AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Udayanraje Bhosale : रायगडावर अमित शाहंसमोर उदयनराजेंच्या चार ते पाच प्रमुख मागण्या

Udayanraje Bhosale : "शिवाजी महाराजांचा इतिहास सातासमुद्रापलिकडे पोहोचला आहे. रशियात शिवजयंती होते. काश्मीरच्या कुपवाडात पुतळा उभारला आहे. वाघनखंही आपण ब्रिटनहून आणली आहेत. शिवाजी महाराजांनी हातात तलावर घेतली पण निष्पाप लोकांवर कधीच त्यांनी ती उगारली नाही. त्यांच्या तलवारीला रक्ताचा नाही तर मानवतेचा सुगंध येतो" असं एकनाथ शिंदे म्हणाले.

Udayanraje Bhosale : रायगडावर अमित शाहंसमोर उदयनराजेंच्या चार ते पाच प्रमुख मागण्या
Udayanraje Bhosale
Follow us
| Updated on: Apr 12, 2025 | 1:12 PM

“शिवाजी महाराजांनी त्या काळात समतेचा विचार दिला. सर्व धर्म समभावाचा विचार केला. त्यांनी आयुष्य इतरांसाठी वेचलं. त्यांनी स्वराज्याची स्थापना केली. आज आपण लोकशाहीत आहोत. त्याकाळी त्यांनी लोकांचा सहभाग राज्यकारभारत असला पाहिजे हा विचार दिला. आजच्या लोकशाहीचा मूळ पाया शिवाजी महाराजांनी रचला होता” असं खासदार उदयनराजे भोसले म्हणाले. रायगडावर ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या 345 व्या शिवपुण्यतिथी अभिवादन सोहळ्यात बोलत होते. “मी चारपाच मागण्या करतो. शिवाजी महाराज, संभाजी महाराज आणि जिजाऊ मातांबाबत कायदा करा. अजामीनपात्र गुन्हा करा. दहा वर्ष जामिनच मिळू नये. महाराजांचं शासन मान्य इतिहास प्रकाशित करा. जेणे करून भेदभाव होऊ नये. तेढ होऊ नये” असं उदयनराजे म्हणाले. “सिनेमॅटिक लिबर्टीबाबत सेन्सॉर बोर्डाची स्थापना करावी. म्हणजे एखाद्या कल्पनेतून कादंबरी होते. पण त्याला ऐतिहासिक पुरावे नसतात. त्यामुळे अलिकडच्या काळात मोठ्या प्रमाणावर शिवाजी महाराज, संभाजी महाराज आदी युगपुरुषांबाबत गैरसमज निर्माण केले जात आहेत. त्यामुळे सेन्सॉर बोर्ड असावे. रामायण सर्किटची स्थापना झाली. बुद्ध सर्किट झाली. तसेच शिवस्वराज्य सर्किट करावं. कालच रेल्वे मंत्र्यांनी त्याची घोषणा केली. खऱ्या अर्थाने शिवाजी महाराजांचं दिल्लीत स्मारक व्हावं ही शिवभक्तांची मागणी आहे” असं उदयनराजे म्हणाले.

“निजामशाही, मुगलशाहीत शाहजी महाराजांनी त्यांच्या मनात जो स्वराज्याचा विचार होता, माँ साहेब जिजाऊंनी शिवाजी महाराजांच्या अंगी तो विचार उतरवला. दावणगिरी जिल्ह्यात शाहजी राजेंची समाधी आहे. या समाधीला केंद्र आणि राज्य सरकारने पुरेसा निधी द्यावा” अशी मागणी उदयनराजेंनी केली. “मोदींच्या हस्ते अरबी समुद्रात शिवाजी महाराजांच्या स्मारकाचं भूमिपूजन झालं. तिथे काही तांत्रिक अडचणी असतील. केंद्रात स्मारक झालं पाहिजे. पण महाराष्ट्रात राज्यपालांच्या बंगल्याच्या ठिकाणी ४८ एकर जागा आहे. तिथे स्मारक झालं पाहिजे. स्मारक बनवण्यामागचा हेतू भावी पिढीला विचार घेता येईल हा असतो. देशाची प्रगती होईल हा त्यामागचा विचार असतो” असं उदयनराजे म्हणाले.

