Maharashtra Breaking News LIVE : अमरावती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे लोकार्पण व रुग्णालयाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते भूमिपूजन

| Updated on: Oct 09, 2024 | 10:34 AM

Maharashtra Political News LIVE in Marathi : आज 9 ऑक्टोबर 2024. देश, विदेश, राज्य पातळीवरील राजकीय, सामाजिक, आर्थिक, गुन्हेगारी क्षेत्र, क्रीडा अन् मनोरंजन क्षेत्रातील महत्वाच्या घडामोडी जाणून घ्या. तुमच्या जिल्ह्यातील, तुमच्या गावातील बातमी तुम्हाला इथे वाचायला मिळेल.

Maharashtra Breaking News LIVE : अमरावती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे लोकार्पण व रुग्णालयाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते भूमिपूजन

LIVE NEWS & UPDATES

  • 09 Oct 2024 10:50 AM (IST)

    राहुल गांधी यांचं नागरिकत्व रद्द करा, या संदर्भातील याचिकेवर आज दिल्ली उच्च न्यायालयात सुनावणी

    नवी दिल्ली- राहुल गांधी यांचं नागरिकत्व रद्द करा, या संदर्भात भाजप नेते सुब्रह्मण्यम स्वामी यांनी दिल्ली उच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेवर आज सुनावणी होणार आहे. या याचिकेत गृहमंत्रालयाला राहुल गांधी यांचं नागरिकत्व रद्द करण्यासाठी आदेश देण्याची मागणी करण्यात आली आहे. सुब्रह्मण्यम स्वामी यांच्या मते राहुल गांधी यांनी इंग्लंडचं नागरिकत्व स्वीकारलं होतं. त्यामुळे त्यांचं नागरिकत्व रद्द करावं, अशी मागणी करण्यात आली.

    २६ सप्टेंबरला पार पडलेल्या सुनावणीत न्यायालयाने या प्रकरणात अलाहाबाद उच्च न्यायालयात सुनावणी सुरू असल्याने आम्ही या प्रकरणात सुनावणी करू शकत नाही, असं म्हटलं होतं. त्यानंतर न्यायालयाने गृहमंत्रालयाकडे या केसचं स्टेटस काय आहे याची माहिती देण्यास सांगितलं होतं. त्यानंतर आज सुनावणी होणार आहे.

  • 09 Oct 2024 10:40 AM (IST)

    विधानसभा निवडणुकीचा निकाल लागताच काश्मीर खोऱ्यात दहशतवादी सक्रीय

    जम्मू काश्मीर- विधानसभा निवडणुकीचा निकाल लागताच काश्मीर खोऱ्यात दहशतवादी सक्रीय झाले आहेत. दहशतवाद्यांकडून दोन जवानांचं अपहरण करण्यात आलं असून एका जवानाची सुटका करण्यात यश मिळालं आहे. अनंतनागच्या जंगल क्षेत्रातील ही घटना आहे. सुटका झालेल्या जवानाकडून माहिती घेण्याचं काम सुरू आहे. अनंतनागच्या जंगल क्षेत्रात पहाटेपासून सैन्य दलाचं सर्च ऑपरेशन सुरू आहे.

  • 09 Oct 2024 10:37 AM (IST)

    हरियाणाचा पराभव दुर्देवी, यातून बरंच शिकण्यासारखं- संजय राऊत

    “हरियाणाचा पराभव दुर्देवी आहे. यातून बऱ्याच गोष्टी शिकण्यासारख्या आहेत. देशातील निवडणूक एकत्र लढवावी लागेल. कोणी स्वत:ला छोटा भाऊ, मोठा भाऊ समजू नये. लोकसभेचं यश हे इंडिया आघाडीचं यश आहे,” असं राऊत म्हणाले.

  • 09 Oct 2024 10:33 AM (IST)

    हरियाणातील निवडणूक निकालाचा महाराष्ट्रावर कोणताही परिणाम होणार नाही- राऊत

    “हरियाणातील निवडणूक निकालाचा महाराष्ट्रावर कोणताही परिणाम होणार नाही. महाराष्ट्रात काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना तिघांची महाविकास आघाडी आहे. महाराष्ट्रात शरद पवार, उद्धव ठाकरे यांचं जागरुक नेतृत्व आहे,” असं संजय राऊत म्हणाले.

