Rain Updates : राज्यात अनेक ठिकाणी अवकाळी पावसाची हजेरी, लासलगाव शहापूरमध्ये शेतीचं मोठ्या प्रमाणात नुकसान

राज्यात अनेक ठिकाणी अवकाळी पावसाने हजेरी लावलेली दिसली. काही ठिकाणी हलक्या सरी, तर काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस आला.

Rain Updates : राज्यात अनेक ठिकाणी अवकाळी पावसाची हजेरी, लासलगाव शहापूरमध्ये शेतीचं मोठ्या प्रमाणात नुकसान
मुंबईसह महाराष्ट्रात तीन दिवस मुसळधार पावसाची शक्यता
Follow us
| Updated on: May 01, 2021 | 9:50 PM

मुंबई : राज्यात अनेक ठिकाणी अवकाळी पावसाने हजेरी लावलेली दिसली. काही ठिकाणी हलक्या सरी, तर काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस आला. यामुळे लासलगाव, शहापूरसह काही ठिकाणी शेतीचं मोठं नुकसान झालंय. कोरोना आणि लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर काबाड कष्ट करुन शेतात पिकवलेलं पिक हातातोंडाशी आलेलं असताना पावसाने हिरावलंय. त्यामुळे शेतकऱ्यांकडून सरकारकडे आर्थिक मदतीची मागणी होतेय. दुसीकडे कडक उन्हाच्या पार्श्वभूमीवर वातावरणात काहीसा गारवा सुटलाय. यामुळे नागरिकांची काही वेळ का होईना उकाड्यापासून सुटका झालीय (Unseasonable rain updates of Maharashtra big damage to farmers of Lasalgaon Shahapur).

शहापूर तालुक्यात अवकाळी पाऊस व वादळाने केळी बागायत शेतकऱ्याचे लाखो रुपयांचे नुकसान

शहापूर तालुक्याचे आणि ठाणे जिल्ह्याचे शेवटचे टोक असलेल्या आजोबा पर्वताच्या पायथ्याशी वसलेल्या वालशेत या गावात राहत असलेला गणेश उमवणे या तरुणांची 2020 मधील लॉकडाऊन काळात नोकरी गेली. उपासमारीची वेळ आली. अति दुर्गम भागात काहीही काम धंदा नसल्याने भावाने व नातेवाईकांनी मदत केली. त्याने आपल्या जमिनीत अतिशय मेहनत घेऊन केळीची बाग तयार केली.

अगदी 10 महिन्यात बाग चांगली बहरली. शहापूर तालुक्यात त्याने पहिलाच प्रयोग केला. तो यशस्वी सुद्धा झाला. केळीचा एक-एक फणा अगदी 35 ते 40 किलो वजनाचा झाला आणि आपल्या पदरात आता लाखो रुपये पडणार म्हणून तरुण शेतकरी गणेश उमवणे अगदी आनंदात होता. परंतु या बहरलेल्या बागेवर निसर्गाने घाला घातला आणि होत्याचे नव्हते केले. अवकाळी पावसाने हाता तोंडाशी आलेला घास निघून गेला. पाऊस व वादळाने तयार झालेली अनेक केळीची झाडे उन्मळून खाली पडली व लाखो रुपयांचे नुकसान झाले.

सोलापूर

सोलापूर शहरातही पाऊस झालाय. सकाळपासून शहरात ढगाळ वातावरण होते. अखेर पावसाने हजेरी लावली.

वसई विरार

वसई विरार नालासोपारामध्ये हलक्या पावसाच्या सरी पाहायला मिळाल्या. सकाळी साडेआठच्या दरम्यान पावसाने हजेरी लावली. पावसाच्या सरींनी हवेत गारवा पसलाय. त्यामुळे उकाड्याने त्रस्त असणाऱ्या नागरिकांना दिलासा मिळालाय. विरार पूर्व विवा जहांगीड कॉम्प्लेक्समध्ये पावसाचं लक्ष्य वेधून घेणारं दृश्य दिसलं.

