Maharashtra Breaking News LIVE 24 December 2024 : नंदूरबारमध्ये दारूच्या नशेत डॉक्टर उपचार करत असल्याचा रुग्णांचा नातेवाईकांचा आरोप
Maharashtra Political News LIVE in Marathi : आज 24 डिसेंबर 2024. देश, विदेश, राज्य पातळीवरील राजकीय, सामाजिक, आर्थिक, गुन्हेगारी क्षेत्र, क्रीडा अन् मनोरंजन क्षेत्रातील महत्वाच्या घडामोडी जाणून घ्या. तुमच्या जिल्ह्यातील, तुमच्या गावातील बातमी तुम्हाला इथे वाचायला मिळेल.
LIVE NEWS & UPDATES
-
दिल्लीत बांगलादेशी घुसखोरांना मदत केल्याप्रकरणी 11 जणांना अटक
बांगलादेशी नागरिकांचे अवैध स्थलांतर करणारे मोठे रॅकेट दिल्लीत उघडकीस आले आहे. बनावट वेबसाइटद्वारे बनावट ओळखपत्र वापरून बनावट आधार, मतदार ओळखपत्र आणि इतर कागदपत्रे तयार करण्यात आली. बनावट वेबसाईटमागे दस्तऐवज बनावट, आधार ऑपरेटर आणि तांत्रिक तज्ञासह 11 आरोपींना अटक. अवैध स्थलांतरितांनी भारतीय हद्दीत घुसखोरी करण्यासाठी जंगल मार्ग आणि एक्स्प्रेस गाड्यांचा वापर केला. डीसीपी दक्षिण अंकित चौहान यांनी ही माहिती दिली आहे.
-
‘एक देश, एक निवडणूक’ या विषयावर 8 जानेवारीला जेपीसीची बैठक
‘एक देश एक निवडणूक’ या संयुक्त संसदीय समितीची (JPC) बैठक 8 जानेवारी 2025 रोजी होणार आहे.
-
-
सूक्ष्मजीवशास्त्रज्ञ डॉ. जी एम वारके यांच्या कार्यचरित्र डॉ जी एम पुस्तकाचे प्रकाशन
सूक्ष्मजीवशास्त्रज्ञ उद्योजक डॉ. गंगाधर मोतीराम वारके अर्थात डॉ.जी.एम. यांचे कार्यचरित्र ‘जीनियस जेम डॉ. जीएम’ या पुस्तकाचे प्रकाशन ठाण्यात पार पडले..ख्यातनाम व्याख्याते आणि प्रवचनकार डॉ. सच्चिदानंद शेवडे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या या कार्यक्रमास डॉ. उज्वला दळवी, पद्मविभूषण डॉ. जेष्ठराज जोशी, पद्मश्री सुधारक ओलवे, दीपस्तंभचे यजुवेंद्र महाजन, डॉ.गिरीश ब.महाजन आदीसह अनेक मान्यवर उपस्थित होते.
-
ठाण्यातील काही भागात दोन दिवस पाणी पुरवठा बंद
दिनांक 26 आणि 27 डिसेंबर रोजी पाणी पुरवठा 2 दिवस 24 तास पाणी पुरवठा बंद राहणार आहे. ठाणे महानगरपालिका क्षेत्रातील मुंब्रा, दिवा, कळवा, माजिवडा- मानपाडा व वागळे (काही भागात) प्रभाग समिती मध्ये महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळामार्फत पाणी पुरवठा केला जातो. महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या पाणी पुरवठा योजनेच्या अंतर्गत बारवी गुरूत्व वाहिनीवर कटाई नाका ते मुकुंद पर्यंतच्या जलवाहिनीवर देखभाल दुरूस्तीचे काम करण्यात येणार आहे. परिणामी, गुरूवार दिनांक 26/12/2024 रात्री 12.00 ते शुक्रवार दिनांक 27/12/2024 रात्री 12.00 वाजेपर्यत एकूण 24 तास पाणी पुरवठा बंद राहणार आहे.
