Maharashtra Breaking News LIVE : पंकजा मुंडे यांना विधान परिषदेची उमेदवारी जाहीर झाल्याने आनंदी: देवेंद्र फडणवीस

| Updated on: Jul 02, 2024 | 2:05 AM

Maharashtra Political News LIVE in Marathi : आज 1 जुलै 2024. देश, विदेश, राज्य पातळीवरील राजकीय, सामाजिक, आर्थिक, गुन्हेगारी क्षेत्र, क्रीडा अन् मनोरंजन क्षेत्रातील महत्वाच्या घडामोडी जाणून घ्या. तुमच्या जिल्ह्यातील, तुमच्या गावातील बातमी तुम्हाला इथे वाचायला मिळेल.

Maharashtra Breaking News LIVE : पंकजा मुंडे यांना विधान परिषदेची उमेदवारी जाहीर झाल्याने आनंदी: देवेंद्र फडणवीस

विधान परिषदेच्या शिक्षक आणि पदवीधर मतदार संघातील चार जागांसाठी झालेल्या निवडणुकीची आज मतमोजणी होत आहे. या चार जागांवर वर्चस्व कोण राखते? याकडे महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे. या निवडणुकीत महायुतीमध्ये मैत्रीपूर्ण लढत झाली होती. संसदेचे अधिवेशन सुरु आहे. दोन दिवसांच्या विश्रांतीनंतर सोमवारी पुन्हा विरोधक सरकारला घेरण्याची तयारी करणार आहे. नीटच्या मुद्यावरुन सरकारला अडचणीत आणण्याचा प्रयत्न विरोध करत आहे. राज्यातील अनेक भागांमध्ये पाऊस सुरु आहे. अमरावती जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थेच्या शाळा आजपासून सुरू झाल्या आहेत. यासह अन्य महत्वाच्या बातम्या क्रीडा, मनोरंजन, राजकीय क्षेत्रातील बातम्या तुम्हाला या ब्लॉगमध्ये वाचायला मिळतील. त्यामुळे आज दिवसभर हा ब्लॉग फॉलो करा.

LIVE NEWS & UPDATES

The liveblog has ended.
  • 01 Jul 2024 06:52 PM (IST)

    एनडीएची उद्या बैठक होणार असून दोन्ही सभागृहातील खासदार उपस्थित राहणार

    एनडीएच्या संसदीय पक्षाची उद्या सकाळी 9.30 वाजता बैठक होणार आहे. संसद भवनातील ग्रंथालय इमारतीत ही बैठक होणार आहे. एनडीएच्या दोन्ही सभागृहातील खासदार उपस्थित राहणार आहेत. संसदेचे चालू अधिवेशन संपण्यापूर्वी ही बैठक महत्त्वाची आहे. तेथे पंतप्रधान मोदी संबोधित करणार आहेत.

  • 01 Jul 2024 06:37 PM (IST)

    मी राज्यसभेत होतो, राहुल गांधींचे वक्तव्य ऐकू शकलो नाही: राघव चढ्ढा

    आम आदमी पक्षाचे नेते राघव चढ्ढा म्हणाले की, मी राज्यसभेत असल्यामुळे राहुल गांधींचे लोकसभेत केलेले भाषण ऐकू शकले नाही. त्यांच्या या वक्तव्याची लोकांमध्ये चर्चा होत आहे.

  • 01 Jul 2024 06:25 PM (IST)

    मानहानीच्या प्रकरणात मेधा पाटकर यांना 5 महिन्यांची शिक्षा, 10 लाखांचा दंड

    दिल्लीचे लेफ्टनंट गव्हर्नर विनय कुमार सक्सेना यांनी दाखल केलेल्या 23 वर्षे जुन्या गुन्हेगारी मानहानीच्या प्रकरणात दिल्लीच्या साकेत न्यायालयाने सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांना 5 महिन्यांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे. सक्सेना यांना 10 लाख रुपयांची नुकसान भरपाई देण्याचे आदेश पाटकर यांना दिले आहेत.