  • 09 Oct 2024 10:30 AM (IST)

    नवी दिल्ली- केंद्रीय मंत्रिमंडळाची आज बैठक

    नवी दिल्ली- केंद्रीय मंत्रिमंडळाची आज बैठक पार पडणार आहे. सकाळी १०ः३० वाजता पंतप्रधान निवासस्थानी ही बैठक होणार आहे. या बैठकीत नवी मुंबई विमानतळाला दि बा पाटील यांचं नाव देण्यासंदर्भातील ठराव आज पास होण्याची शक्यता आहे.

  • 09 Oct 2024 10:20 AM (IST)

    बोपदेव घाटाच्या पाहणीवरून रूपाली चाकणकर यांची सुप्रिया सुळे यांच्यावर नाव न घेता टीका

    आपला हा दिखावा कशासाठी? बोपदेव घाटाच्या पाहणीवरून रूपाली चाकणकर यांची सुप्रिया सुळे यांच्यावर नाव न घेता टीका केली. काल शरद पवार यांच्यासह सुप्रिया सुळे यांनी बोपदेव घाटात जाऊन पाहणी केली होती. गुरुवारी घडलेल्या सामूहिक लैंगिक अत्याचारप्रकरणी सुप्रिया सुळेंनी काल बोपदेव घाट परिसरात पाहणी केली होती. ‘झोपी गेलेल्याला जागं करता येतं, झोपेचं सोंग घेणाऱ्यांना नाही,’ अशी टीका चाकणकर यांनी सुप्रिया सुळेंवर केली. राष्ट्रवादीच्या अनेक नेत्यांवर गुन्हे दाखल आहेत, त्यांच्या विरोधात आंदोलन कधी करणार असा सवालही चाकणकर यांनी केला.

  • 09 Oct 2024 10:10 AM (IST)

    एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर बॅनरबाजी

    एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर नांदेड शहरात बॅनरबाजी करण्यात आली आहे. जनतेच्या मनातील मुख्यमंत्री, पुन्हा येणार, लाडक्या बहिणीचा देवा भाऊ पुन्हा येणार असे बॅनर्स देवेंद्र फडणवीस यांच्या समर्थकांकडून लावण्यात आले आहेत. शहरात ठिकठिकाणी हे बॅनर लावले आहेत. उद्या नांदेडमध्ये महिला सक्षमीकरण मेळाव्याचे आयोजन करण्यात आलं आहे.

  • 09 Oct 2024 09:57 AM (IST)

    Maharashtra News: जुन्नर तालुक्यात बिबट्याच्या हल्ल्यात महिला ठार

    जुन्नर तालुक्यातील पिंपरी पेंढार हद्दीमध्ये बिबट्याचा महिलेवर हल्ला… बिबट्याच्या हल्ल्यात महिलेचा दुर्दैवी मृत्यू… सुजाता रवींद्र डेरे असं या महिलेचं नाव आहे… पिंपरी पेंढार मधील मागील काही दिवसांतील ही दुसरी घटना…

  • 09 Oct 2024 09:50 AM (IST)

    Maharashtra News: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज राज्यातील दहा वैद्यकीय महाविद्यालयाचे उद्घाटन

    पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज राज्यातील दहा वैद्यकीय महाविद्यालयाचे होणार ऑनलाइन पध्दतीने उद्घाटन.. दहा पैकी पाच वैद्यकीय महाविद्यालय विदर्भात… विदर्भातील अमरावती, वाशिम, गडचिरोली, भंडारा, हिंगोली, बुलढाना मध्येही वैद्यकीय महाविद्यालयाची निर्मिती… मुंबई, अंबरनाथ,नाशिक, जालण्यात मेडिकल कॉलेज..

  • 09 Oct 2024 09:37 AM (IST)

    Maharashtra News: एमआयएमचे राज्य कार्याध्यक्ष गफार कादरी बंडखोरीच्या तयारीत

    कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात गफार कादरी यांनी दिले बंडखोरीचे संकेत… गफार कादरी यांना पक्षाकडून उमेदवारी मिळण्याची शक्यता नसल्यामुळे नाराज… असदुद्दीन ओवैसी यांनी राज्यत 5 उमेदवार जाहीर केले मात्र गफार कादरी यांना टाळले… गफार कादरी यांनी पूर्व मतदार संघातून दोन वेळा लढवली विधानसभा निवडणूक… इम्तियाज जलील आणि गफार कादरी यांच्यात अनेक दिवसांपासून आहे वितुष्ट…

  • 09 Oct 2024 09:25 AM (IST)

    Maharashtra News: अजित पवार यांच्या उपस्थितीमध्ये आज विविध विकासकामांचे उद्घाटन सुरु

    पिंपरी चिंचवड शहरात अजित पवार यांच्या उपस्थितीमध्ये आज विविध विकासकामांचे उद्घाटन सुरू आहे… त्याचाच एक भाग म्हणून पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयामध्ये पोलिसांसाठी नवीन वाहने देण्याचा कार्यक्रमही आयोजित करण्यात आला…. यावेळी पिंपरी चिंचवड पोलिसांनी अजित पवार यांना मानवंदनाही दिली.