-
नंदूरबारमध्ये दारूच्या नशेत डॉक्टर उपचार करत असल्याचा रुग्णांचा नातेवाईकांचा आरोप
नंदुरबारमधून संतापजनक बातमी समोर आली आहे. जिल्ह्यातील खांडबारा ग्रामीण रुग्णालयात रुग्णांच्या जीवाशी खेळ चालल्याचं समोर आलं आहे. दारूच्या नशेत डॉक्टर उपचार करत असल्याचा आरोप रुग्णांचा नातेवाईकांकडून करण्यात आला आहे. रुग्णाचे नातेवाईक आणि डॉक्टरात शाब्दिक वाद होत असल्याचा व्हिडिओ समोर आला आहे. रुग्णावर उपचार करत असताना चुकीच्या जागी इंजेक्शन दिल्याने डॉक्टर आणि रुग्णांच्या नातेवाईकांमध्ये वाद झाल्याचं समोर आलं आहे. जिल्हा शल्य चिकित्सक वर्षा लहाडे यांच्याशी फोनवर संपर्क साधला असता संबंधित प्रकरणाची चौकशी केली जात असल्याची माहिती देण्यात आली आहे. या प्रकरणात दोषी आढळल्यास कारवाई करणार असल्याचं आश्वासनही जिल्हा शल्य चिकित्सांनी दिलं आहे.
-
-
कल्याण पश्चिम भाजप उपाध्यक्ष ज्येष्ठ कार्यकर्ता हेमंत परांजपे मारहाण प्रकरणात 2 ओरीपांना बेड्या
कल्याण पश्चिम भाजप उपाध्यक्ष ज्येष्ठ कार्यकर्ता हेमंत परांजपे मारहाण प्रकरणात मोठी अपडेट समोर आली आहे. बाजारपेठ पोलिसांनी दोन आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत. संदीप महाले आणि सुरज भालेराव असे पोलिसांच्या तावडीत सापडलेल्या आरोपींची नावे आहेत. मारहाण करणाऱ्या मुख्य आरोपींना सोबत हे दोघेही असल्याची पोलिसांनी माहिती दिली आहे. कल्याण बाजारपेठ पोलीस थोड्याच वेळात दोन्ही आरोपींना कल्याण न्यायालयात करणार हजर आहेत. या गुन्ह्यात एकूण पाच ते सहा जणांवर गुन्हा दाखल झाला आहे. त्यापैकी तीन ते चार आरोपी अजूनही फरार असून बाजारपेठ पोलिसांची दोन ते तीन टीम आरोपीच्या शोधात आहे.
-
भिवंडीत निर्जनस्थळी तेरा वर्षांच्या मुलीचा मृतदेह आढळला
भिवंडी तालुक्यातील बापगावं येथील निर्जन ठिकाणी 13 वर्षीय अल्पवयीन मुलीचा मृतदेह आढळला आहे. या मुलीची हत्या झाल्याचे स्पष्ट झाले असून ती बेपत्ता असल्याची तक्रार कोळसेवाडी कल्याण पोलिस ठाण्यात काल दाखल झाली होती.
-
-
समुद्र किनारी फिरताना काळजी घ्या,पोलिसांचे आवाहन
समुद्र किनारी फिरताना स्वतःच्या जीवाची काळजी घ्या,सुरक्षेचे सर्व नियम पाळून पोलिसांना सहकार्य करा,रत्नागिरीत पर्यटनासाठी येणाऱ्या पर्यटकांना जिल्हा पोलिस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांनी आवाहन केले आहे.
