Uddhav Thackeray Group Candidate List: एकनाथ शिंदे विरोधात दिघे, आदित्य ठाकरे वरळीतून, वायकरांच्या पत्नीविरोधात माजी नगरसेवक; ठाकरे गटाची यादी जाहीर

Uddhav Thackeray Group First Candidate List for Maharashtra Eelctions 2024: शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारांची पहिली यादी जाहीर करण्यात आली आहे. 

Uddhav Thackeray Group Candidate List: एकनाथ शिंदे विरोधात दिघे, आदित्य ठाकरे वरळीतून, वायकरांच्या पत्नीविरोधात माजी नगरसेवक; ठाकरे गटाची यादी जाहीर
उद्धव ठाकरे
Follow us
| Updated on: Oct 23, 2024 | 7:30 PM

महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात सर्वात महत्त्वाच्या नेत्यांपैकी एक आहेत. उद्धव ठाकरे यांच्याभोवती जे राजकारण गेल्या पाच वर्षांमध्ये घडलं ते अभूतपूर्व असं होतं. विशेष म्हणजे उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वातील शिवसेना पक्षात फूट पडल्यानंतर ज्या-ज्या घडामोडी घडल्या त्यानंतर पहिल्यांदाच राज्यात विधानसभेची निवडणूक होत आहे. या निवडणुकीकडे फक्त महाराष्ट्रातील जनतेच्या नाहीत तर देशभरातील नागरिकांच्या नजरा लागलेल्या आहेत. सर्वसामान्य जनतेचा या फोडाफोडीच्या राजकारणाला काय उत्तर असेल ते सर्वांना जाणून घ्यायचं आहे. याआधी लोकसभा निवडणुकीत महायुतीला महाराष्ट्रात प्रचंड फटका बसल्याचं बघायला मिळालं आहे. पण ठाकरे गटापेक्षा काँग्रेसला सर्वाधिक जागांवर यश आलं होतं. यानंतर आता विधानसभा निवडणुकीसाठी ठाकरे गट सज्ज झाला आहे. ठाकरे गटाकडून विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारांची पहिली यादी जाहीर करण्यात आली आहे. या यादीत एकूण 65 उमेदवारांची घोषणा करण्यात आली आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विरोधात ठाकरे गटाकडून कोपरी – पाचपाखडी मतदारसंघातून केदार दिघे यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला असलेल्या ठाणे मतदारसंघात माजी खासदार राजन विचारे यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. चाळीसगावातून माझी खासदार उन्मेष पाटील यांना उमेदवारी जाहीर झाली आहे.

ठाकरे गटाकडून जाहीर करण्यात आलेल्या यादीनुसार, उन्मेष पाटील यांना चाळीसागावातून उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. पाचोऱ्यात शिंदे गटाचे आमदार किशोर आप्पा पाटील यांच्याविरोधात ठाकरे गटाकडून त्यांच्याच चुलत बहीण वैशाली सूर्यवंशी यांना उमेदवारी देण्यात आली आहे. या ठिकाणची लढत प्रचंड चुरशीची होणार आहे. बाळापुरात पुन्हा एकदा नितीन देशमुख यांना संधी देण्यात आली आहे. नितीन देशमुख हे शिंदे गटाच्या आमदारांसोबत सुरतला गेले होते. पण ते रातोरात पुन्हा ठाकरे गटात आले होते.

कळमनुरी मतदारसंघात शिंदे गटाचे संतोष बांगर यांच्या विरोधात डॉ. संतोष टारफे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. परभणीत राहुल पाटील यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. कन्नड मतदारसंघात उदयसिंह राजपूत यांना उमेदवारी जाहीर करण्यात आळी आहे. सिल्लोड मतदारसंघात मंत्री अब्दुल सत्तार यांच्याविरोधात सुरेश बनकर यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. छ. संभाजीनगर पश्चिम मतदारसंघात शिंदे गटाचे नेते संजय शिरसाट यांच्या विरोधात ठाकरे गटाकडून राजू शिंदे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. तर संभाजीनगर मध्यमधून किशनचंद तनवाणी यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.

नांदगावात शिंदे गटाचे उमेदवार सुहास कांदे यांच्या विरोधात गणेश धात्रक यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. मालेगांव बाह्यमधून अद्वय हिरे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. नाशिक मध्यमधून वसंत गीते यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. नाशिक पश्चिम मधून सुधाकर बडगुजर यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. कल्याण ग्रामीणमधून सुभाष भोईर यांना उमेदवारी जाहीर झाली आहे.

पाहा उमेदवारांची संपूर्ण यादी :

Non Stop LIVE Update
राष्ट्रवादीकडून 38 उमेदवारांची पहिली यादी जाहीर, काय आहे वैशिष्ट्य?
राष्ट्रवादीकडून 38 उमेदवारांची पहिली यादी जाहीर, काय आहे वैशिष्ट्य?.
शिवसेनेकडून विधानसभेच तिकीट मिळताच गुलाबराव पाटील म्हणाले, मला खात्री
शिवसेनेकडून विधानसभेच तिकीट मिळताच गुलाबराव पाटील म्हणाले, मला खात्री.
'आता गनिमी काव्याने डाव..', जरांगेंचा लवकरच पहिला उमेदवार जाहीर होणार
'आता गनिमी काव्याने डाव..', जरांगेंचा लवकरच पहिला उमेदवार जाहीर होणार.
मलिक वेटिंगवर... NCPच्या पहिल्या यादीत नाव नाही, तिकीट मिळणार की नाही?
मलिक वेटिंगवर... NCPच्या पहिल्या यादीत नाव नाही, तिकीट मिळणार की नाही?.
माहीममध्ये यंदा बिग फाईट, मनसे-शिंदे गट अन् ठाकरे गटामध्ये तिरंगी लढत
माहीममध्ये यंदा बिग फाईट, मनसे-शिंदे गट अन् ठाकरे गटामध्ये तिरंगी लढत.
निलेश राणे धनुष्यबाण हाती घेणार, कुडाळ येथे पक्षप्रवेशाची जय्यत तयारी
निलेश राणे धनुष्यबाण हाती घेणार, कुडाळ येथे पक्षप्रवेशाची जय्यत तयारी.
महायुतीतून भाजपचे 99, शिंदेचे 45 उमेदवार जाहीर, या 18 जागांवर पेच कायम
महायुतीतून भाजपचे 99, शिंदेचे 45 उमेदवार जाहीर, या 18 जागांवर पेच कायम.
'संजय राऊत हा कुत्र्यासारखा...', शहाजी बापू पाटलांची घसरली जीभ
'संजय राऊत हा कुत्र्यासारखा...', शहाजी बापू पाटलांची घसरली जीभ.
दादांच्या राष्ट्रवादीकडून पहिली यादी जाहीर, 'या' 38 उमेदवारांना संधी
दादांच्या राष्ट्रवादीकडून पहिली यादी जाहीर, 'या' 38 उमेदवारांना संधी.
शिंदे-भाजपात 5 जागांचा वाद, 2019 ला बंडानं खेळखंडोबा, यंदा काय होणार?
शिंदे-भाजपात 5 जागांचा वाद, 2019 ला बंडानं खेळखंडोबा, यंदा काय होणार?.