  • 01 Jul 2024 06:10 PM (IST)

    बनावट व्हिसा प्रकरणातील मास्टरमाईंडला मुंबईत अटक

    मुंबई गुन्हे शाखेने नौदलाचे लेफ्टनंट कमांडर विपिन कुमार डागर यांना अनेक एजन्सींकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे अटक केली होती. बनावट पासपोर्ट आणि व्हिसा बनवून लोकांना दक्षिण कोरियाला पाठवत होता, तसेच पदाचा गैरवापर करत असल्याचा आरोप आहे. गुन्हे शाखेच्या म्हणण्यानुसार, या प्रकरणाचा मुख्य सूत्रधार सब-लेफ्टनंट ब्रह्म ज्योती यालाही अटक करण्यात आली आहे. याच्या सूचनेवर विपीन डांगर काम करत होता, गुन्हे शाखेचं म्हणणं आहे.

  • 01 Jul 2024 05:38 PM (IST)

    राहुल गांधींनी संसदेत हिंदूंची माफी मागितली पाहिजे: देवेंद्र फडणवीस

    “पंकजा मुंडे यांना विधान परिषदेची उमेदवारी केंद्राने जाहीर केलीय. याचा आनंद आहे. पंकजा ताईंना विधान परिषदेत स्थान दिले जावे असा आमच्या सगळ्यांचा आग्रह होता. तो भाजप केंद्रीय समितीने मान्य केला त्याबद्दल मी आभार मानतो. तसेच  राहुल गांधींनी हिंदूंना हिसंक म्हटले, हिंदूंचा अपमान केला. त्यांनी त्यांचे विधान मागे घ्यावे. आम्ही त्याचा निषेध करतो. त्यांनी संसदेत हिंदूंची माफी मागितली पाहिजे” अशी मागणी देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.

  • 01 Jul 2024 05:22 PM (IST)

    राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर पंतप्रधान मोदी संध्याकाळी चार वाजता संबोधन करणार

    राजकीय वर्तुळातून मोठी बातमी समोर आली आहे. लोकसभेचं पावसाळी अधिवेशन सुरु आहे. मंगळवारी 2 जुलै रोजी अधिवेशनच्या सातव्या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी संबोधन करणार आहेत. मोदी दुपारी 4 वाजता बोलणार आहेत. राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर पंतप्रधान मोदी संबोधन करणार आहेत

  • 01 Jul 2024 04:54 PM (IST)

    अंबादास दानवे यांची सभागृहात प्रसाद लाड यांना शिवीगाळ

    अंबादास दानवे यांनी सभागृहात शिवीगाळ केल्याचा आरोप प्रसाद लाड यांनी केला आहे. त्यामुळे सभागृहात भाजपने त्यांच्या राजीनाम्याची आणि माफी मागण्याची मागणी केली आहे.

  • 01 Jul 2024 04:49 PM (IST)

    लाडली बहीण योजनेच्या अर्जासाठी सोलापूरच्या सेतू कार्यालयात महिलांची मोठी गर्दी

    लाडली बहीण योजनेच्या अर्जासाठी सोलापूरच्या सेतू कार्यालयात महिलांची मोठी गर्दी होत आहे. राज्य सरकारने आणलेल्या लाडली बहीण योजनेची कागदपत्र काढण्यासाठी महिलांची मोठी गर्दी. राज्य सरकारच्या नव्या योजनेला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद. या योजनेचा लाभ घेण्यासाठी उत्पन्नाचा दाखला आणि रहिवाशी दाखला गरजेचा आहे. हे दाखले काढण्यासाठी महिलांची सेतू कार्यालयात मोठी गर्दी.

  • 01 Jul 2024 04:36 PM (IST)

    कांदिवली पश्चिमेतील फाटक रोडवर रिक्षावर मोठे झाड कोसळले

    कांदिवली पश्चिमेतील फाटक रोडवर मोठे झाड पडले आहे. हे झाड पडल्याने कार आणि ऑटो रिक्षाचे नुकसान झाले आहे. सध्या या घटनेत कोणीही जखमी झालेले नाही. बीएमसीचे पथक घटनास्थळी पोहोचले असून झाड तोडून ते रस्त्यावरुन हटवले जात आहे.

  • 01 Jul 2024 04:17 PM (IST)

    पंकजा मुंडे यांना विधानपरिषदेची उमेदवारी जाहीर, परळीत जल्लोष

    बीड: पंकजा मुंडेंना विधानपरिषद उमेदवारी जाहीर झाल्याने परळीत जल्लोष सुरू आहे. मंत्री धनंजय मुंडेंच्या कार्यालयासमोर जल्लोष होत आहे. राष्ट्रवादी कार्यालयासमोर फटाके वाजवून जल्लोष करण्यात आला. धनंजय मुंडे समर्थकांनी एकमेकांना पेढे भरविले.