-
एनडीएच्या प्रमुख नेत्यांची उद्या दिल्लीत बैठक
भाजप अध्यक्ष जेपी नड्डा यांच्या घरी उद्या दुपारी ४ वाजता एनडीएच्या प्रमुख नेत्यांची बैठक होणार आहे. यात सध्याच्या राजकीय स्थितीवर चर्चा होणार आहे
-
कल्याण-डोंबिवली महानगर पालिकेतील धक्कादायक घटना
कल्याण-डोंबिवली महानगर पालिकेतील धक्कादायक घटना समोर आली आहे. अधिकाऱ्यांकडून महिला कर्मचाऱ्याचा मानसिक छळ करून विनयभंग करण्यात आला आहे. संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी शिवसेना शिंदे गट आक्रमक झाला आहे. शिंदे गटाच्या महिला पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या आयुक्तांची भेट घेत कारवाई करण्याची मागणी केली आहे. कारवाई न केल्यास उग्र आंदोलनाचा इशारा दिला आहे.
-
आमदार तानाजी सावंत यांचे पुतणे धनंजय सावंत आणि केशव सावंत यांना धमक्या
माजी आरोग्यमंत्री, आमदार तानाजी सावंत यांचे पुतणे धनंजय सावंत आणि केशव सावंत यांना अज्ञात व्यक्तीकडून जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. धनंजय सावंत यांच्या घरासमोर पोलीस प्रशासनाचा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. या धमकीप्रकरणी ढोकी पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली आहे. विधानसभा निवडणुकीपूर्वी परंडा तालुक्यातील गोळीबार प्रकरणी आणि आता धमकी दिलेल्या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी धनंजय सावंत यांनी केली आहे.
-
अल्लू अर्जुनला होणार अटक? पोलिसांकडून पुन्हा चौकशी
हैदराबादच्या संध्या थिएटरमधील चेंगराचेंगरीमध्ये झालेल्या एका महिलेच्या मृत्यूप्रकरणी अभिनेता अल्लू अर्जुनला पोलिसांनी समन्स बजावले आहेत. त्यानंतर अल्लू अर्जुन चौकशीसाठी पोलीस ठाण्यात रवाना झाला आहे.
-
मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कारासाठी मनू भाकरचे नाव नसल्याने वाद
नवी दिल्ली- मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कारासाठी मनू भाकरचे नाव नसल्याने नव्या वादाला तोंड फुटले आहे. एकूण 15 खेळाडूंची अर्जुन पुरस्कारासाठी निवड करण्यात आली असून त्यात समितीकडून मनु भाकरचे नावच नाही. मात्र अद्याप नावांची निश्चिती झाली असल्याचे स्पष्टीकरण केंद्रीय क्रीडा मंत्रालयाने दिले आहे. पॅरिस ऑलिंपिकमध्ये दोन पदके जिंकूनही मनू भाकरच्या नावाची शिफारस नसल्याने नाराजी निर्माण झाली आहे. याबद्दल उद्यापर्यंत निर्णय घेतला जाणार असल्याची माहिती केंद्रीय क्रीडा मंत्रालयाने दिली.
-
लासलगाव बाजार समितीत कांद्याचे सरासरी बाजार भाव पंधराशे रुपयांपर्यंत कोसळले
लासलगाव (नाशिक)- लासलगाव बाजार समितीत कांद्याचे सरासरी बाजार भाव पंधराशे रुपयांपर्यंत कोसळलंय. गेल्या पंधरा दिवसांत नाशिक जिल्ह्यातील कांदा उत्पादकांचे बाजार भाव कोसळल्याने 60 कोटींहून अधिकचं नुकसान झालंय. कांद्यावरील 20 टक्के निर्यात शुल्क हटवा, अशी मागणी करण्यात येत आहे.
विक्री झालेल्या आणि विक्री होणाऱ्या कांद्याला 2 हजार रुपयांचं अनुदान देण्याची कांदा उत्पादकांची मागणी आहे. लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समिती सकाळच्या सत्रात 900 वाहनातून 15 हजार क्विंटल कांद्याची आवक झाली. या कांद्याला जास्तीतजास्त 2300 रुपये, कमीतकमी 700 रुपये तर सरासरी 1500 रुपये इतका दर मिळाला.
