AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

University of Health Sciences : आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या उन्हाळी परीक्षा 19 मे पासून

नाशिक येथील महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या उन्हाळी सत्र परीक्षा19 मे 2022 पासून सुरू होणार आहेत. या परीक्षा दोन टप्प्यात घेतल्या जाणार आहेत. त्यात पहिला टप्पा हा पदव्युत्तर वैद्यकीय विद्याशाखांच्या पदवी व पदविका अभ्यासक्रमाचा आहे, अशी माहिती परीक्षा नियंत्रक (Controller of Examinations) डॉ. अजित पाठक यांनी दिली.

University of Health Sciences : आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या उन्हाळी परीक्षा 19 मे पासून
Maharashtra University of Health Sciences, Nashik
| Updated on: Apr 20, 2022 | 12:51 PM
Share

नाशिकः नाशिक येथील महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या (Maharashtra University of Health Sciences) उन्हाळी सत्र परीक्षा19 मे 2022 पासून सुरू होणार आहेत. या परीक्षा दोन टप्प्यात घेतल्या जाणार असून, पहिला टप्पा हा पदव्युत्तर वैद्यकीय विद्याशाखांच्या पदवी व पदविका अभ्यासक्रमाचा आहे, अशी माहिती परीक्षा नियंत्रक (Controller of Examinations) डॉ. अजित पाठक यांनी दिली. पाठक म्हणाले की, विद्यापीठाच्या उन्हाळी परीक्षांचे वेळापत्रक विद्यापीठाच्या अधिकृत संकेतस्थळावर जाहीर करण्यात आले आहे. राज्यातील विविध केंद्रांवर उन्हाळी सत्र-2022 ही परीक्षा एकूण 2200 विद्यार्थी देणार आहेत. दुसरा टप्पा हा पदव्युत्तर वैद्यकीय अभ्यासक्रम (Medical course) वगळता उर्वरित सर्व पदव्युत्तर आरोग्य विज्ञान विद्याशाखेच्या वैद्यकीय, दंत, आयुर्वेदिक, युनानी, होमिओपॅथी, भौतिकोपचार, व्यवसायोपचार, भाषा श्रवणदोष, कृत्रिम अवयव विज्ञान, परिचर्या व सर्व आरोग्य विज्ञान विद्याशाखेच्या पदवीच्या सर्व वर्षांच्या लेखी परीक्षेचा आहे. या परीक्षा 01 जुलै 2022 पासून सुरू होणार असून त्या 31 ऑगस्ट 2022 रोजी समाप्त होणार आहेत. ही परीक्षा एकूण 45,000 विद्यार्थी देणार आहेत.

हिवाळी परीक्षेची पेपर तपासणी

विद्यापीठाच्या हिवाळी सत्र – 2021 परीक्षेचे निकाळ 14 दिवसांच्या आत विद्यापीठाकडून जाहीर करण्यात आले आहेत. सद्य स्थितीत सर्व आरोग्य विज्ञान विद्याशाखांचे पदवीच्या 74661 विद्यार्थ्यांचे सर्व वर्षांच्या हिवाळी 2021 परीक्षांच्या प्रात्यक्षिक परीक्षा व लेखी परीक्षांचे उत्तरपत्रिकांचे मूल्यमापन सुरू आहे. सदर परीक्षांचे निकाल मे-2022 अखेरीस जाहीर होणार असल्याचे समजते. सध्या विद्यापीठाकडून परीक्षेची तयारी जोरात सुरू असल्याचे सांगण्यात आले आहे.

येथे मिळेल वेळापत्रक

विद्यापीठाच्या कुलगुरू माधुरी कानिटकर व कुलसचिव यांच्या मार्गदर्शनाखाली परीक्षेचे कामकाज सुरू आहे. या परीक्षा यशस्वी होण्यासाठी परीक्षा विभागातील सर्व अधिकारी व कर्मचारी अविरत प्रयत्नशील आहेत. विद्यापीठाच्या परीक्षेविषयी अधिक माहिती विद्यापीठाचे अधिकृत संकेतस्थळ www.muhs.ac.in वर माहिती प्रसिद्ध करण्यात आली आहे.

महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या राज्यातील विविध केंद्रांवर उन्हाळी सत्र-2022 ही परीक्षा एकूण 2200 विद्यार्थी देणार आहेत. विद्यापीठाच्या उन्हाळी परीक्षांचे वेळापत्रक विद्यापीठाच्या अधिकृत संकेतस्थळावर जाहीर करण्यात आले आहे. – डॉ. अजित पाठक, परीक्षा नियंत्रक

इतर बातम्याः

Special Report | देशातल्या सर्वात मोठ्या लेखकाची ख्यातनाम प्रकाशकांकडून लूट; कोण फोडणार पुस्तकांचा तुरुंग?

Mirza Ghalib | जगण्याचं तत्वज्ञान मलमली भाषेत सांगणाऱ्या असदुल्लाह-ख़ाँ-‘ग़ालिब’ का पता…!

महाराष्ट्राचा महापिता कर्नाटकाच्या मातीत एकाकी, समाधीवर साधे छप्परही नाही; पानिपतकारांच्या डोळ्यांत पाणी, पोटात गोळा!

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.