणाल कामरा १६ तारखेला मुंबई हायकोर्टात होणार हजर- राहुल कनाल

| Updated on: Apr 11, 2025 | 8:41 AM

Maharashtra Political News LIVE in Marathi : आज 10 एप्रिल 2025. देश, विदेश, राज्य पातळीवरील राजकीय, सामाजिक, आर्थिक, गुन्हेगारी क्षेत्र, क्रीडा अन् मनोरंजन क्षेत्रातील महत्वाच्या घडामोडी जाणून घ्या. तुमच्या जिल्ह्यातील, तुमच्या गावातील बातमी तुम्हाला इथे वाचायला मिळेल.

Maharashtra Breaking News LIVE 10th April 2025 : कुणाल कामरा १६ तारखेला मुंबई हायकोर्टात होणार हजर- राहुल कनाल

जालना शहर महापालिका प्रशासनाकडून मागील काही दिवसांपासून शहरातील अनाधिकृत नळ धारकांची शोध मोहीम सुरू आहे. एका खाजगी एजन्सीकडून ही शोध मोहीम सुरू असून यामध्ये आज पर्यंत 20 हजार घरांचा सर्वे पूर्ण करण्यात आला असून त्यापैकी जवळपास 3 हजार नळ कनेक्शन अनाधिकृत असल्याची माहिती समोर आलीय. त्यामुळे नोटीस बजावल्यानंतरही अनधिकृत नळ कनेक्शन धारक आपले नळ कनेक्शन अधिकृत करून घेत नसल्याने येत्या 15 एप्रिल पासून गुन्हे दाखल व्हायला सुरुवात होणार आहे. दरम्यान नोटीस मिळाल्यानंतर 116 जणांनी आपले नळ कनेक्शन अधिकृत करून घेतले या दंडापोटी महापालिकेला 11 लाख 60 हजार रुपये प्राप्त झाले.मोहोळचे राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार राजू खरे यांची उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्या स्वागतासाठी जाहीरात. सांगोला येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याच्या अनावरणासाठी येणाऱ्या एकनाथ शिंदे यांचे सोलापूर जिल्ह्यात आमदार राजू खरे यांनी केले जाहिरातीने स्वागत.

LIVE NEWS & UPDATES

The liveblog has ended.
  • 10 Apr 2025 07:05 PM (IST)

    पुण्यामध्ये अवकाळी पावसाची हजेरी

    पुण्याच्या खेड तालुक्यात अवकाळी पावसाची जोरदार हजेरी

    सकाळपासून वातावरणात जाणवत होता उकाडा

    अचानक आलेल्या पावसाने नागरिकांची उडाली धावपश

    पावसामुळे उष्णतेपासून दिलासा

    मात्र शेतकऱ्यांचं मोठं नुकसान

  • 10 Apr 2025 06:16 PM (IST)

    धाराशिवच्या उमरगा परिसरात गारांचा पाऊस

    धाराशिवच्या उमरगा परिसरात गारांचा पाऊस

    अवकाळी पावसाने फळबागा आणि आंब्याचे मोठे नुकसान

    धाराशिवच्या उमरगा तालुक्यातील मुरूम परिसरामध्ये गारांचा पाऊस

    गारांचा पाऊस पडल्याने शेतकऱ्यांच्या फळबागांचे झाले नुकसान

    मुरूम परिसरातल मूळज आणि परिसरातील गावांमध्ये वादळी वाऱ्यासह पाऊस

  • 10 Apr 2025 05:46 PM (IST)

    पुण्यातील वाघोलीमध्ये गुंडांचा धुमाकूळ

    पुण्यातील वाघोलीमध्ये गुंडांचा धुमाकूळ

    थार आणि स्कार्पिओ गाड्यांची जीवघेणी रेस

    सोसायटीतील नागरिकांनी विचारणा केली असता त्यांना गुंडांकडून शिविगाळ व दमदाटी

    बेदरकारपणे  गाडी चालवून सोसायटीतील नागरिकांचा जीव धोक्यात घालणाऱ्यांवर कारवाईची मागणी