-
संजय शिरसाट यांची अचानक शासकीय वस्ती गृहाला भेट
सामाजिक न्याय विभागाचे मंत्री झाल्यानंतर संजय शिरसाट अॅक्टिव्ह मोडवर आलेले आहेत. त्यांनी छत्रपती संभाजीनगरमधील सामाजिक न्याय विभागाच्या वतीने चालत असलेल्या मागासवर्गीय मुलांच्या शासकीय वस्ती गृहाला अचानक भेट देत पाहणी केली.
-
मुंबई गोवा महामार्गावरील भोस्ते घाटात कंटेनरला अपघात
अवजड मशीन्स घेऊन जाणारा कंटेनर भोस्ते घाटात कलंडला. 100 मीटर अंतरापर्यंत डिव्हायडरला आदळत कंटेनर झाला पलटी. मागे पुढे गाडी नसल्यामुळे मोठा अनर्थ टळला. अपघातामध्ये कोणतीही जीवित हानी नाही. खेड पोलीस घटनास्थळी दाखल
-
गृह राज्यमंत्री होताच योगेश कदम Action मोडमध्ये
योगेश कदम यांनी नवी मुंबई पोलीस स्थानकास रात्री उशिरा अचानक दिली भेट. ड्रग्स विरोधी कारवाया अधिक कडक करा, असे पोलिसांना आदेश. शाळा, कॉलेज यामध्ये वाढणारे ड्रग्स सेवनाचे गंभीर प्रकार. महिला अत्याचार, सायबर गुन्हेगारी तसेच गंभीर गुन्हे व पोलीस स्टेशनमध्ये चालू असलेल्या कार्यपद्धतीचा घेतला आढावा तसेच पोलिस बांधवांशी संवाद साधून सोयी सुविधांची विचारपूस केली.
-
हेमंत परांजपे मारहाण प्रकरण
कल्याण पश्चिम भाजप उपाध्यक्ष ज्येष्ठ कार्यकर्ता हेमंत परांजपे मारहाण प्रकरण. बाजारपेठ पोलिसांनी दोन आरोपींना ठोकल्या बेड्या. संदीप माने आणि सुरज भालेराव अशी पोलिसांच्या तावडीत सापडलेल्या आरोपींची नावे. तीन ते चार आरोपी अजूनही फरार. बाजारपेठ पोलिसांची दोन ते तीन टीम आरोपीच्या शोधात.
-
बीडच्या खऱ्या आरोपींना पकडण्याची हिंमत फडणवीसांमध्ये आहे का ? संजय राऊत
बीडच्या खऱ्या आरोपींना पकडण्याची हिंमत फडणवीसांमध्ये आहे का ? संजय राऊतांचा थेट सवाल
-
महाराष्ट्राची परिस्थितीत बिहारपेक्षाही वाईट – संजय राऊत
महाराष्ट्राची परिस्थितीत बिहारपेक्षाही वाईट, फडणवसीांनी मुख्यमंत्री म्हणून परभणीत जायला हवं होतं. बीड घटनेसंदर्भात ज्यांच्यावर रोष आहे ते फडणवीसांच्या मंत्रीमंडळात आहेत – संजय राऊतांची टीका
-
मागच्यावेळी पालकमंत्रीपद भाड्याने दिलं होतं – सुरेश धस यांचा धनंजय मुंडेवर अप्रत्यक्ष निशाणा
एकनाथ शिंदे बीडचे पालकमंत्री झाले तरी चालतील, फडणवीस किंवा अजित पवारांनी बीडचं पालकमंत्रीपद स्वीकारावं.
मागच्यावेळी पालकमंत्रीपद भाड्याने दिलं होतं असं म्हणत सुरेश धस यांनी धनंजय मुंडेंवर अप्रत्यक्ष निशाणा साधला.
-
बीड जिल्ह्यात गँग ऑफ वासेपूर सुरू आहे – सुरेश धस
बीड जिल्ह्यात कायदा सुव्यवस्था आहे की नाही हा प्रश्न पडला आहे. बीड जिल्ह्यात गँग ऑफ वासेपूर सुरू आहे अशी टीका सुरेश धस यांनी केली आहे.
पोलीस तसेच सीआयडी अधिकारी आरोपींच्या मागावर आहेत, आरोपीला लवकरच अटक होईल अशी अपेक्षा आहे.
