अमिताभ बच्चन यांची कोणती जाहिरात उद्धव ठाकरेंना आठवली ?

एकनाथ शिंदे आणि भाजपवर टीका करत असतांना अमिताभ बच्चन यांच्या जाहिरातीचा संदर्भ उद्धव ठाकरे यांनी दिला आहे.

अमिताभ बच्चन  यांची कोणती जाहिरात उद्धव ठाकरेंना आठवली ?
Image Credit source: Google
Follow us
| Updated on: Oct 09, 2022 | 9:08 PM

मुंबई : उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना आज लाईव्हच्या माध्यमातून जनतेशी संवाद साधत असतांना जेष्ठ अभिनेते अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांची आठवण झाली होती. शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण हे चिन्ह निवडणूक आयोगाने गोठवल्यानंतर उद्धव ठाकरे जनतेशी लाईव्हच्या माध्यमातून लाईव्ह संवाद साधत होते. त्याच दरम्यान शिंदे गटाची परिस्थिती येत्या काळात कशी होईल याचा संदर्भ देतांना उद्धव ठाकरे यांनी अमिताभ बच्चन यांच्या जाहिरातीचा आधार घेतला आहे. त्यात उद्धव ठाकरे यांनी अमिताभ बच्चन हे एका सरबताची जाहिरात करतात, ते सरबत आपण घेतो, घरी आणतो फ्रीजमध्ये ठेवतो आणि सरबत पिल्यावर ती बाटली कचऱ्याच्या डब्यात फेकून देतो असे या गटाचे होणार असल्याचे उद्धव ठाकरे यांनी म्हंटले आहे. त्यामुळे शिंदे गटाचा भाजप वापर करत असून त्यांचे काम झाल्यावर शिंदे गटाचा कचरा करतील असा निष्कर्ष ठाकरेंनी काढल्याचे यातून दिसून येत आहे.

एकनाथ शिंदे आणि भाजपवर टीका करत असतांना अमिताभ बच्चन यांच्या जाहिरातीचा संदर्भ उद्धव ठाकरे यांनी दिला आहे.

उद्धव ठाकरे यांनी याशिवाय महाशक्ती म्हणून भाजपचा उल्लेख करत भाजपवर अप्रत्यक्षपणे शिवसेना संपवण्याचा प्रयत्न शिंदे गटाच्या माध्यमातून होत असल्याचेही म्हंटले आहे.

शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण हे चिन्ह निवडणूक आयोगाने काही काळासाठी गोठवले असल्याने उद्धव ठाकरे यांनी पक्षाच्या चिन्हाची आणि नावाची तीन पर्याय देखील यावेळेला सांगितले.

त्रिशूल, उगवता सूर्य, मशाल हे तीन चिन्हाचे पर्याय निवडणूक आयोगाला दिले आहेत तर नावांचे देखील तीन पर्याय उद्धव ठाकरे यांनी सांगितले आहेत.

गटाचे नाव सुचवत असतांना बाळासाहेब ठाकरे हे नाव प्रत्येक नावात शिवसेनेने ठेवल्याचे दिसून येत असून बाळासाहेब आणि शिवसेना हे समीकरण आपल्याकडेच कसे येईल याचा प्रयत्न केला आहे.

शिवसेना बाळासाहेब ठाकरे, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, शिवसेना बाळासाहेब प्रबोधनकार ठाकरे अशी तीन नावे पर्याय म्हणून सुचवली आहे.

18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.