Video : खासदार प्रितम मुंडेंनी उद्घाटन केलेल्या बैलगाडा शर्यतीत दुर्घटना; दोन शाळकरी मुलं जखमी, घटनेचा व्हिडिओ व्हायरल

बीडचे भाजपचे जिल्हाध्यक्ष राजेश म्हस्के यांचा आज वाढदिवस होता. यानिमित्ताने बीड जवळील तळेगाव शिवारात पहिल्यांदाच बैलगाडा शर्यतीचे आयोजन करण्यात आले होते. खासदार प्रितम मुंडे यांच्या हस्ते या बैलगाडा शर्यतीचे उद्घाटन करण्यात आले होते. ही शर्यत पाहण्यासाठी बीडकरांनी तुफान गर्दी केली होती. याच गर्दीत बैल उधळल्याने दोन शाळकरी मुलं गंभीररित्या जखमी झाले आहेत.

Video : खासदार प्रितम मुंडेंनी उद्घाटन केलेल्या बैलगाडा शर्यतीत दुर्घटना; दोन शाळकरी मुलं जखमी, घटनेचा व्हिडिओ व्हायरल
खासदार प्रितम मुंडेंनी उद्घाटन केलेल्या बैलगाडा शर्यतीत दुर्घटनाImage Credit source: TV9
Follow us
| Updated on: Jul 01, 2022 | 10:28 PM

बीड : बीडमध्ये बैलगाडा शर्यत (Bullock Cart Race) सुरु असताना बैल उधळल्याने दोन विद्यार्थी गंभीर जखमी (Injured) झाल्याची घटना घडली आहे. जखमी मुलांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. हा सर्व थरार तेथे उपस्थित प्रेक्षकांनी मोबाईलमध्ये कैद केला आहे. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल (Viral) झाला आहे. भाजपचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के यांच्या वाढदिवसानिमित्त बीडच्या तळेगाव शिवारात ही बैलगाडा शर्यत आज आयोजित केली होती. भाजपच्या खासदार प्रितम मुंडे यांनी या स्पर्धेचं उद्घाटन केलं. ही शर्यत सुरू असतानाच एक बैलगाडा थेट गर्दीत घुसला आणि ही दुर्घटना घडली. याप्रकरणी आयोजकांवर कारवाई करण्याची मागणी करण्यात येत आहे.

गर्दीत बैल उधळल्याने घडली दुर्घटना

बीडचे भाजपचे जिल्हाध्यक्ष राजेश म्हस्के यांचा आज वाढदिवस होता. यानिमित्ताने बीड जवळील तळेगाव शिवारात पहिल्यांदाच बैलगाडा शर्यतीचे आयोजन करण्यात आले होते. खासदार प्रितम मुंडे यांच्या हस्ते या बैलगाडा शर्यतीचे उद्घाटन करण्यात आले होते. ही शर्यत पाहण्यासाठी बीडकरांनी तुफान गर्दी केली होती. याच गर्दीत बैल उधळल्याने दोन शाळकरी मुलं गंभीररित्या जखमी झाले आहेत. या जखमींवर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहे. दरम्यान या घटनेचा व्हिडिओ सध्या व्हायरल झालाय. ही शर्यत सुरू असतानाच एक बैलगाडा थेट गर्दीत घुसला आणि यामध्ये दोन शाळकरी मुलं बैलगाड्या खाली आले. या बैलगाडा शर्यतीसाठी परवानगी होती का नाही? हे मात्र अद्याप समजू शकलेले नाही. परंतु या आयोजकांवर कारवाईची मागणी केली जात आहे.

शर्यतीत 100 बैलगाडा मालकांनी घेतला सहभाग

बैलगाडा शर्यतीत पुणे, सोलापूर, सातारा या पश्चिम महाराष्ट्रातील बैलगाडा मालक यात सहभागी झाले होते. बीड जवळील तळेगाव शिवारात ही बैलगाडा शर्यत पार पडली असून यात 100 बैलगाडा मालकांनी सहभाग नोंदवला आहे. शर्यत जिंकणाऱ्या बैलगाडा मालकाला मोटरसायकल पारितोषिक देण्यात आली असून बीडमध्ये पहिल्यांदाच होणारी ही शर्यत पाहण्यासाठी बैलगाडा प्रेमींनी मोठी गर्दी केली होती. 700 मीटरच्या ट्रेकवर शर्यत पार पडली. (Two students were injured in a bullock cart race in Beed, video viral on social media)

हे सुद्धा वाचा

Suresh Dhas : 'आरोपींचा तेरे नाम झाला पाहिजे', सुरेश धस यांचा आक्रोश
Suresh Dhas : 'आरोपींचा तेरे नाम झाला पाहिजे', सुरेश धस यांचा आक्रोश.
सुरेश धस अजितदादांच्या भेटीला, राजकीय घडामोडींना वेग; भेटीत काय चर्चा?
सुरेश धस अजितदादांच्या भेटीला, राजकीय घडामोडींना वेग; भेटीत काय चर्चा?.
'माझ्यापेक्षा जास्त अभ्यास असणाऱ्यांना...', पंकजा मुंडेंचं खोचक उत्तर
'माझ्यापेक्षा जास्त अभ्यास असणाऱ्यांना...', पंकजा मुंडेंचं खोचक उत्तर.
एसटी महामंडळात फ्री स्टाइल हाणामारी, दोन कंडक्टर आले आमने-सामने....
एसटी महामंडळात फ्री स्टाइल हाणामारी, दोन कंडक्टर आले आमने-सामने.....
फडणवीस, दादा नव्हे, या नेत्यामुळे मनसेची महायुतीसोबतची युती फिस्कटली?
फडणवीस, दादा नव्हे, या नेत्यामुळे मनसेची महायुतीसोबतची युती फिस्कटली?.
दिल्ली विधानसभा निवडणुकीचं बिगुल वाजलं, कधी होणार मतदान अन् निकाल कधी?
दिल्ली विधानसभा निवडणुकीचं बिगुल वाजलं, कधी होणार मतदान अन् निकाल कधी?.
बांगलादेशी बनला रत्नागिरीकर... शिरगाव ग्रामपंचायतीला पोलिसांची नोटीस
बांगलादेशी बनला रत्नागिरीकर... शिरगाव ग्रामपंचायतीला पोलिसांची नोटीस.
महाराष्ट्राची चिंता वाढली;7 वर्षीय मुलासह 13 वर्षीय मुलीला HMPVची लागण
महाराष्ट्राची चिंता वाढली;7 वर्षीय मुलासह 13 वर्षीय मुलीला HMPVची लागण.
मुडेंनी राजीनामा दिला? राजीनाम्याच्या प्रश्नावर म्हणाले, 'योग्य वेळी'
मुडेंनी राजीनामा दिला? राजीनाम्याच्या प्रश्नावर म्हणाले, 'योग्य वेळी'.
HMPV Virus : तुम्हाला 'ही' लक्षणं दिसताच सावध व्हा अन् अशी घ्या काळजी
HMPV Virus : तुम्हाला 'ही' लक्षणं दिसताच सावध व्हा अन् अशी घ्या काळजी.