आरोपी विष्णू चाटे हा आकाच्या खालचा छोटे आका यांचे हस्तक आहेत. आकावर खंडणीप्रकरणासह हत्या प्रकरणातही कारवाई व्हावी अशी मागणी धस यांनी केली आहे.
-
संतोष देशमुखांच्या हत्येमुळे लोकांमध्ये मोठा रोष – सुरेश धस
संतोष देशमुखांच्या हत्येमुळे लोकांमध्ये मोठा रोष. हत्याप्रकरणात मुख्यमंत्र्यांनी सकारात्मक निवेदन केलं आहे. आरोपींना 15 दिवसांची पोलीस कोठडी ही समाधानाची बाब आहे , असे सुरेश धस म्हणाले.
-
उल्हासनगरमध्ये हिट अँड रनची घटना, मद्यधुंद कारचालकाने 2-3 वाहनांना उडवलं
उल्हासनगरमध्ये हिट अँड रनची घटना, मद्यधुंद कारचालकाने 2-3 वाहनांना उडवलं. व्हीनस चौक रस्त्यावर पहाटेच्या सुमारास झालेल्या या अपघातात 9 जण जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
-
कोल्हापूर च्या काळमवाडी धरणाच्या गळतीचा प्रश्न गंभीर
कोल्हापूर च्या काळमवाडी धरणाच्या गळतीचा प्रश्न गंभीर बनला असून आज राज्याची तज्ञ समिती गळतीची पाहणी करणार आहे.
काळमवाडी धरणाची गळती रोखण्यासाठी राज्य सरकारकडून 80 कोटीच्या निधीची तरतूद करण्यात आली आहे. पुढील महिन्यापासून गळती काढण्याच्या कामाला सुरुवात होणार असून त्यापूर्वी तज्ञ समिती पाहणी करणार आहे. गळतीमुळे धरणाच्या भिंतीतून लाखो लिटर पाणी वाया जात आहे.
-
नाशिकच्या पालकमंत्री पदावरून महायुतीमध्ये रस्सीखेच सुरू
नाशिकच्या पालकमंत्री पदावरून महायुतीमध्ये रस्सीखेच सुरू आहे. सर्वाधिक जागा असल्याने राष्ट्रवादीची दावेदारी मजबूत तर मागील कामांचा संदर्भ देत दादा भुसेंकडून देखील पालकमंत्री पदावर दावा करण्यात आला आहे. मात्र दुसरीकडे सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर गिरीश महाजन यांनी देखील पालकमंत्रीपदासाठी दावा केला आहे. ऐनवेळी भाजपाकडून खेळीची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.
महाराष्ट्राचे माजी आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना जीवे मारण्याची धमकी मिळाली आहे. तुमचाही संतोष देशमुख केला जाईल अशी धमकी धाराशिवचे माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष धनंजय सावंत व केशव सावंत यांना पत्रातून देण्यात आली आहे. नाशिकच्या पालकमंत्री पदावरून रस्सीखेच सुरू आहे. सर्वाधिक जागा असल्याने राष्ट्रवादीची दावेदारी मजबूत आहे तर मागील कामांचा संदर्भ देत दादा भुसेंकडून देखील पालकमंत्री पदावर दावा करण्यात आला आहे. कोल्हापूर जिल्ह्यात थंडीचा कडाका वाढला असून राधानगरी धरण परिसरात धुक्याची चादर पसरली आहे. राज्यात 26 आणि 27 डिसेंबरला मेघगर्जनेसह जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. 26 तारखेला धुळे, नंदुरबार, जळगाव, नाशिकमध्ये तर 27 तारखेला अहिल्यानगर, सभाजीनगर, पुणे, जालना, बीडसह इतर जिल्ह्यांत पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. यांसह अनेक महत्त्वाच्या घडामोडी जाणून घेण्यासाठी हा ब्लॉग दिवसभर फॉलो करा.
Published On - Dec 24,2024 9:09 AM