‘अमित शाहजी डोक्याला ब्राह्मी तेल लावा, कारण तुमचा….’, उद्धव ठाकरे यांचा प्रचंड घणाघात

"माझ्यावर टीका करताय की, उद्धव ठाकरे कलम 370 रद्द करण्याला विरोध करणाऱ्यांच्या बाजूला जावून बसलेत. अमित शाहजी डोक्याला ब्राह्मी तेल वगैरे लावा. कारण तुम्हा स्मृतीभ्रंश झाला असेल तर आठवण करुन देतो कलम 370 रद्द करताना शिवसेनेने पाठिंबा दिला होता", अशा शब्दांत उद्धव ठाकरे यांनी अमित शाह यांच्यावर निशाणा साधला.

'अमित शाहजी डोक्याला ब्राह्मी तेल लावा, कारण तुमचा....', उद्धव ठाकरे यांचा प्रचंड घणाघात
उद्धव ठाकरे यांची अमित शाह यांच्यावर टीका
Follow us
| Updated on: Nov 10, 2024 | 6:15 PM

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांची सोलापुरातील सांगोल्यात जाहीर सभा झाली. यावेळी उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यावर निशाणा साधला. “मोदी, शाह फिरत आहेत. अमित शाह यांच्याबरोबर बोलायचीच बात नाही. लगे रहो मुन्नाभाई बघितला होता ना, त्यातल्या सर्किटसारखे फिरत आहे. क्या करने का भाई, किसको उठाने का हैं. बोलना भाई करेंगा ना मैं. काय माणसं, काय भाषा? येऊन जावून काय, दीपक आबा तुम्ही सांगोल्याकरांच्या व्यथा सांगितल्या अजूनही निरा उजव्या कालव्याचं पाणी थेट येत नाही. कधी येणार? मी विदर्भात गेलो होतो, मराठवाड्यात गेलो होतो. सगळीकडे शेतकरी हवालदिल आहेत. इथेही शेतकरी आले आहेत. तुम्हाला शेतमालाला भाव मिळतोय? अरे पण आम्ही 370 कलम काढलं ना? मग तुम्हाला शेतमालाला भाव मिळत नाही? कशासाठी आणि कुणाला बोलताय?”, असा सवाल उद्धव ठाकरे यांनी केला.

“माझ्यावर टीका करताय की, उद्धव ठाकरे कलम 370 रद्द करण्याला विरोध करणाऱ्यांच्या बाजूला जावून बसलेत. अमित शाहजी डोक्याला ब्राह्मी तेल वगैरे लावा. कारण तुम्हा स्मृतीभ्रंश झाला असेल तर आठवण करुन देतो कलम 370 रद्द करताना शिवसेनेने पाठिंबा दिला होता. आम्ही कुणाबरोबर बसतोय, काय करतोय, हे हेरगिरी करण्यापेक्षा जरा एका गोष्टीचं उत्तर तमाम महाराष्ट्र आणि देशाला द्या, जेव्हा काश्मीरमध्ये तिथल्या हिंदू पंडितांवर अत्याचार होत होते, त्यांच्या हत्या होत होत्या, अतिरेकी त्यांचे घरे-दारे बळकावत होते, तेव्हा मोदी आणि शाह हे नावं त्यांच्या घराच्या बाहेर कुणाला माहीत नव्हतं. त्या काळात फक्त हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी काश्मीरी पंडितांना महाराष्ट्रात आसरा दिला होता. बाळासाहेब तेव्हा पंतप्रधान नव्हते”, असं उद्धव ठाकरे म्हणाले.

‘तुम्हाला पुन्हा हिंदू-मुस्लिम वाद आणायचाय’

“तुम्ही कलम 370 काढल्याचा जो डंका पिटत आहात, ते कलम काढून किती वर्षे झाली? 370 कलम काढल्यानंतर तुम्ही किती काश्मीरी पंडितांना घरी घेऊन गेलात ते सांगा. मग डंका तुमचा डंका पिटा. आज महाराष्ट्राची जनता रोजगार मागते, तुम्ही सांगता 370 कलम काढले. महाराष्ट्राची जनता शेतमालाला भाव मागते तर तुम्ही सांगता राम मंदिर बांधले. राम मंदिर बांधताना आम्ही तुमच्यासोबत नव्हतो का? मी मुख्यमंत्री होण्याच्याआधी देखील गेलो होतो आणि मुख्यमंत्री झाल्यानंतरही काँग्रेस आमदारांना घेऊन अयोध्येत गेलो होतो. पण तुम्हाला सगळ्यांना असं भासवायचं आणि पुन्हा हिंदू-मुस्लिम वाद आणायचाय”, असा आरोप उद्धव ठाकरेंनी केला.