२० ते ३० वर्ष मिळाली असती तर इतिहास बदलला असता

“याच रायगडावर महाराजांचा राज्याभिषेक झाला. याच रायगडाने महाराजांचा शेवटचा दिवस पाहिला. महाराज ५०व्या वर्षी गेले. त्यांना अजून २० ते ३० वर्ष मिळाली असती तर इतिहास बदलला असता. महाराजांमुळेच आपण टिकून आहोत. शिवाजी महाराज हे रयतेचे राजे होते. रयतेच्या भाजीच्या देठालाही हात लागता कामा नये हा त्यांचा संदेश होता. अन्यायाच्या ठिकाणी तात्काळ शिक्षा द्यायचे” असं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.

अमित शाह हे कणखर गृहमंत्री

“औरंगजेब आणि अफजल खान यांनी महाराष्ट्रावर चाल केली. त्यांची थडगी याच भूमीत बांधली. अमित शाह हे कणखर गृहमंत्री आहेत. त्यांनी ३०७ कलम हटवलं. देशाच्या सीमेवर जे कोणी शररात करत होते. ते सर्व बिळात बसले आहेत. त्याचं कारण म्हणजे मोदी आणि अमित शाह आहेत. देशात हिंसा फैलावणारे जे लोक आहेत, नक्षलवादी असतील आणि अतिरेक्यांचा बंदोबस्त गृहमंत्री करत आहेत. राणालाही भारतात आणलं. त्याला मुंबई आणलं जाईल. त्याला फाशी देण्यात येईल” असं एकनाथ शिंदे म्हणाले.

भारताचा श्वास बंद करणार, म्हणणाराच घाबरला...हाफीज सईदला पुरवली सुरक्षा
भारताचा श्वास बंद करणार, म्हणणाराच घाबरला...हाफीज सईदला पुरवली सुरक्षा.
'पुष्पा'मुळे ओळख...अल्लू अर्जुनच्या आयुष्याला ‘पुष्पा 2’ नंतर कलाटणी
'पुष्पा'मुळे ओळख...अल्लू अर्जुनच्या आयुष्याला ‘पुष्पा 2’ नंतर कलाटणी.
मिस्टर इंडिया 2 बद्दल शेखर कपूरांचा दावा, ChatGPTचा उल्लेख करत म्हणाले
मिस्टर इंडिया 2 बद्दल शेखर कपूरांचा दावा, ChatGPTचा उल्लेख करत म्हणाले.
पाकड्यांची तंतरली, पाकच्या नौदल प्रमुखांचं मोठं वक्तव्य, आपल्याला....
पाकड्यांची तंतरली, पाकच्या नौदल प्रमुखांचं मोठं वक्तव्य, आपल्याला.....
भारत-पाक तणावाच्या पार्श्वभूमीवर मोठी बातमी; आता अमेरिका भारताला...
भारत-पाक तणावाच्या पार्श्वभूमीवर मोठी बातमी; आता अमेरिका भारताला....
पाकड्यांच्या LOC वर कुरापती काही थांबेना, सलग सातव्या दिवशी...
पाकड्यांच्या LOC वर कुरापती काही थांबेना, सलग सातव्या दिवशी....
पाकचे धाबे दणाणले; पाकिस्तानने हाफिज सैदच्या सुरक्षेत वाढ केली
पाकचे धाबे दणाणले; पाकिस्तानने हाफिज सैदच्या सुरक्षेत वाढ केली.
भारताचा पाकड्यांना दणका, येत्या २३ मेपर्यंत बसणार मोठा आर्थिक फटका
भारताचा पाकड्यांना दणका, येत्या २३ मेपर्यंत बसणार मोठा आर्थिक फटका.
बीड दौऱ्यावर असताना मनोज जरांगेंची प्रकृती खालावली
बीड दौऱ्यावर असताना मनोज जरांगेंची प्रकृती खालावली.
लाडक्या बहिणींनो आता एप्रिलचा हफ्ता कधी? आदिती तटकरेंनी थेट सांगितलं..
लाडक्या बहिणींनो आता एप्रिलचा हफ्ता कधी? आदिती तटकरेंनी थेट सांगितलं...