  • 01 Jul 2024 03:58 PM (IST)

    स्पीकरपेक्षा मोठे कोणी नाही, मग PMसमोर तुम्ही का झुकला ?- राहुल गांधी

    पंतप्रधान मोदींशी हात मिळवताना स्पिकर झुकले. संसदेच्या सभागृहात स्पीकरपेक्षा कोणी मोठे नाही असे विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांनी म्हटले आहे.

  • 01 Jul 2024 02:57 PM (IST)

    प्रकाश आंबेडकर यांची प्रतिक्रिया काय?

    नागपुरातील दीक्षाभूमी परिसरातील भूमिगत पार्किंगचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. वंचितचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी यावर भाष्य केलं आहे. तिथं येणाऱ्या अनुयायांच्या किंवा इतर कुणाच्याही पार्किंगची अडचण नाही. पण या जागेचं व्यावसायिकरण केलं जात आहे, हे योग्य नाही. आम्ही आंदोलकांच्या सोबत आहोत, असं आंबेडकर म्हणाले.

  • 01 Jul 2024 02:51 PM (IST)

    दीक्षाभूमी परिसरातील भूमिगत पार्किंगला स्थगिती

    लोकभावना पाहून नागपुरातील दीक्षाभूमी परिसरातील भूमिगत पार्किंगला स्थगिती देण्यात येत आहे. स्मारक समितीशी चर्चा करून सरकारने आराखडा तयार केला होता. मात्र आता त्याला स्थगिती देण्यात येत आहे. त्यामुळे स्मारक समितीशी चर्चा केल्यानंतर या बाबतचा अंतिम निर्णय घेण्यात येईल. त्यांच्याशी चर्चा करून मगच त्याचं पुढचं काम करण्यात येईल, असं देवेंद्र फडणवीस विधानसभेत बोलताना म्हणाले.

  • 01 Jul 2024 02:40 PM (IST)

    जितेंद्र आव्हाड काय म्हणाले?

    नागपुरातील दीक्षाभूमी परिसरातील भूमिगत पार्किंगच्या मुद्द्यावर राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी प्रतिक्रिया दिली आहे. बौद्ध अनुयायी यांना विश्वासात न घेता श्रद्धास्थानाला धक्का लावण्याचं काम सुरू आहे. नको ते करायला जाता कशाला….? ताबडतोब काम थांबवा. दिक्षाभूमीला डिसर्टब करु नका. तुम्हाला काय करायच ते तुम्ही कस्तुरचंद पार्कमध्ये जाऊन करा, असं जितेंद्र आव्हाड म्हणाले आहेत.

  • 01 Jul 2024 02:30 PM (IST)

    दीक्षाभूमी परिसरातील भूमिगत पार्किंगच्या मुद्द्याचे विधानसभेत पडसाद

    नागपुरातील दीक्षाभूमी परिसरातील भूमिगत पार्किंगचा मुद्दा विधानसभेत उपस्थित झाला. काँग्रेस नेते नितीन राऊत यांनी यावर भाष्य केलं. पार्किंगमध्ये किती गाड्या पार्क होणार? त्या ठिकाणी खरंच दीक्षाभूमी परिसरात भूमिगत पार्किंगची आवश्यकता आहे का? हा लोक भावनेचा विषय आहे. सरकार या विषयी सभागृहात माहिती सादर करणार आहे का?, असं नितीन राऊत यांनी म्हटलं आहे.

  • 01 Jul 2024 02:20 PM (IST)

    दीक्षाभूमी परिसरात पोलिसांकडून महत्वाचं आवाहन

    नागपुरातील दीक्षाभूमी परिसरातील भूमिगत पार्किंगचा मुद्दा तापला आहे. जाळपोळ अन् तोडफोड केली जात आहे. दरम्यान या ठिकाणी पोलीस दाखल झाले आहेत. पोलिसांकडून शांततेचं आवाहन करण्यात आलं आहे.

