Uddhav Thckeray | संभाजीनगरातलं औरंगजेबाचं थडगं नेस्तनाबूत करायची घोषणा सभेत होणार का? मनसेच्या गजानान काळेंनी पुन्हा डिवचलं!!

उद्या 08 जून रोजी होणाऱ्या उद्धव ठाकरे यांच्या सभेसाठी औरंगाबादमधील खडकेश्वर परिसरातील मराठवाडा सांस्कृतिक मंडळाचं मैदान सज्ज झालं आहे. सभेच्या ठिकाणी लाखो लोकांची गर्दी जमणार असून शहरात ही गर्दी मावणारही नाही, असा दावा शिवसेनेच्या नेत्यांनी केला आहे.

Uddhav Thckeray | संभाजीनगरातलं औरंगजेबाचं थडगं नेस्तनाबूत करायची घोषणा सभेत होणार का? मनसेच्या गजानान काळेंनी पुन्हा डिवचलं!!
Image Credit source:
Follow us
| Updated on: Jun 07, 2022 | 11:20 AM

मुंबईः आम्ही संभाजीनगर (Sambhajinagar) म्हणतोय म्हणजे औरंगाबादचं नामांतर झालं, असं वक्तव्य करणाऱ्या शिवसेनेला मनसे नेते गजानन काळे यांनी पुन्हा एकदा डिवचलं आहे. तुम्ही सभेत संभाजीनगर म्हटलं की, झालं का? हे प्रत्यक्ष कधी होणार, असा सवाल गजानन काळे (Gajanan Kale) यांनी केला आहे. संभाजीनगरला असलेलं औरंगजेबाचं थडगं नेस्तनातूत करायची घोषणा होणार का? असा प्रश्नही काळे यांनी विचारला आहे. शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांची जाहीर सभा उद्या औरंगाबादमध्ये होत आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी औरंगाबादेत विक्रमी सभा घेतल्यानंतर त्यांचे बंधू शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या सभेकडे अवघ्या महाराष्ट्राचं लक्ष लागलं आहे. त्यातच महाविकास आघाडीमुळे पूर्वीचा हिंदुत्वाचा आणि आक्रमक अजेंडा पूर्णपणे राबवण्यास शिवसेना असमर्थ ठरतेय, असा आरोप केला जातोय. त्याच मालिकेत मनसे नेत्यानं शिवसेनेला डिवचलं आहे.

गजानन काळेंचा सवाल काय?

शिवसेनेवर अत्यंत आक्रमकरित्या टीका करण्यासाठी प्रसिद्ध असलेल्या मनसे नेते गजानन काळे यांनी औरंगाबादच्या सभेनिमित्त एक ट्विट केलं आहे. त्यात त्यांनी शिवसेना नेते उद्धव ठाकरेंना सवाल केला आहे. या सभेसाठी शिवसेनेनं होय… संभाजीनगर.. असे म्हणत बॅनरबाजी केली आहे. पण तुम्ही सभेत संभाजीनगर म्हणायचं, एवढं करून झालं का? औरंगाादचं संभाजीनगर कधी होणार मुख्यमंत्री महोदय? असा सवाल त्यांनी विचालाय.

हे सुद्धा वाचा

औरंगजेबाचं थडगं नेस्तनाबूत करायची घोषणा करणार का?

औरंगाबादमधील औरंगजेबाच्या कबरीवरून मागील महिन्यात मोठा वादंग माजला होता. एमआयएमचे नेते अकबरुद्दीन औवैसी आणि औरंगाबादचे खासदार इम्तियाज जलील यांनी खुलताबाद येथील औरंगजेबाच्या कबरीचं दर्शन घेतलं होतं. त्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रातून हिंदुत्ववादी संघटनांनी ही कबरच काढून टाकावी, अशी भूमिका घेतली होती. या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांना गजानन काळे यांनी सवाल केला आहे. कोरोनानंतर उद्धव ठाकरे प्रथमच औरंगाबादेत सभा घेत आहेत. या वेळी भाषण करताना संभाजीनगरला असलेलं औरंगजेबाचं थडगं नेस्तनाबूत करायची घोषणा सभेत होणार का? असा सवाल करत गजानन काळेंनी डिवचलं आहे. तर भाषणाची स्क्रिप्टही बारामतीतून येणार असल्यानं सगळंच अवघड वाटतंय, असा चिमटाही त्यांनी काढलाय.

उद्धव ठाकरेंच्या सभेसाठी मैदान सज्ज

उद्या 08 जून रोजी होणाऱ्या उद्धव ठाकरे यांच्या सभेसाठी औरंगाबादमधील खडकेश्वर परिसरातील मराठवाडा सांस्कृतिक मंडळाचं मैदान सज्ज झालं आहे. सभेच्या ठिकाणी भव्य असे व्यासपीठ तयार करण्यात आले असून त्याभोवती भगव्याची रंगसंगती ठेवण्यात आली आहे. सभेच्या ठिकाणी लाखो लोकांची गर्दी जमणार असून शहरात ही गर्दी मावणारही नाही, असा दावा शिवसेनेच्या नेत्यांनी केला आहे.

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.