  • 10 Apr 2025 05:37 PM (IST)

    नांदेडमध्ये सलग तिसऱ्या दिवशी वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाची हजेरी

    नांदेडमध्ये सलग तिसऱ्या दिवशी वादळी वारा व पावसाची जोरदार हजेरी

    अर्धापूर तालुक्यातील आंबेगाव येथील घरावरील पत्र गेले उडून

    केळीसह शेतातील इतर पिकांचे प्रचंड नुकसान, फळबागांना मोठा फटका

    नांदेड जिल्ह्यातील इतर भागात ढगाळ वातावरण, वादळी वाऱ्यालाही सुरुवात

  • 10 Apr 2025 12:54 PM (IST)

    पंढरपूर मंदिराच्या कॉरिडॉरचे नकाशे झाले जाहीर

    मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा ड्रीम प्रोजेक्ट असणारा पंढरपूर कॉरिडॉरचा नकाशा नुकताच जाहीर झाला आहे. मंदिर परिसरात ६० मीटर, ८० मीटर आणि १०० मीटर रुंदीकरण असे तीन प्रस्ताव पुढे आले आहेत. शिवाय मंदिर परिसरासह, चंद्रभागा वाळवंटाचा विकास, नदी शुद्धीकरणाचा प्रकल्प आदींचा समावेश या विकास आराखड्यात करण्यात आला आहे.

  • 10 Apr 2025 12:33 PM (IST)

    ठाण्यातील बांधकाम व्यवसायिकाच्या विरोधात मनसे आक्रमक

    ठाण्यातील लोढा हमारा कोलशेत या ठिकाणी मनसे कार्यकर्ते आणि नागरिक जमले आहे. बांधकाम व्यवसायिकाच्या विरोधात मनसे आक्रमक झाली आहे. नागरिकांना पटवण्याबाबत मनसेने आंदोलन छेडले आहे.

  • 10 Apr 2025 12:16 PM (IST)

    कुणाल कामरा १६ तारखेला मुंबई हायकोर्टात होणार हजर- राहुल कनाल

    मुंबई पोलीस आंधप्रदेशमध्ये जाऊन कुणाल कामराला घेऊन येणार असल्याची माहिती राहुल कनालने दिली आहे. कुणाल कामरा स्टुडिओ तोडफोड प्रकरणात राहुल कनालवर गुन्हा दाखल झाला आहे. आठवड्यातून दोन वेळा राहुल कनाल याला न्यायालयाने खार पोलिस ठाण्यात हजेरी लावण्यात सांगितले. कुणाल कामराला १६ तारखेला मुंबई हायकोर्ट हजर करणार ही माहिती देखील त्याने दिली आहे.

  • 10 Apr 2025 12:02 PM (IST)

    राहुरी पोलीस ठाण्यासमोर ग्रामस्थांचे ठिय्या आंदोलन…

    राहुरी पोलीस ठाण्यासमोर ठिय्या आंदोलन,देवळाली प्रवरा येथील ग्रामस्थांनी राहुरी पोलिस ठाण्यासमोर ठिय्या दिला आहे. महापुरूष पुतळा विटंबन प्रकरणातील आरोपी अजूनही जेरबंद नाही. 15 दिवसांपूर्वी घटना घडूनही आरोपीला न पकडल्याने शिवप्रेमी संतप्त झाले आहेत.

  • 10 Apr 2025 11:41 AM (IST)

    रायगडमध्ये मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर मोठी वाहतूक कोंडी 

    रायगडमध्ये मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर मोठी वाहतूक कोंडी झाली आहे. पुण्याकडे जाणाऱ्या लेनवर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत.