  • 09 Oct 2024 09:05 AM (IST)

    एजाज खानच्या कार्यालयात धाड टाकून त्याच्या ऑफिसबॉयला अटक

    ड्रग्स प्रकरणात कस्टम विभागाने एजाज खानच्या कार्यालयात धाड टाकून त्याच्या ऑफिसबॉयला अटक केली. 35 लाखांच्या एमडीएम ड्रग्स प्रकरणात कस्टम कडून सूरज गौडला करण्यात अटक आली आहे.

  • 09 Oct 2024 08:57 AM (IST)

    आठवडाभरात भाजपची पहिली यादी घोषित होणार

    विधानसभेच्या उमेदवार निश्चितीसाठी पुढील दोन दिवस भाजपच्या महत्त्वाच्या बैठका होणार आहेत. भाजपची उमेदवार निवड प्रक्रिया जवळपास पूर्ण झाली असून आठवडाभरात भाजपची पहिली यादी घोषित होणार आहे.

    काल रात्री सागर बंगल्यावर भाजपच्या निवडक नेत्यांची मॅरेथॉन बैठक पार पडली.  मुंबई, कोकण विभागानंतर आज उत्तर महाराष्ट्र आणि पश्चिम महाराष्ट्राच्या जिल्हा निहाय बैठका तर विदर्भ आणि मराठवाड्याच्या बैठकही 2 दिवसांत पार पडणार आहेत.

  • 09 Oct 2024 08:51 AM (IST)

     सोलापूर शहरातील भाजप आमदार विजयकुमार देशमुख यांची डोकेदुखी वाढली

    सोलापूर शहर उत्तरचे भाजप आमदार विजयकुमार देशमुख यांची डोकेदुखी वाढली आहे.  फडणवीस समर्थक असलेल्या राहुल काटकर यांनी देवेंद्र फडणसांकडे शहर उत्तर विधानसभेची उमेदवारी मागितली . देवेंद्र फडणवीस यांचे कट्टर समर्थक म्हणून राहुल काटकर यांची ओळख आहे.  देवपुष्प फाउंडेशनच्या माध्यमातून राहुल काटकर यांचे सोलापूर जिल्ह्यात काम सुरू आहे.

  • 09 Oct 2024 08:34 AM (IST)

    जागावाटपासंदर्भात महाविकास आघआडीची 11 तारखेला पत्रकार परिषद

    जागावाटपासंदर्भात महाविकास आघआडीची 11 तारखेला पत्रकार परिषद होणार असून त्यावेळी शरद पवार, उद्धव ठाकरे , नाना पटोले संबोधित करणार आहेत. या पत्रकार परिषदेत मविआच्या जागावाटपाचा फॉर्म्युला समजण्याची शक्यता आहे.

  • 09 Oct 2024 08:28 AM (IST)

    भारत वि. बांगलादेश दुसरा टी 20 सामना रंगणार आज

    आज राजधानी दिल्लीत भारत वि. बांगलादेश दुसरा टी 20 सामना रंगणार आहे. सामना जिंकून मालिका जिंकण्यासाठी भारतीय संघ सज्ज.

  • 09 Oct 2024 08:24 AM (IST)

    अभिनेता एजाज खान पुन्हा अडचणीत, ड्रग्स प्रकरणात कस्टम विभागाची कारवाई

    अभिनेता एजाज खान पुन्हा अडचणीत सपाडला आहे. ड्रग्स प्रकरणात कस्टम विभागाने एजाज खानच्या कार्यालयात धाड टाकून त्याच्या ऑफिसबॉयला अटक केली. 35 लाखांच्या एमडीएम ड्रग्स प्रकरणात कस्टम कडून सूरज गौडला करण्यात आली अटक.

    युरोपियन देशातून तस्करी केलेले हे ड्रग्स एजाज खानच्या अंधेरीतील कार्यालयात पोहोचवण्यात आले होते त्यावेळी कस्टमने ही कारवाई केली.