  • 01 Jul 2024 02:10 PM (IST)

    दीक्षाभूमी परिसरातील भूमिगत पार्किंगचा मुद्दा तापला

    नागपुरातील दीक्षाभूमी परिसरातील भूमिगत पार्किंगचा मुद्दा तापला आहे. भूमिगत पार्किंगमुळे स्तुपाला धोका निर्माण होऊ शकतो, त्यामुळे या पार्किंगला आंबेडकरांच्या अनुयायांचा विरोध आहे. समाजकंटकांकडून बांधकामाची तोडफोड करण्यात आली आहे. स्मारक समितीची बैठक होणार होती. मात्र ती रद्द करण्यात आली आहे.

  • 01 Jul 2024 01:54 PM (IST)

    दीक्षाभूमी परिसरात भूमिगत पार्किंगला काही संघटनांचा विरोध

    दीक्षाभूमी परिसरात भूमिगत पार्किंगला काही संघटनांकडून विरोध केला जातोय. आज कार्यकर्त्य आक्रमक झाल्याचे बघायला मिळतंय.

  • 01 Jul 2024 01:38 PM (IST)

    मुंबई पदवीधर मतपत्रिकांची जुळवणी पूर्ण

    एकूण 67 हजार 644 मतपत्रिकांची जुळवणी पूर्ण झाली. मतपत्रिकांच वैध-अवैध तपासणी सुरु. त्यानंतर कोटा ठरेल.

  • 01 Jul 2024 01:19 PM (IST)

    स्पर्धा परीक्षेसाठी नवीन कायदा आणणार- देवेंद्र फडणवीस

    नुकताच देवेंद्र फडणवीस यांनी मोठे भाष्य केले आहे. देवेंद्र फडणवीस म्हणाले की, स्पर्धा परीक्षेसाठी नवीन कायदा आणणार आहोत.

  • 01 Jul 2024 01:13 PM (IST)

    विधान परिषद कोकण पदवीधर तसेच मुंबई शिक्षक व मुंबई पदवीधर मतदार संघाची मतमोजणी

    कोकण पदवीधर मतदारसंघ • 321 केंद्रातील एकूण मतपत्रिकांची मोजणी 8 फेऱ्यांमध्ये पूर्ण. • एकूण 1 लाख 43 हजार 297 मतपत्रिका योग्यरित्या आढळल्या. • आता प्रत्येक टेबलवर 1 हजार मतपत्रिका देण्यात आल्या आहेत यातून वैध व अवैध मतपत्रिकांची तपासणी सुरु. एकूण 4 फेऱ्या होतील. • त्यानंतर अवैध मतपत्रिका वगळून वैध मतांचा कोटा ठरवला जाईल.

  • 01 Jul 2024 01:03 PM (IST)

    उद्धव ठाकरे यांनी घेतली नाशिकमध्ये झालेल्या गोंधळाची माहिती

    मतमोजणी दरम्यान दोन वेळेस जादा मतपत्रिका आढळून आल्या. सुरुवातीला चोपडा मधील मतपेटीत जादा मतपत्रिका. त्यानंतर निफाड व एवढ्या मधील पेटीमध्ये देखील आढळून आल्या ज्यादा मतपत्रिका

  • 01 Jul 2024 12:57 PM (IST)

    Maharashtra News : मुंबई शिक्षक मतदारसंघाचा कोटा ठरला

    मुंबई शिक्षक मतदारसंघाचा कोटा ठरल्याची माहिती समोर येत आहे. उमेदवाराला जिंकण्यासाठी पहिल्या पसंतीचे 5,800 मत लागणार… मुंबई शिक्षकमधील 402 मतपत्रिका अवैध ठरल्या… एकूण 12 हजार मतपत्रिकांची तपासणी पूर्ण…

  • 01 Jul 2024 12:47 PM (IST)

    Maharashtra News : परळीतील सरपंच हत्याप्रकरण, पोलिसांनी 6 जणांना ताब्यात घेतलं

    परळीतील सरपंच हत्याप्रकरण, पोलिसांनी 6 जणांना ताब्यात घेतलं… आरोपींना पळून जाण्यास मदत करणाऱ्यांना पोलिसांनी पकडलं… मुख्य आरोपी बबन गित्तेसह 4 आरोपी अद्याप फरार

  • 01 Jul 2024 12:30 PM (IST)