  • 10 Apr 2025 11:27 AM (IST)

    सोलापुरातील पाकणीत इथेनॉलने भरलेला आणि दोन रिकाम्या टँकरला भीषण आग

    सोलापुरातील पाकणीत एक इथेनॉलने भरलेला तर दोन रिकाम्या टँकरला भीषण आग लागली . आगीत सुदैवानं कोणतीही जीवितहानी नाही मात्र दोन जण किरकोळ जखमी. अचानक लागलेला आगीमुळे इथेनॉलच्या तिन्ही टँकरचे लाखो रुपयांचे नुकसान झालं.  जखमींवर सोलापुरातील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. आग विझवण्यासाठी दहा ते पंधरा अग्निशामक गाड्यांची मदत घेण्यात आली.

  • 10 Apr 2025 11:07 AM (IST)

    गॅस दरवाढ विरोधात शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे चूल पेटवा आंदोलन

    गॅस दरवाढ विरोधात शिवसेना उद्धव ठाकरे पक्षातर्फे चूल पेटवा आंदोलन करण्यात येत आहे. वाढत्या महागाईच्या विरोधात पुणे शिवसेना आक्रमक झाली असून रस्त्यावरती चूल पेटवत सरकारचा निषेध करण्यात आला.

  • 10 Apr 2025 10:58 AM (IST)

    दीनानाथचा अजून एक प्रताप

    दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाने धर्मादाय रुग्णालय असूनही तनिषा भिसे यांना त्यामाध्यमातून मदत न केल्याचे चौकशी अहवालात ही समोर आले आहे. या अनुषंगाने अनेक रुग्णालये धर्मादाय असूनही त्याची माहिती देत नाहीत, त्यामुळे सामान्य नागरिकांना मदत मिळत नाही हे निदर्शनास आले आहे.

  • 10 Apr 2025 10:50 AM (IST)

    नाशिककरांना उन्हापासून दिलासा

    चार दिवसांच्या उच्चांकची तापमानानंतर नाशिकमध्ये आजपासून पारा कमी होणार आहे. आय एम डी च्या संकेतस्थळावर याविषयीची माहिती देण्यात आली आहे. गेले पाच दिवस नाशिक मध्ये उन्हाचा सर्वाधिक चटका जाणवला.

  • 10 Apr 2025 10:40 AM (IST)

    गतिमंद महिलेवर अत्याचार

    डोंबिवलीत 30 वर्षीय गतिमंद महिलेवर रिक्षाचालकाने अत्याचार केला. नातेवाईकांकडे जात असताना आरोपी रिक्षाचालकाने अज्ञात ठिकाणी नेऊन अत्याचार केला. फैजान खान असे अत्याचार करणाऱ्या रिक्षा चालकाचे नाव आहे.

  • 10 Apr 2025 10:30 AM (IST)

    रिक्षा चालकाला उडवले

    वसईत एका स्कुल बस चालकाने भरागाव वेगात येऊन दोन रिक्षा चालकाला उडविले आहे. वसई पूर्व वसंत नगरी सिग्नल वर रात्री साडे दहाच्या सुमारास ही घटना घडली आहे. या अपघातावेळी बस चालक एवढा भरागाव वेगात होता की रिक्षाचालकांना उडवून तो रस्त्याच्या बाजूच्या मोकळ्या जागेत जाऊन बस थांबली.

  • 10 Apr 2025 10:20 AM (IST)

    पाण्यासाठी ठिय्या आंदोलन

    पाण्यासाठी वसईच्या पूर्व पट्टीतील नागरिकांनी आक्रमक होऊन, वसई विरार महापालिकेच्या प्रभाग जी कार्यालयात काल ठिय्या आंदोलन केले आहे. कामण, देवदल, कोल्ही, चिंचोटी परिसरात एप्रिल महिन्यातच तीव्र पाणी टंचाईचा नागरिकांना सामना करावा लागत असल्याने, माजी नगरसेविका प्रीती दिनेश म्हात्रे यांच्या नेतृत्वाखाली ठिय्या आंदोलन करण्यात केले आहे.