हे सुद्धा वाचा

‘अदाणीच्या घशातून मुंबई काढणार आणि…’

“इथले जे मुलभूत प्रश्न आहेत त्यावर का बोलत नाहीत? मुंबईपासून सांगोला किती लांब आहे? एवढ्या लांब असलेली मुंबई कुणाच्या घशात घालत आहात? अदाणी. म्हणजे 400 किमी दूरवर असलेली मुंबई अदाणीच्या घशात घालत आहेत ते तुम्हाला माहिती आहे. मग उद्या विचार करा, यांचं सरकार परत आल्यानंतर तुमच्या सात-बाऱ्यावर अदाणीचं नाव आलं तर काय कराल? आपल्या महाविकास आघाडीचं सरकार आल्यानंतर जी मुंबई अदाणीच्या घशात घातली आहे ती त्याच्या घशातून काढून मी माझ्या महाराष्ट्राच्या भूमीपुत्रांना मुंबई आणि आजूबाजूच्या परिसरात परवडणाऱ्या दरात घर घेऊन दाखवणार. ते करणारच. मध्ये आडवे येऊन दाखवा. एक महाराष्ट्र म्हणून आपल्या स्वाभिमान आहे की नाही? मोदी-शाह यांनी येऊन टपली मारुन जायचं? हा महाराष्ट्र मर्दांचा महाराष्ट्र आहे”, असं उद्धव ठाकरे म्हणाले.

Non Stop LIVE Update
राज यांच्या सभेत राऊतांसाठी एक खूर्ची, 'मनसे'च्या सभेसाठी निमंत्रण
राज यांच्या सभेत राऊतांसाठी एक खूर्ची, 'मनसे'च्या सभेसाठी निमंत्रण.
'मोदी अन् शाहांच्या बॅगा जाताना तपासा, कारण...' ठाकरेंचा घणाघात
'मोदी अन् शाहांच्या बॅगा जाताना तपासा, कारण...' ठाकरेंचा घणाघात.
'...तर उद्धव ठाकरेंनी बाय रोड जाऊन दाखवावं', नारायण राणेंचं ओपन चॅलेंज
'...तर उद्धव ठाकरेंनी बाय रोड जाऊन दाखवावं', नारायण राणेंचं ओपन चॅलेंज.
'15 मिनिटांचं एकच उत्तर 100 टक्के..', संभाजीनगरमध्ये बॅनरबाजी अन् खळबळ
'15 मिनिटांचं एकच उत्तर 100 टक्के..', संभाजीनगरमध्ये बॅनरबाजी अन् खळबळ.
'भाजपचे हाल कुत्र्यासारखे...', ठाकरे गटाच्या नेत्याचं पटोलेंना समर्थन
'भाजपचे हाल कुत्र्यासारखे...', ठाकरे गटाच्या नेत्याचं पटोलेंना समर्थन.
पवारांचा पलटवार, राज ठाकरेंच्या टीकेवर म्हणाले, त्यांना दुर्लक्ष करण..
पवारांचा पलटवार, राज ठाकरेंच्या टीकेवर म्हणाले, त्यांना दुर्लक्ष करण...
दानवेंची कार्यकर्त्याला लाथ अन् पवारांसह राऊतांचा निशाणा; म्हणाले...
दानवेंची कार्यकर्त्याला लाथ अन् पवारांसह राऊतांचा निशाणा; म्हणाले....
ठाकरेंच्या या उमेदवारांना विधानसभा निवडणुकीत विजयी करा, मौलानाचं आवाहन
ठाकरेंच्या या उमेदवारांना विधानसभा निवडणुकीत विजयी करा, मौलानाचं आवाहन.
उद्धव ठाकरे गटाला महायुतीनं डिवचलं, 'मातोश्री'बाहेर महायुतीची बॅनरबाजी
उद्धव ठाकरे गटाला महायुतीनं डिवचलं, 'मातोश्री'बाहेर महायुतीची बॅनरबाजी.
रावसाहेब दानवेंनी घातली कार्यकर्त्याला लाथ, व्हिडीओ होतोय व्हायरल
रावसाहेब दानवेंनी घातली कार्यकर्त्याला लाथ, व्हिडीओ होतोय व्हायरल.