    Maharashtra News : सिबीलच्या नावाखाली शेतकऱ्यांना पीक कर्ज नाकारले

    पीक कर्ज नाकारणाऱ्या बँकेच्या मॅनेजरला भाजप कार्यकर्त्यांने धरले धारेवर… छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यातील लासुर गावातील घटना…लासूर गावातील सेंट्रल बँक ऑफ इंडियाने शेतकऱ्यांना नाकारले कर्ज… सिबिल खराब असल्यामुळे नाकारले कर्ज… कर्ज करणाऱ्या बँकेत जाऊन मॅनेजरला भाजप कार्यकर्त्यांनी धरले धारेवर… भाजप कार्यकर्ते रवी चव्हाण यांनी बँक मॅनेजरची केली कान उघडणी

  • 01 Jul 2024 12:15 PM (IST)

    Maharashtra News : पुण्यात वारकऱ्यांच्या टेम्पोला किरकोळ अपघात

    वारकऱ्यांचा टेम्पो उलटून 5 वारकरी जखमी तर 20 जणांना दुखापत… पुण्यातील कात्रज कोंढवा रस्त्यावरील घटना… काल रात्री वारीसाठी पुण्यात दाखल झालेल्या टेम्पोला अपघात… हा टेम्पो परभणी वरून पंढरपूरकडे निघाला होता. यातील वीस वारकरी हे मुक्कामाच्या ठिकाणी जात असताना घडली घटना… कात्रज कोंढवा रस्त्यावर चालकाचा टेम्पो वरील ताबा सुटल्याने अपघात… पाचही वारकऱ्यांना उपचार देऊन सोडण्यात आलं… टेम्पो चालका विरोधात भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल

  • 01 Jul 2024 12:05 PM (IST)

    Maharashtra News : नाशिक शिक्षक मतदारसंघात मतमोजणी प्रक्रियेत पुन्हा 2 मतपत्रिका जास्त आढळल्या

    नाशिक शिक्षक मतदारसंघात मतमोजणी प्रक्रियेत पुन्हा 2 मतपत्रिका जास्त आढळल्या… नाशिक जिल्ह्यातील निफाड आणि येवला तालुक्यातील मतपेटीत प्रत्येकी 1 मतपत्रिका जास्त आढळून आली… ठाकरे गटाने पुन्हा घेतला आक्षेप.. याआधी 3 मतपत्रिका जास्त आढळून आल्या होत्या…

  • 01 Jul 2024 11:50 AM (IST)

    नीट परीक्षा घोटाळ्यावरून लोकसभेत विरोधकांचा गोंधळ

    अध्यक्षांनी नीट परीक्षा घोटाळ्यावर चर्चेला परवानगी नाकारल्यानंतर लोकसभेत विरोधकांनी गोंधळ केला. “नीट परीक्षेवर एक दिवस सभागृहात चर्चा व्हावी. दोन कोटी विद्यार्थ्यांचा हा प्रश्न आहे. आम्हाला विद्यार्थ्यांना संदेश द्यायचा आहे,” असं राहुल गांधी म्हणाले.

  • 01 Jul 2024 11:50 AM (IST)

    पेपरफुटीविरोधात याच अधिवेशनात कायदा आणणार का? रोहित पवारांचा सवाल

    पेपरफुटीचा कायदा कधी आणला जाणार? पेपरफुटीविरोधात याच अधिवेशनात कायदा आणणार का? असा सवाल रोहित पवार यांनी विधानसभेत केला.

  • 01 Jul 2024 11:40 AM (IST)

    कर्मचारी वर्गाला वाऱ्यावर सोडणार नाही- अजित पवार

    विधानसभेत पेन्शनच्या मुद्द्यावरून चर्चा होत आहे. निवृत्तीनंतर पेन्शन मिळालीच पाहिजे. सुप्रीम कोर्टाचा निर्णय सर्वांना ऐकावा लागेल. पेन्शनबाबतच्या निर्णयांची माहिती केंद्रानं मागिवली आहे. कर्मचारी वर्गाला वाऱ्यावर सोडणार नाही, असं अजित पवार म्हणाले.

  • 01 Jul 2024 11:30 AM (IST)

    लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी सर्व खासदारांना सुनावलं

    लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी सर्व खासदारांना सुनावलं. अनेक खासदारांनी शपथ घेताना दिलेल्या घोषणा आणि केलेल्या वक्तव्यांचा बिर्ला यांनी समाचार घेतला. भविष्यात यापुढे खासदारांनी शपथ कशी घ्यावी यासाठी विशेष समिती स्थापन करण्यात येणार आहे.