  • 10 Apr 2025 10:11 AM (IST)

    माजी आमदार संजय शिंदे यांच्यावर टीका

    पाठीमागचे आमदार संजय शिंदे यांच्या काळात कुठलं ठोस काम झालंय ते दाखवा अशी टीका आमदार नारायण पाटील यांनी केली. माझ्या काळात पण ठोस काम झाली ती त्यांच्या पाच वर्षाच्या काळात ठोस कामं झाली ती दाखवा असे आवाहन त्यांनी दिले

  • 10 Apr 2025 10:00 AM (IST)

    संतोष देशमुख हत्या प्रकरणाची आज सुनावणी

    आज बीड जिल्हा न्यायालयात मकोका न्यायालयामध्ये संतोष देशमुख हत्या प्रकरणाची सुनावणी होईल. धनंजय देशमुख आणि संतोष देशमुखांची मुलगी वैभवी आज सुनावणी दरम्यान न्यायालयात हजर राहणार आहेत. या प्रकरणातील सर्व क्रूर आरोपींना फाशी होणे गरजेचे आहे तर चार्जशीट फ्रेम होण्याची धनंजय देशमुख यांनी अपेक्षा व्यक्त केली आहे.

  • 10 Apr 2025 09:53 AM (IST)

    सरकारच्या धोरणांमुळे शेतकऱ्यांचं नुकसान होतंय- बच्चू कडू

    “शेतकऱ्यांचं पालकत्व ज्यांच्याकडे आहे त्या कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्याघरासमोर मशाल पेटवून आम्ही आंदोलन करणार आहोत. हातात मशाल, गळ्यात निळा दुपट्टा आणि भगवा झेंडा घेऊन आम्ही आंदोलन करू. ज्या सरकारच्या धोरणामुळे आमच्या शेतकऱ्यांच्या घरातील दिवे विझायला लागले त्या विरोधात आम्ही आंदोलन करू. कर्जमाफीला सरकारकडे पैसे नाही, अपंगांना द्यायला पैसे नाही. सरकारच्या धोरणांमुळे शेतकऱ्यांचं नुकसान होत आहे,” असं बच्चू कडू म्हणाले.

  • 10 Apr 2025 09:40 AM (IST)

    सोलापूर शहरातील अनेक भागात अद्यापही गढूळ पाणीपुरवठा सुरूच

    सोलापूर- दूषित पाण्याने दोन शाळकरी मुलींच्या मृत्यूनंतरही सोलापूर शहरातील अनेक भागात दूषित पाणीपुरवठा सुरूच आहे. सोलापूर शहरातील अनेक भागात अद्यापही गढूळ पाणीपुरवठा सुरूच आहे. शहरातील भवानी पेठ, मराठा वस्ती, शिवगंगा मंदिर अशा अनेक भागात दूषित पाणीपुरवठा होत आहे. अक्षरशः काळंकुट्ट पाणी येत असल्याने नागरिक संतप्त झाले आहेत. वारंवार पालिका प्रशासनाला विनंती करून देखील कोणताच बदल होत नसल्याने भाजप नेत्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.

  • 10 Apr 2025 09:30 AM (IST)

    शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या मागणीसाठी बच्चू कडू पुन्हा सरकार विरोधात आक्रमक

    अमरावती- शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या मागणीसाठी बच्चू कडू पुन्हा सरकार विरोधात आक्रमक झाले आहेत. उद्या रात्री बच्चू कडू हे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या नाशिकमधील निवास्थानासमोर मशाल पेटवून आंदोलन करणार आहेत. तर दुसरीकडे राज्यभरातील प्रहारचे कार्यकर्ते सत्ताधारी आमदारांच्या घरासमोर मशाल पेटवून आंदोलन करणार आहेत.

    सरकारने निवडणुकीमध्ये शेतकऱ्यांना कर्जमाफीचे आश्वासन दिलं होतं. परंतु शेतकऱ्यांची कर्जमाफी केली नाही. त्यामुळे बच्चू कडू आक्रमक झाले आहेत. शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करा अशी मागणी बच्चू कडू यांनी केली.

