Ullhasnagar : लहानपणी रांगेत उभे राहून दर्शन अन् आज आषाढी पूजेचा मान, मंत्री कपिल पाटलांना बिर्ला मंदिरातील पूजेचा मान
राज्यातील जनतेला जे अपेक्षित सरकार होत तेच आता महाराष्ट्रात झाले आहे. महाविकास आघाडी काळात विकास कामांना ब्रेक लागला होता. पण आता राज्य आणि केंद्रामुळे महाराष्ट्र पुन्हा विकासाच्या वाटेवर येणार आहे. यापूर्वीची अनैसर्गिक अशी युती होती. शिवाय निधीबाबत अनेक आमदारांवर अन्यायही झाला होता. पण आता राज्यात आणि केंद्रात एकच सरकार असल्याने विकास कामांना खोडा बसणार नाही.
उल्हासनगर : केवळ (Pandharpur) पंढरपूरातच आषाढी वारीचा उत्साह नाही तर सबंध राज्यात विठू-माऊलीचा जयघोष सुरु आहे. पंढरपुरात विठ्ठल-रुक्मिणीची शासकीय पूजा झाल्यानंतर राज्यात विविध ठिकाणी मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये (Aashadhi Ekadashi) आषाढी पूजा पार पडल्यान आहेत. लहानपणी ज्या रांगेत उभे राहून दर्शन घेतले जायचे आज त्याच बिर्ला मंदिरात आषाढीची पूजा करण्याचा मान मिळाला हे भाग्य असल्याचे (Kapil Patil) केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांनी सांगितले. बिर्ला मंदिरात विठ्ठलाची पूजा करण्याचा मान त्यांना मिळाला आहे. शिवाय आपल्याला मिळालेले मंत्रिपद ही देखील विठ्ठलाचीच किमया असल्याचे त्यांनी सांगितले आहे.
विधीवत पूजा अन् विठुरायाला दुग्धाभिषेक
सेंच्युरी रेयॉन कंपनीने बांधलेलं हे मंदिर अनेक वर्षे जुनं असून आषाढी कार्तिकीला ज्यांना पंढरपूरला जाणं शक्य होत नाही, असे भाविक या मंदिरात दर्शनासाठी मोठ्या संख्येनं येतात. आज पहाटे केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांनी या मंदिरात विठ्ठल रखुमाईला दुग्धाभिषेक घातला. त्यानंतर विठ्ठल रखुमाईची विधिवत पूजा आणि आरती केली. देशात सुख, समृद्धी राहावी, तसंच महाराष्ट्रात पाऊस उशिरा सुरू झाल्यामुळे बळीराजा संकटात येऊ शकतो. त्यामुळे बळीराजावरील संकट दूर व्हावं, अशी प्रार्थना विठुरायाला केल्याचं कपिल पाटील म्हणाले.
जनतेच्या मनातलं सरकार राज्यात
राज्यातील जनतेला जे अपेक्षित सरकार होत तेच आता महाराष्ट्रात झाले आहे. महाविकास आघाडी काळात विकास कामांना ब्रेक लागला होता. पण आता राज्य आणि केंद्रामुळे महाराष्ट्र पुन्हा विकासाच्या वाटेवर येणार आहे. यापूर्वीची अनैसर्गिक अशी युती होती. शिवाय निधीबाबत अनेक आमदारांवर अन्यायही झाला होता. पण आता राज्यात आणि केंद्रात एकच सरकार असल्याने विकास कामांना खोडा बसणार नाही. शिवाय जनतेला जे अपेक्षित होते तेच ह्या सत्तांतरानंतर झाले आहे. त्यामुळे आषाढीपूर्वीच विठ्ठ्लाने प्रसाद तर दिला असल्याचे पाटील म्हणाले. हा आशीर्वाद आणि प्रसाद आमच्यासोबतच महाराष्ट्राच्या तमाम जनतेला आहे, असं ते म्हणाले.
राष्ट्रपती पदाची निवडणूक बिनविरोध व्हावी
शिवसेनेचे खासदार भाजपच्या राष्ट्रपतीपदाच्या उमेदवाराला पाठींबा देण्याची मागणी करत असल्याबाबत कपिल पाटील यांना विचारलं असता, शिवसेनेच्या खासदारांनी एनडीएच्या राष्ट्रपतीपदाच्या उमेदवार द्रौपदी मुर्मु यांना पाठींबा देण्याची मागणी करणारं पत्र उद्धव ठाकरेंना दिलं आहे. याबाबत निर्णय घेण्यासाठी उद्धव ठाकरे सक्षम आहेत, असं तर म्हणाले. राष्ट्रपतीपदाची निवडणूक बिनविरोध व्हावी, ही अशी भावना सर्वांचीच असते. या देशात पहिल्यांदा आदिवासी भगिनीला राष्ट्रपतीपदावर काम करण्याची संधी मिळतेय, ही मोठी गोष्ट आहे.