  • 09 Oct 2024 08:23 AM (IST)

    अमरावती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे लोकार्पण व रुग्णालयाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते भूमिपूजन

    अमरावती येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे लोकार्पण व रुग्णालयाचे आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते भूमिपूजन होणार आहे. आज सकाळी 11 वाजता ऑनलाइन पद्धतीने पंतप्रधान नरेंद्र मोदी, राज्यपाल राधाकृष्णन,मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम होईल.

अमरावती येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे लोकार्पण व रुग्णालयाचे आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते भूमिपूजन होणार आहे. आज सकाळी 11 वाजता ऑनलाइन पद्धतीने पंतप्रधान नरेंद्र मोदी, राज्यपाल राधाकृष्णन,मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम होईल. मुंबईत सध्या ऑक्टोबर हिटचे चटके बसत असून धूरकट वातावरणासह पावसाचेही कमबॅक आहे. मुंबईकरांना आज संमिश्र वातावरणाचा अनुभव , ऊन, पाऊस, धूळ एकत्र आल्याने आरोग्यासाठी हे घातक ठरत असल्याची चर्चा आहे. मातोश्री बाहेर शिवसेनेच्या दसरा मेळाव्याचे बॅनर लागले आहेत. मशाल धगधगणार, महाराष्ट्र जिंकणार असा निर्धार या बॅनरच्या माध्यमातून शिवसेनेने केलाय आहे. महायुतीच्या नेत्यांची आज दुपारी बैठक होणार आहे. यासह अन्य महत्वाच्या बातम्या क्रीडा, मनोरंजन, राजकीय क्षेत्रातील बातम्या तुम्हाला या ब्लॉगमध्ये वाचायला मिळतील. त्यामुळे आज दिवसभर हा ब्लॉग फॉलो करा.

Published On - Oct 09,2024 8:19 AM

Follow us
विधानसभेत भाजपची हॅट्रिक, कस जिंकल हरियाणा? कोणता फॉर्म्युला ठरला हिट?
विधानसभेत भाजपची हॅट्रिक, कस जिंकल हरियाणा? कोणता फॉर्म्युला ठरला हिट?.
'ठाकरेंना CM करण्यास भाजप तयार...', शिंदे गटाच्या नेत्याचा दावा काय?
'ठाकरेंना CM करण्यास भाजप तयार...', शिंदे गटाच्या नेत्याचा दावा काय?.
बारामतीत अजित पवारांचे समर्थक हट्टाला पेटले, ताफा अडवत काय केली मागणी?
बारामतीत अजित पवारांचे समर्थक हट्टाला पेटले, ताफा अडवत काय केली मागणी?.
'सकाळच्या भोंग्याला विचारायचंय, आता कसं...', फडणवीसांनी राऊतांना डिवचल
'सकाळच्या भोंग्याला विचारायचंय, आता कसं...', फडणवीसांनी राऊतांना डिवचल.
हरियाणात भाजप मोठा पक्ष, बहुमतानं सत्ता स्थापन करणार? काय सांगतो कल?
हरियाणात भाजप मोठा पक्ष, बहुमतानं सत्ता स्थापन करणार? काय सांगतो कल?.
सुरजनं पटकावली बिग बॉसची ट्रॉफी, बारामतीत जंगी स्वागत होताच म्हणाला...
सुरजनं पटकावली बिग बॉसची ट्रॉफी, बारामतीत जंगी स्वागत होताच म्हणाला....
'ए शहाण्या, खोटं कशाला सांगतो?', भरसभेत अजितदादा नेमकं कोणावर संतापले?
'ए शहाण्या, खोटं कशाला सांगतो?', भरसभेत अजितदादा नेमकं कोणावर संतापले?.
तुतारी पक्ष मुस्लिम लीगचा पार्टनर? राणेंचा हल्लाबोल, काय केलं वक्तव्य?
तुतारी पक्ष मुस्लिम लीगचा पार्टनर? राणेंचा हल्लाबोल, काय केलं वक्तव्य?.
विनेश फोगाटनं भाजप उमेदवाराला चितपट करत विधानसभेची कुस्ती जिंकली
विनेश फोगाटनं भाजप उमेदवाराला चितपट करत विधानसभेची कुस्ती जिंकली.
सुळेंच्या गाडीत चेहरा लपवणारा नेता कोण? आणखी एक बडा नेता NCP त येणार?
सुळेंच्या गाडीत चेहरा लपवणारा नेता कोण? आणखी एक बडा नेता NCP त येणार?.