  • 01 Jul 2024 11:25 AM (IST)

    विधानसभेत पेपरफुटीच्या मुद्द्यावर चर्चा

    57 हजार नव्या नियुक्त्या आपण केल्या आहेत. पेपरफुटी प्रकरणी एक गुन्हा दाखल झाला आहे. 77 हजार 305 लोकांना राज्य सरकारने नोकरी दिली, अशी माहिती देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत दिली.

  • 01 Jul 2024 11:20 AM (IST)

    विधीमंडळ पावसाळी अधिवेशनाचा आज चौथा दिवस

    विधीमंडळ पावसाळी अधिवेशनाचा आज चौथा दिवस आहे. विधानसभेत अजित पवार म्हणाले, “निवृत्त झाल्यानंतर पेन्शन मिळाली पाहिजे, त्याबद्दल दुमत नाही. सरकार आल्यावर पेन्शन सुरू करू असं काहींनी जाहीरनाम्यावरच दिलं.”

  • 01 Jul 2024 11:10 AM (IST)

    कल्याणीनगर अपघातप्रकरणी पुणे पोलिसांकडून चार्जशीट दाखल

    कल्याणीनगर अपघातप्रकरणी पुणे पोलिसांकडून चार्जशीट दाखल करण्यात आलं आहे. 169 पानांचं आरोपपत्र पुणे पोलिसांनी दाखल केलं आहे. पुणे पोलिसांकडून केवळ सव्वा महिन्यात आरोपपत्र दाखल झालं आहे. कल्याणी नगर अपघात प्रकरणाचा संपूर्ण तपशील आरोपपत्रात नोंदवला आहे.

  • 01 Jul 2024 10:57 AM (IST)

    विधानभवांच्या पायऱ्यांवर विरोधकांच्या आंदोलनाला सुरूवात

    विधानभवांच्या पायऱ्यांवर विरोधकांच्या आंदोलनाला सुरूवात. नीट परीक्षेतला गोंधळ,पेपरफुटी,पुनर्विकास प्रकल्पाच्या संदर्भात घोषणाबाजी केली जात आहे

  • 01 Jul 2024 10:49 AM (IST)

     लोणावळ्यामध्ये भुशी डॅमच्या बॅकवॉटरमधील धबधब्यावरील दुर्घटना, आणखी एक मृतदेह सापडला

    लोणावळ्यामध्ये भुशी डॅमच्या बॅकवॉटरमधील धबधब्यावर झालेल्या दुर्घटनेतील आणखी एक मृतदेह सापडला आहे.  शेवटच्या मृतदेहासाठी शोधकार्य सुरू आहे.  एकाच कुटुंबातील पाच जण वाहून गेल्याची घटना रविवारी दुपारी तीनच्या सुमारास घडली होती. त्यातील तिघांचे मृतदेह काल सापडले तरस चौथ्या व्यक्तीचा मृतदेहही हाती लागला आहे.

  • 01 Jul 2024 10:37 AM (IST)

    पुणे पोलिसांची धडक कारवाई, मोबाईल चोरी व लॅपटॉप चोरी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश, 13 लाखांचा मुद्देमाल जप्त

    पुणे पोलिसांनी धडक कारवाई करत शहरात मोबाईल चोरी व लॅपटॉप चोरी करणाऱ्या टोळीला बेड्या ठोकल्या. स्वारगेट बस स्थानक तसेच पुणे शहरात मोबाईल चोरी व लॅपटॉप चोरी करणाऱ्या राज्य व आंतरराज्य टोळीचा पर्दाफाश करण्यात आला असून 13 लाखांचे 120 मोबाईल आणि लॅपटॉप पोलिसांनी जप्त केलेत. या प्रकरणी 4 आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे.

  • 01 Jul 2024 10:30 AM (IST)

    विधानसभा निवडणूक एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वात लढवणार – मनीषा कायंदे

    विधानसभा निवडणूक एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वात लढवणार असं शिंदे गटाच्या नेत्या मनीषा कायंदे यांनी म्हटलं आहे. तर शिंदे यांचा चेहरा समोर करूनच निवडणुका लढवल्या जातील असं वक्तव्य संजय गायकवाड यांनी केलं आहे. शाह आणि फडणवीसांनीही शिंदेंच्याच चेहऱ्यावर निवडणूक लढवणार असल्यांचं सांगितलं आहे, असंही गायकवाड यांनी नमूद केलं.

