मुंबईत नाना पटोलेंचं पदग्रहण, बीडमध्ये बॅनरबाजी, पोस्टरवरुन काँग्रेस पदाधिकाऱ्यांमधील दुफळी उघड!

नाना पटोले यांचा आज मुंबईत पदग्रहण सोहळा आयोजित करण्यात आला होता. त्याच निमित्ताने बीडमध्ये बॅनर्स लावण्यात आले (two groups in Beed Congress)

मुंबईत नाना पटोलेंचं पदग्रहण, बीडमध्ये बॅनरबाजी, पोस्टरवरुन काँग्रेस पदाधिकाऱ्यांमधील दुफळी उघड!
Follow us
| Updated on: Feb 12, 2021 | 8:11 PM

बीड : राज्यातील काँग्रेसची राजकीय परिस्थिती पाहता काँग्रेसच्या हायकमांडने प्रदेश अध्यक्षपदाची धुरा नाना पटोले यांच्याकडे सोपवली आहे. नाना पटोले यांचा आज मुंबईत पदग्रहण सोहळा आयोजित करण्यात आला होता. त्याच निमित्ताने बीडमध्ये बॅनर्स लावण्यात आले. त्या बॅनर्सवर जिल्हाध्यक्ष आणि काही जेमतेम पदाधिकारी वगळता बीडच्या एकही पदाधिकाऱ्यांचा फोटो लावण्यात आला नसल्याने काँग्रेस पदाधिकाऱ्यांमधील असलेली दुफळी स्पष्टपणे उघड झाली आहे (two groups in Beed Congress).

मराठवाड्यातील बीड जिल्ह्यात काँग्रेसची मोठी पीछेहाट आहे. जिल्ह्यातील केज आणि अंबाजोगाई शहर वगळता कुठल्याही तालुक्यात काँग्रेसकडे म्हणावे तसे बळ नाही. अंबाजोगाई शहरात काँगेसच्या ताब्यात केवळ नगरपरिषद आहे. त्याच बळावर जिल्हा अध्यक्ष म्हणून राजकिशोर मोदी यांच्याकडे पदभार सोपविण्यात आला आहे. मात्र, मोदी यांना अंबाजोगाई वगळता जिल्ह्यात अद्याप संघटन मजबूत करण्यात यश आले नाही (two groups in Beed Congress).

राजकिशोर मोदी जिल्हाध्यक्ष झाल्यापासून एक गट सतत नाराज आहे. आज नवनिर्वाचित प्रदेश अध्यक्ष म्हणून नाना पटोले यांचा पदग्रहण सोहळा संपन्न झाला. सोहळ्याचे अनेक बॅनर्स शहरामध्ये लावण्यात आले आहेत. बॅनर्सवर जिल्हाध्यक्ष राजकिशोर मोदी आणि त्यांच्या जवळचे पदाधिकारी यांचेच फोटो लावण्यात आले आहेत. त्यामुळे दुसरा गट प्रचंड नाराज झाला असून बॅनर्सच्या माध्यमातून काँग्रेसमधील दुफळी पुन्हा एकदा समोर आली आहे. या बॅनर्समुळे काँग्रेसमधील ‘राज’कारण पुन्हा एकदा चव्हाट्यावर आलं आहे.

‘या’ पदाधिकाऱ्यांची गोची?

जिल्ह्यातील काँगेसला बळकटी मिळावी म्हणून पक्षश्रेष्ठींकडून सर्वच विभागातील पदांवर पदाधिकाऱ्यांचा मोठा भरणा करण्यात आला आहे. मात्र, गोविंद साठे, श्रीनिवास केंद्रे, श्यामसुंदर जाधव, अॅड. विद्या गायकवाड, संभाजी जाधव, सुनील नागरगोजे, शेख नजीर हे पदाधिकारी बॅनरवरच नाही तर त्यांना वास्तविक पक्षातदेखील अद्याप म्हणावे तसे स्थान नाही.

नानांसमोर संघटन मजबुतीचे आव्हान

मराठवाड्यातील नांदेड, लातूर जिल्ह्यात काँग्रेसचे मोठे बळ आहे. दोन्ही जिल्हे शिवशेजारी असताना बीड जिल्ह्यात मात्र काँग्रेसचा वणवा आहे. राज्यातले उद्याचे राजकारण पाहता बीडमध्ये काँग्रेसला पदाधिकाऱ्यांची दुफळी दूर करून नव्याने बळकटी देण्याचे मोठे आव्हान प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यासमोर आहे.

हेही वाचा : मी धडाधड निर्णय घेणाऱ्या दोन नानांना ओळखतो, एक पटोले, दुसरे…. : अशोक चव्हाण 

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.