Dasara Melava 2023 : ‘लग्नाला जाणार, निघताना नवरा बायकोमध्ये भांडण लावणार अशी यांची नीती’, उद्धव ठाकरे कडाडले

सर्वोच्च न्यायालय सांगत की टाईम टेबल सादर करा. अध्यक्ष सांगतात आमच्या वेळेनुसार देऊ. मी कोणाचाही अपमान करू इच्छित नाही. पण ज्या पद्धतीने सगळं चाललेलं आहे ते बघितल्यानंतर एक विनोद लक्षात येतो.

Dasara Melava 2023 : 'लग्नाला जाणार, निघताना नवरा बायकोमध्ये भांडण लावणार अशी यांची नीती', उद्धव ठाकरे कडाडले
UDDHAV THACKAREYImage Credit source: TV9 NEWS NETWORK
Follow us
| Updated on: Oct 24, 2023 | 9:00 PM

मुंबई | 24 ऑक्टोंबर 2023 : आपली परंपरा आपण चालू ठेवली आहे. पुढची अनेक वर्ष ही अशीच चालू ठेवणार आहोत. सर्वप्रथम दसऱ्याच्या मी तुम्हाला सर्वांना शुभेच्छा देतो. आज दसरा आहे. शस्त्रपूजन आहे, सरस्वती पूजन आहे. हा मेळावा त्या संस्कृतीचे एक विराट दर्शन आहे. रामाने रावणाचा वध केला. कशासाठी केला? कारण असं ऐकलं आहे, एवढा शिवभक्त असूनसुद्धा रामाला त्याला मारावे लागलं. कारण, रावण माजला होता. रावणाने सीतेला पळवलं होतं. त्याचप्रमाणे आज सुद्धा आपली शिवसेना पळवण्याचा प्रयत्न होतोय. आपण खबरदारी घेतली आहे. त्यांनी रावणाचा वध केला होता भानगड नको म्हणून. तो धनुष्यबाण सुद्धा चोरला आहे. पण एक लक्षात घ्या की ज्याप्रमाणे हनुमानाने रावणाची सोन्याची लंका दहन केली होती तशीच तुमची खोक्याची लंका दहन करणार असा इशारा शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिला.

एक कमला आणि दुसरा तुम्हाला माहित आहे

शिवाजी पार्क येथील दसरा मेळाव्याला संबोधित करताना उद्धव ठाकरे यांनी भाजपवर सडकून टीका केली. मी गद्दारांवर जास्त बोलणार नाही. पण, त्यांच्यावर बोलण्याची आता गरज नाही. कारण तुम्ही सगळेजण बोलत आहात. सध्या क्रिकेटचा मौसम आहे. काही जाहिरातीमध्ये तीन हिरो दाखवतात. अजय देवगन, अक्षय कुमार आणि शाहरुख येतात. दोन दोन बोट दाखवतात. आमच्याकडे काही बसले आहेत. आमच्याकडे सुद्धा दोन दोन हाफ आहेत. एक कमला आणि दुसरा तुम्हाला माहित आहे असा टोला ठाकरे यांनी लगावला.

खाऊन खाणार तरी किती?

संसदेचे अधिवेशन झाले. संसदेला तो अधिकार आहे. त्याचप्रमाणे सर्वोच्च न्यायालयाला निर्णय घेण्याचा अधिकार आहे. ज्याप्रमाणे दिल्लीचा निर्णय घेतला. संपूर्ण बदल्याचे अधिकार हा कोर्टाने दिलेला निर्णय आहे. पाशवी बहुमताच्या जोरावर तो तुम्ही हिरावून घेतला. भाजप एवढा विघ्न संतोषी आहे की कोणाचे लग्न असो तुम्ही बोलवण पाठवू नका. पण, हे जाणार, बसणार, भरपूर जेवणार. श्रीखंड पुरी असेल, बासुंदी असेल. किती पोळ्या खाणार याच्या स्पर्धा लावतील. खाऊन खाणार तरी किती? पण, निघताना नवरा बायकोमध्ये भांडण लावून निघणार अशी याची नीती आहे अशी जळजळीत टीका त्यांनी भाजपवर केली.

हे सुद्धा वाचा

आपण सुप्रीम कोर्टात गेलो. तारीखवर तारीख मिळते.

तुमच्या घरी चोरी करतो. तुमची घरदार आणि पेटवतो आणि पुन्हा तुमचे रक्षण करते म्हणून सांगणार. तुमच्या घरांच्या होळीवर आम्ही आमची पोळी भाजणार. आपण सुप्रीम कोर्टात गेलो. तारीखवर तारीख मिळते. सर्वोच्च न्यायालय सांगत की टाईम टेबल सादर करा. अध्यक्ष सांगतात आमच्या वेळेनुसार देऊ. मी कोणाचाही अपमान करू इच्छित नाही. पण ज्या पद्धतीने सगळं चाललेलं आहे ते बघितल्यानंतर एक विनोद लक्षात येतो.

सर्वोच्च न्यायालयाच्या अस्तित्व राहणार आहे की नाही?

कोर्टात केस चालू असते. कोर्ट विचारते पुढची केस कोणती? एका वीस वर्षाच्या मुलीची झेड काढलेल्या प्रक्रांची केस सुरु असते. एक आजोबा असतात. कोर्ट त्यांना विचारते, तुम्हाला लाज नाही वाटत? वीस वर्षाच्या मुलीची छेड काढता? आजोबा म्हणतात, न्यायाधीश महाराज जेव्हा ही घटना घडली तेव्हा मी सुद्धा वीस वर्षाचा होतो. वीस वर्षाचा असताना ती घटना घडली. आता ते आजोबा झाले. जिची छेड काढली होती त्याही आजी झाल्या. सध्या तेच सुरु आहे. भारतामध्ये सर्वोच्च न्यायालय म्हणून जे काही आहे त्याला हा लवाद जुमानत नसेल तर सर्वोच्च न्यायालयाच्या अस्तित्व राहणार आहे की नाही? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटना हिचे अस्तित्व शिल्लक राहणार आहे की नाही? सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अनेक क्रांतिकारक आणि अनेक योध्यांनी रक्त सांडून बलिदान देऊन त्या करून जे आपले भारत माता स्वतंत्र जाणार आहे की नाही असा सवाल त्यांनी केला.

'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?
'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?.
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्...
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्....
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?.
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र.
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला.
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती.
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद.
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?.
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच.
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली.