उरण पोलिसांची धडक कारवाई, लाखोंचा सरकारी महसूल बुडविणारा बायोडिझल टँकर जप्त, आरोपीला बेड्या
धुतूम येथे हिंदुस्तान कंटेनर यार्ड मधून बायो डिझेलचा टँकर जप्त करून उरण पोलिसांनी धडक कारवाई केली आहे. | Uran police seize biodiesel tanker
उरण : धुतूम येथे हिंदुस्तान कंटेनर यार्ड मधून बायो डिझेलचा टँकर जप्त करून उरण पोलिसांनी धडक कारवाई केली आहे. टँकर क्रमांक एम एच 43 वाय 8151 क्रमांकाचा टँकर बायोडिझेल घेऊन धुतूम येथील हिंदुस्थान कंटेनर यार्ड मध्ये बायो डिझेलचा टँकर आढळून आला. हा टँकर कोणाचा आहे आणि ह्या यार्डमध्ये काय करतोय? कंटेनर यार्डचे व्यवस्थापक कोण आहे? यार्डचे मालक कोण आहे? विचारणा केली असता तेथील कर्मचाऱ्यांनी ह्याचे उत्तर दिले नाही. (Uran police seize biodiesel tanker)
आरोपी अटकेत, गुन्हा दाखल
घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पत्रकार दिलीप कडू यांनी उरण पोलिसांना संपर्क करून त्यांना पाचारण केले. उरण पोलीस ठाण्याचे पोलीस उप निरीक्षक वायकर व त्यांचे सहकारी घटना स्थळी पोहचले. त्यांनी पंचनामा करून टँकर जप्त करून १७८/२०२१ कलम ४२०, २८५, ३३६, ३४ भादवि प्रमाणे गुन्हा दाखल करून आरोपीस अटक केली आहे.
बायोडिझेल वर पूर्णपणे बंदी
बायोडिझेल हे रासायनिक प्रक्रिया करून बनवले जाते डिझेल इंधनाला पर्याय म्हणून ह्याचा उपयोग केला जातो. परंतु सरकारने बायोडिझेल वर पूर्णपणे बंदी केली आहे. बायोडिझेल हे डिझेल पेक्षा कमी किमतीत मिळते म्हणून चोरून याचा वापर केला जातो.
उरण भागात मोठ्या प्रमाणात कंटेनर यार्ड आहेत तेथील सिबर्ड नावाचे कंटेनर यार्ड आहे ह्या यार्डात मोठ्या प्रमाणत बायोडिझेलचा वापर केला जातो हिंदुस्थान यार्ड हे सिबर्ड कंपनीने भाडे तत्वावर घेतले असून त्या यार्डात सुद्धा बायोडिझेलचा वापर केला जातो. उरण भागात कारंजा जेटीवरसुद्धा बोटी साठी बायो डिझेलचा वापर केला जातो.
बायो डिझेलच्या वापराने सरकारी महसूल बुडीत, प्रदुषण वाढीस मदत
या बायो डिझेलच्या वापराने सरकारचा मोठ्या प्रमाणात महसूल बुडवला जात आहे व प्रदूषण वाढीस मदत होत आहे. उरण भागात बायो डिझेलचा मोठ्या प्रमाणात वापर होत असल्याने व त्यामुळे सरकारचा महसूल बुडत असल्याने प्रशासनाने गांभीर्याने यावर लक्ष ठेवणे गरजेचे आहे.
(Uran police seize biodiesel tanker)
हे ही वाचा :
मनसुख हिरेन मृत्यू प्रकरण, कांदिवली क्राईम ब्रांचच्या पोलीस निरीक्षकाची ATS कडून चौकशी
अभिनेत्याकडून तब्बल 50 लाखाच्या नकली नोटा जप्त, पोलिसांकडून बेड्या, फिल्मी दुनियेत खळबळ