    अजित पवार मुख्यमंत्रीपदाचे दावेदार हा त्यांच्या पक्षाचा विषय असल्याचंही गायकवाड यांनी स्पष्ट केल.

  • 01 Jul 2024 10:10 AM (IST)

    विधानपरिषद निवडणूक बिनविरोध ‌करण्यासाठी महाविकास आघाडी आग्रही

    विधानपरिषद निवडणूक बिनविरोध ‌करण्यासाठी महाविकास आघाडी आग्रही. महाविकास आघाडीकडे 72 आमदारांचा पाठिंबा असल्याचा दावा.

    तिसरा उमेदवार उतरवायच्या महाविकास आघाडीच्या हालचाली सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

  • 01 Jul 2024 09:51 AM (IST)

    Maharashtra News : मुंबई शिक्षक मतदार संघाच्या निवडणुकीची आज मतमोजणी

    मुंबई शिक्षक मतदार संघाच्या निवडणुकीची आज मतमोजणी होणार आहे. शिक्षक मतदारसंघाचे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार जगन्नाथ अभ्यंकर यांनी आपला विजय निश्चित असल्याचे सांगितले. निवडणुकीच्या वेळी जनतेने चांगला प्रतिसाद दिला आहे. मतदारांमध्ये उत्साह होता. निवडणूक जिंकल्यानंतर जुनी पेन्शन योजनेसह अनेक कामे करणार आहे, असं त्यांनी सांगितलं.

  • 01 Jul 2024 09:49 AM (IST)

    Maharashtra News : अमरावती जिल्ह्यात शेतकरी चिंतेत

    अमरावती जिल्ह्यात पावसाने दांडी मारल्याने शेतकरी चिंतेत. अमरावती जिल्ह्यात केवळ 35 टक्केच पेरण्या. अमरावती जिल्ह्यात पावसाने खंड दिल्याने शेतकरी चिंतेत सापडला आहे. अमरावती जिल्ह्यात पावसाने दडी मारल्याने 65 टक्के पेरण्या रखडल्या असून अमरावती जिल्ह्यात आतापर्यंत केवळ 35 टक्के पेरण्या झाल्या आहेत.

  • 01 Jul 2024 09:23 AM (IST)

    Maharashtra News : लोणावळ्याला पावसाने झोडपलं

    लोणावळ्याला पावसाने झोडपले असून इंद्रायणी नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली. कार्ला मळवली या गावांना जोडणाऱ्या इंद्रायणी नदीवरील पुलाचे काम संथगतीने सुरू असल्याने त्याचा फटका चार गावांना बसला आहे. यापुलाचे काम सुरू असताना ग्रामस्थांना रहदारीसाठी नदीवर एक साकव पूल तयार करण्यात आला होता. मात्र, पाणी पातळीत वाढ झाल्याने हा पूल वाहून गेलाय, त्यामुळे या गावातील दळणवळण यंत्रणा ठप्प होण्याची चिंता ग्रामस्थांना पडली आहे.

  • 01 Jul 2024 09:11 AM (IST)

    Maharashtra News : पदवीधर निवडणूक मतमोजणीला सुरुवात

    विधानपरिषदेच्या कोकण पदवीधर तसेच मुंबई पदवीधर व शिक्षक मतदारसंघाच्या द्विवार्षिक निवडणुकीची मतमोजणी नवी मुंबईतील नेरुळ येथील आगरी कोळी भवन येथे आज सकाळी सुरू झाली.

  • 01 Jul 2024 08:57 AM (IST)

    Marathi News: नाशिकमध्ये आज मतमोजणी

    शिक्षक मतदार संघाच्या निवडणुकीसाठी नाशिकमध्ये आज मतमोजणी होत आहे. सकाळी आठ वाजल्यापासून मतमोजणी सुरू झाली. 30 टेबलवर मतमोजणी होणार आहे. एका टेबलवर सहा असे 180 कर्मचारी मतमोजणी करणार आहे. नाशिक मतदार संघात शिक्षक मतदार संघाच्या निवडणुकीसाठी सरासरी 93 टक्के मतदान झाले.

