Online admission process : RTE अंतर्गत 25 टक्के ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया 28 डिसेंबरपासून सुरू, सविस्तर वेळापत्रक पाहा
आरटीई अंतर्गत घेण्यात येणाऱ्या प्रवेश प्रक्रियेचे वेळापत्रक वर्षा गायवाड यांनी जाहीर केले आहे. 28 डिसेंबरपासून या ऑनलाीन प्रवेश प्रक्रियाला सुरूवात होणार असल्यची माहिती शालेय शिक्षणंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली आहे.
मुंबई : आरटीई अंतर्गत घेण्यात येणाऱ्या प्रवेश प्रक्रियेचे वेळापत्रक वर्षा गायवाड यांनी जाहीर केले आहे. 28 डिसेंबरपासून या ऑनलाीन प्रवेश प्रक्रियाला सुरूवात होणार असल्यची माहिती शालेय शिक्षणंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली आहे. त्यामुळे विद्यार्थी आणि पालकांनी आता कागदप्रत्रांची जुळवाजुळव सुरू केली आहे.
प्रवेश प्रक्रियेचे सविस्तर वेळापत्रक
आर.टी. ई प्रवेशपात्र 2021-22 च्या NIC तर्फे ऑटो फॉरवर्ड केलेल्या शाळांची BEO स्तरावर तपासणी करण्यासाठी 28 डिसेंबर ते 17 जानेवारीपर्यंतचा कालावधी देण्यात आला आहे. आवश्यकता भासल्यास या कालावधीत वाढ करणार असल्याची माहितीही देण्यात आली आहे. पालकांना ऑनलाईन अर्ज करण्यासाठी 1 फेब्रुवारी ते 28 फेब्रुवारीपर्यंतचा कालावधी मिळणार आहे. तसेच लॉटरीद्वारे प्रवेश मिळवलेल्या निवड यादीतील पालकांनी विहीत मुदतीत शाळेकडे जाऊन कागदपत्रांची पडताळणी करायची आहे. त्यावेळी त्यांना प्रवेश तात्पुरता निश्चित करावा लागणार आहे. त्यासाठी 10 मार्च ते 31 मार्चपर्यंतची मुदत देण्यात आली आहे. 8 मार्च ते 9 मार्च या कालावधीत सोडत काढण्यात येणार आहे.
सन २०२२-२३ या शैक्षणिक वर्षाकरीता आरटीई (RTE) अंतर्गत २५ टक्के ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया २८ डिसेंबर २०२१ पासून सुरू करत आहोत; संभाव्य वेळापत्रक सोबत जोडले आहे. @MahaDGIPR @scertmaha @msbshse #RTE pic.twitter.com/IctWxMzfFu
— Prof. Varsha Eknath Gaikwad (@VarshaEGaikwad) December 23, 2021
प्रतीक्षा यादी चार टप्प्यात निघणार
या वेळापत्रकात प्रतीक्षा यादीबाबतही सविस्तर माहिती देण्यात आली आहे. वर्षा गायकवाड यांनी ट्विट करत हे वेळापत्रक जाहीर केले आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या ऑनलाईल प्रवेशाचाही मार्ग आता मोकळा झाल आहे. प्रतीक्षा यादी चार टप्प्यात काढण्यात येणार असल्याची माहिती शालेय विभागाकडून देण्यात आली आहे. तसेच राज्यात एकदाच लॉटरी काढण्यात येणार असून शाळेच्या रिक्त जागेच्या संख्ये इतकीच निवड यादी आणि प्रतीक्षा यादी जाहीर केली जाणार असल्याचीही माहिती देण्यात आली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेला आता वेग येणार आहे.