कणकवलीत (सिंधुदुर्ग) गारांसह अवकाळी पाऊस, बच्चे कंपनीची धमाल

कणकवली तालुक्यातील काही भागात अवकाळी पाऊसाने दमदार हजेरी लावली. कणकवली तालुक्यातील फोंडाघाट परिसरात सोसाट्याच्या वाऱ्यासह दमदार पाऊस पडला. गारांचाही वर्षाव झाला. या अवकाळी पावसाचा आणि गारांचा बच्चे कंपनीने चांगलाच आनंद घेतला. अचानक आलेल्या पावसामुळे हवेत गारवा निर्माण झाला. उकाड्याने हैराण झालेले असतानाच पावसाच्या गारव्याने चांगलाच दिलासा दिला.

लासलगावमध्ये कांदा उत्पादक शेतकरी पुन्हा अडचणीत, अवकाळी पावसाने कांदा पिकाचे मोठे नुकसान

कांदा उत्पादकांच्या अडचणीत पुन्हा वाढ झाली आहे. कोरोनामुळे लासलगावसह नाशिक जिल्ह्यातील बाजार समित्या बंद आहेत. अशातच विजेच्या कडकडाटासह अवकाळी पावसाने शुक्रवारी (30 एप्रिल) संध्याकाळी जोरदार हजेरी लावली. त्यामुळे कांद्यासह शेतीपिकांना मोठा फटका बसला आहे. त्यामुळे कांदा उत्पादक शेतकरी पुन्हा अडचणीत सापडला आहे.

गेले दोन-तीन दिवस ढगाळ वातावरण होते. हवेत कमालीचा उकाडा असून पाऊस झाला नाही, पण शुक्रवारी संध्याकाळच्या सुमारास वातावरणात अचानक बदल होऊन लासलगावसह परिसरातील गावात विजेच्या कडकडाटासह अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली. दुपारपर्यंत कडक ऊन होते. अचानक आलेल्या पावसाने काढलेला शेतीमाल झाकण्यासाठी बळीराजाची एकच धावपळ उडाली. शेतात उभे असलेले पीक आणि ठिकठिकाणी सध्या कांद्याच्या पिकाची काढणी सुरू आहे. अशातच अचानक पाऊस सुरू झाल्याने तीन ते चार महिने पोटच्या मुलाप्रमाणे संभाळ केलेली पिके डोळ्या देखत ओली झाल्याने मोठे नुकसान झाले आहे.

यामुळे आता कांद्याच्या पिकाची प्रतवारी घसरणार आहे. उत्पादन खर्चही निघणे मुश्कील होणार आहे. कोरोना महामारी सुरु असल्याने कांद्याला मागणी घटली आहे. त्यामुळे कांद्याच्या बाजार भावात दररोज कमालीची घसरण होत आहे. अशात कुटुंब चालवावं कसं असा प्रश्न आता कांदा उत्पादक शेतकर्‍यांसमोर उभा राहिला आहे, असं मत ब्राम्हणगाव विंचूरमधील शेतकरी मंगेश गवळी आणि संदीप गवळी यांनी व्यक्त केलंय. आता कांदा उत्पादक शेतकऱ्यांकडे केंद्र व राज्य सरकारने लक्ष देण्याची मागणी शेतकरी करत आहेत.

हेही वाचा :

Maharashtra Weather Alert | राज्यात काही ठिकाणी विजांच्या कडकडाट, वादळी वाऱ्यासह गारपीट होण्याची शक्यता

येत्या 24 तासांत देशातील काही भागात मुसळधार पावसाचा इशारा, विदर्भात गारपीटीची शक्यता

Weather Alert | महाराष्ट्रात अवकाळी पावसाचा तडाखा, रब्बी पिकांसह फळबागा, भाजीपाल्याचे मोठे नुकसान

व्हिडीओ पाहा :

Unseasonable rain updates of Maharashtra big damage to farmers of Lasalgaon Shahapur

18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.