  • 01 Jul 2024 08:43 AM (IST)

    Marathi News: पुण्यातील ड्रग्स प्रकरणात आरोपींची पोलीस कोठडी वाढली

    पुण्यातील ड्रग्स प्रकरणात आरोपींची पोलीस कोठडी वाढली आहे. न्यायालयाने आरोपींच्या कोठडीत २ तारखेपर्यंत वाढ केली आहे. पब बार चालक आणि मालक सध्या अटकेत आहेत. आरोपींनी शहरातील इतर पब आणि बारमध्ये ड्रग्ज पुरवल्याची माहिती पोलीसांना मिळाली आहे.

  • 01 Jul 2024 08:30 AM (IST)

    Marathi News: यवतमाळ -नागपूर महामार्ग अपघात, चौघांचा मृत्यू

    यवतमाळ -नागपूर महामार्गवरील चापरडा गावाजवळ भीषण अपघात झाला आहे. या अपघातात 4 जण ठार झाले आहे तर 1 जण गंभीर जखमी झाला आहे. पंजाब येथील शीख कुटूंब दर्शनाला नांदेड येथे दर्शनाला जात असताना अपघात झाला. त्यांच्या इनोव्हा कार मागून ट्रकने धडक दिल्यामुळे 4 जणांचा जागीच मृत्यू झाला.

  • 01 Jul 2024 08:20 AM (IST)

    Marathi News: पुण्यात झिकाचा संसर्ग वाढण्याची शक्यता

    पुण्यात एका गर्भवतीला झिकाची लागण झाली आहे. एरंडवने भागात २८ वर्षीय महिलेला झिकाची लागण झाली आहे. पुण्यात एकूण झिकाचे ५ रुग्ण आढळले आहेत.

Published On - Jul 01,2024 8:19 AM

Follow us
संसदेत मोदींना बोलणंही अवघड, विरोधकांचा एकच गोंधळ; सभागृहात काय घडलं?
संसदेत मोदींना बोलणंही अवघड, विरोधकांचा एकच गोंधळ; सभागृहात काय घडलं?.
'जयंतराव तुम्ही नकली वाघांसोबत असली... ', मुख्यमंत्र्यांची थेट ऑफर
'जयंतराव तुम्ही नकली वाघांसोबत असली... ', मुख्यमंत्र्यांची थेट ऑफर.
दिवे घाटातील माऊलींच्या पालखीचं विहंगम दृश्य; ड्रोनमध्ये कैद नजारा
दिवे घाटातील माऊलींच्या पालखीचं विहंगम दृश्य; ड्रोनमध्ये कैद नजारा.
तुमच्याकडे हे कागदपत्रं आहेत का? तरच मिळणार 'लाडकी बहीण योजने'चा लाभ
तुमच्याकडे हे कागदपत्रं आहेत का? तरच मिळणार 'लाडकी बहीण योजने'चा लाभ.
मी मुख्यमंत्र्यांची लाडकी बहीण...भावना गवळी उमेदवारी मिळताच गहिवरल्या
मी मुख्यमंत्र्यांची लाडकी बहीण...भावना गवळी उमेदवारी मिळताच गहिवरल्या.
भर सभागृहात शिवीगाळ करणं आलं अंगाशी, अंबादास दानवेंवर मोठी कारवाई
भर सभागृहात शिवीगाळ करणं आलं अंगाशी, अंबादास दानवेंवर मोठी कारवाई.
ज्यांनी जीवन संपवलं ते... संधी मिळाल्यानंतर पंकजा मुंडे काय म्हणाल्या?
ज्यांनी जीवन संपवलं ते... संधी मिळाल्यानंतर पंकजा मुंडे काय म्हणाल्या?.
हिजाबनंतर आता काँलेजमध्ये जीन्स, टी-शर्टवर बंदी, कॉलेजचा नवा नियम काय?
हिजाबनंतर आता काँलेजमध्ये जीन्स, टी-शर्टवर बंदी, कॉलेजचा नवा नियम काय?.
दक्षिण आफ्रिकेला लोळवणाऱ्या टीम इंडियाला वादळानं बार्बाडोसमध्ये रोखलं
दक्षिण आफ्रिकेला लोळवणाऱ्या टीम इंडियाला वादळानं बार्बाडोसमध्ये रोखलं.
मुंबईसह 'या' भागात 'कोसळधार', महाराष्ट्रासाठी IMD चा इशारा काय?
मुंबईसह 'या' भागात 'कोसळधार', महाराष्ट्रासाठी IMD चा इशारा काय?.