  • 10 Apr 2025 09:20 AM (IST)

    नाशिक- चार दिवसांच्या उच्चांकी तापमानानंतर आजपासून पारा कमी होणार

    नाशिक- चार दिवसांच्या उच्चांकी तापमानानंतर आजपासून पारा कमी होणार आहे. आयएमडीच्या संकेतस्थळावर माहिती देण्यात आली आहे. गेले पाच दिवस नाशिकमध्ये उन्हाचा सर्वाधिक चटका बसला. आजपासून उष्णतेच्या झळा कमी होणार आहेत. सर्वाधिक तापमानाची नोंद 41 अंशांवर झाली होती. आता दररोज एक अंशाने तापमानाचा पारा घसरण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

  • 10 Apr 2025 09:10 AM (IST)

    महावीर जयंतीनिमित्त उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठाण्यातील जैन मंदिरात

    महावीर जयंतीनिमित्त उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठाण्यातील जैन मंदिरात भगवान महावीरस्वामी यांच्या दर्शनासाठी उपस्थित राहिले. ठाणा जैन महासंघाच्या वतीने भगवान महावीरस्वामी जन्म कल्याणक महोत्सवनिमित्त महाराथयात्रेचं आयोजन करण्यात आलंय. पारंपारिक पद्धतीने ढोल ताशाचा गजरात भव्य मिरवणूक काढण्यात आली.

  • 10 Apr 2025 09:00 AM (IST)

    केडीएमसीचा लाचखोर कर्मचारी एसीबीच्या जाळ्यात

    केडीएमसीचा लाचखोर कर्मचारी एसीबीच्या जाळ्यात सापडला आहे. एकीकडे नव्या आयुक्तांचं स्वागत सुरू असताना दुसरीकडे पालिकेच्या लाचखोर कर्मचाऱ्यांचा पर्दाफाश झाला आहे. केडीएमसीच्या आय प्रभागातील लिपिक संतोष पाटणे या कर्मचाऱ्याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ अटक केली. मॅरेज सर्टिफिकेट तत्काळ मिळवून देण्यासाठी दीड हजारांची लाच स्वीकारत असताना ही अटक केली.

  • 10 Apr 2025 08:50 AM (IST)

    एका रात्रीत तीन महागड्या कार लांबविल्या

    जळगावात एकाच रात्री चोरट्यांनी शहरातून तीन महागड्या कार लांबविल्या. चोरटे कार चोरून घेऊन जाताना जळगावातील विविध सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले आहेत. जळगाव शहरातील निमखेडी रोड, द्रौपदीनगर व गजानन हाऊसिंग सोसायटी या भागात या घटना घडल्या. याप्रकरणी पोलिस ठाण्यांमध्ये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

  • 10 Apr 2025 08:49 AM (IST)

    गडचिरोली नक्षलग्रस्त भागातील विद्यार्थ्यांना 20% कोटा

    गडचिरोली नक्षलग्रस्त भागातील कोणत्याही शासकीय पद भरतीत अनुकंप विद्यार्थ्यांना 20% कोटा देण्यात येईल जिल्हाधिकाऱ्यांचा निर्णय. गडचिरोली जिल्ह्यात 392 उमेदवारांपैकी 98 नोंदणीकृत उमेदवार पाच वर्षापासून अनुकंप यादीत प्रतीक्षेत आहेत. याच्यावर तोडगा काढण्यासाठी शासन निर्णयाच्या 2018 ची अंमलबजावणी यावेळी अविनाश पांडा यांनी काल गडचिरोली जिल्ह्यात केली. नक्षलग्रस्त दुर्गम भागातील हे उमेदवार अनेक वर्षापासून प्रतीक्षेत असून 20% जागांचा मार्ग जिल्हाधिकाऱ्यांनी मोकळा केला. आता अनुकंप भरतीला वेग येणार आहे. या निर्णयामुळे दुर्गम भागातील सुशिक्षित बेरोजगारांना शासकीय सेवेत नोकरी मिळणार.

  • 10 Apr 2025 08:32 AM (IST)

    नाशिक शहरात शनिवारी वाहतूक मार्गात मोठा बदल

    नाशिक शहरात शनिवारी हनुमान जयंती निमित्त मिरवणुका. वाहतूक मार्गात मोठा बदल. पंचवटी पोलिस ठाण्याच्या हद्दीत पारंपरिक मिरवणुका होणार असल्याने वाहतूक नियोजन. दुपारी 3 पासून मिरवणुका संपेपर्यंत चौक मंडई परिसरात वाहनांना बंदी. वाहतुकीसाठी पर्यायी मार्ग वापरण्याचे आवाहन. गोंधळ आणि कोंडी टाळण्यासाठी निर्णय. जुन्या नाशिक मधील चौक मंडई भागात वाहनांना बंदी. सीबीएस ते खडकाळी सिंग्नलपर्यंत वाहतूक रोखली जाणार.

  • 10 Apr 2025 08:30 AM (IST)

    शरद पवार गटाच्या आमदाराकडून एकनाथ शिंदेच्या स्वागताची जाहीरात

    मोहोळचे राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार राजू खरे यांची उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्या स्वागतासाठी जाहिरात. सांगोला येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याच्या अनावरणासाठी येणाऱ्या एकनाथ शिंदे यांचे सोलापूर जिल्ह्यात आमदार राजू खरे यांनी केले जाहिरातीने स्वागत. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेसह संजय शिरसाट, शंभूराजे देसाई, जयकुमार गोरे, प्रकाश अबिटकर, अण्णा बनसोडे या नेत्यांचे ही जाहिरातीमध्ये फोटो. आमदार राजू खरे यांनी या आधी देखील शिवसेनेशी असलेली जवळीक बोलून दाखवली आहे.

Published On - Apr 10,2025 8:25 AM

Follow us
मोठी बातमी, मोदींकडून सैन्याला ग्रीन सिग्नल; म्हणाले 'वेळ अन् टार्गेट'
मोठी बातमी, मोदींकडून सैन्याला ग्रीन सिग्नल; म्हणाले 'वेळ अन् टार्गेट'.
पहलगामचा मास्टमाईंड कॅमेऱ्यात कैद, पाक सैन्याची कनेक्शन, काय होता डाव?
पहलगामचा मास्टमाईंड कॅमेऱ्यात कैद, पाक सैन्याची कनेक्शन, काय होता डाव?.
'आपल्याकडे वेळ कमी', मोदींचं सूचक विधान, पाकने घेतला धसका; काय होणार?
'आपल्याकडे वेळ कमी', मोदींचं सूचक विधान, पाकने घेतला धसका; काय होणार?.
पाकने युद्धाची वेळ सांगितली अन् मोदींची दिल्लीत फायनल बैठक, पुढे काय?
पाकने युद्धाची वेळ सांगितली अन् मोदींची दिल्लीत फायनल बैठक, पुढे काय?.
पाकिस्तानची झोप उडाली, भारत बदला घेण्यासाठी ही रणनिती वापरण्याची भिती
पाकिस्तानची झोप उडाली, भारत बदला घेण्यासाठी ही रणनिती वापरण्याची भिती.
'त्या' झिपलाइन ऑपरेटवरील संशय खरा? NIA च्या चौकशीतून मोठी माहिती समोर
'त्या' झिपलाइन ऑपरेटवरील संशय खरा? NIA च्या चौकशीतून मोठी माहिती समोर.
भारतानं पाकला पाडलं उघडं, संरक्षणमंत्र्यांच्या वक्तव्याचा दाखला अन्...
भारतानं पाकला पाडलं उघडं, संरक्षणमंत्र्यांच्या वक्तव्याचा दाखला अन्....
पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या संरक्षण दलात मोठे बदल, 1 मे पासून...
पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या संरक्षण दलात मोठे बदल, 1 मे पासून....
गुजरात ड्रग्स प्रकरणाचा पहलगाम हल्ल्याशी थेट संबंध - एनआयएने
गुजरात ड्रग्स प्रकरणाचा पहलगाम हल्ल्याशी थेट संबंध - एनआयएने.
इलेक्ट्रिक वाहनांच्या पॉलिसीला राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी
इलेक्ट्रिक वाहनांच्या पॉलिसीला राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी.