AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

वेदनादायी! 16 कोटीच्या इंजेक्शननंतरही चिमुकल्या वेदिकाचा मृत्यू, महाराष्ट्र हळहळला

लोकवर्गणीतून जमवले 16 कोटी, इंजेक्शनही दिलं पण श्वास घ्यायला त्रास, चिमुकल्या वेदिकाचा मृत्यू, पिंपरी चिंचवडवर शोककळा

वेदनादायी! 16 कोटीच्या इंजेक्शननंतरही चिमुकल्या वेदिकाचा मृत्यू, महाराष्ट्र हळहळला
वेदिका शिंदे
Follow us
| Updated on: Aug 02, 2021 | 9:24 AM

पुणे : लोकवर्गणीतून 16 कोटी रुपये जमवून इंजेक्शनची तजवीज करुनही पिंपरी चिंचवडमधील चिमुकल्या वेदिका शिंदेंचे (Vedika Shinde) प्राण वाचू शकले नाहीत. आज (1 ऑगस्ट) सायंकाळाळी वेदिका खेळत असताना तिला अचानकपणे श्वास घेण्यास त्रास झाला. रुग्णालयात दाखल केले असता तिचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. वेदिकावर उपचार करण्यासाठी तिच्या आई-वडिलांनी क्राऊड फंडिंगद्वारे 16 कोटी रुपये जमा केले होते. त्यासाठी तिच्या पालकांनी जीवाचे रान केले होते. मात्र वेदिकाचा मृत्यू झाला. (Vedika Shinde of Pimpri Chinchwad suffering from Spinal Muscular Atrophy died due to breathing complications)

इंजेक्शनसाठी लोकवर्गणीतून जमवले होते 16 कोटी रुपये 

वेदिका Spinal Muscular Atrophy या जनुकीय आजाराने ग्रस्त होती. वेदिकाला हा आजार असल्याचे निष्पन्न झाल्यानंतर तिचे आईवडील चांगलेच हादरले होते. मात्र, नंतर हिम्मत न हारता त्यांनी वेदिकावर उपचार करण्याचे ठरवले. त्यासाठी तब्बल 16 कोटी रुपये किमतीचे इंजेक्शन खरेदी करण्याचेही त्यांनी ठऱवले. मोठे प्रयत्न करुन त्यांनी लोकवर्गणीच्या माध्यमातून 16 कोटी रुपये जमवले होते. तसेच पुण्याच्या खासगी रुग्णालयात जून महिन्यात वेदिकाल झोलगेन्स्मा (Zolgensma) ही लस देण्यात आली होती. मात्र, एवढे सारे प्रयत्न करुनही वेदिकाचे प्राण वाचू शकले नाहीत.

वेदिकाला मदत करणाऱ्या हातांचे डॉ. कोल्हेंनी मानले होते आभार

वेदिकावर उपचार करण्यासाठी पैशांच्या रुपात मदत करणाऱ्यांचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी आभार मानले होते. त्यांनी 16 जून रोजी “16 कोटींचे इंजेक्शन वेदिका हिला दिल्यानंतर आमच्या आनंदाला पारावर उरला नाही. तिच्या आई वडिलांसह आम्हा सर्वांच्या कष्टाचं आज चीज झालं याचं खरं तर मनाला समाधान वाटलं. वेदिकासाठी श्री. संकेत भोंडवे, माजी आमदार विलास लांडे तसेच ज्या ज्ञात आणि अज्ञात लोकांनी मदतीचा हात दिला, प्रयत्न केले त्या सर्वांचे आभार मानले पाहीजे. जिद्द, चिकाटी आणि प्रामाणिक प्रयत्न केले तर अशक्यप्राय गोष्ट शक्य होऊ शकते याचे हे जिवंत उदाहरण म्हणता येईल”, असं सांगत वेदिकासाठी मदत करणाऱ्या सर्वांचे आभार मानले होते.

SMA हा आजार काय आहे?

जेनेटिक स्पायनल मॅस्कुलर अ‍ॅट्रोफी म्हणजेच SMA हा आजार शरीरात एसएमएन-1 जीनच्या कमतरतेमुळे होतो. यामुळे छातीचे स्नायू कमकुवत होतात आणि श्वास घेण्यात अडथळा येतो. हा आजार जास्तकरुन लहान मुलांना होतो आणि त्रास वाढून रुग्णाचा मृत्यू होतो. ब्रिटनमध्ये हा आजार मोठ्या प्रमाणात आहे आणि तिथे दरवर्षी जवळपास 60 बाळांना जन्मजात हा आजार होतो.

या आजाराचं इंजेक्शन इतकं महाग का असतं?

ब्रिटनमध्ये अनेक बाळांना या आजाराने ग्रासलं आहे. पण, तिथे याचं औषध तयार होत नाही. या इंजेक्शनचं नाव जोलगेनेस्मा आहे. ब्रिटमध्ये हे इंजेक्शन अमेरिका, जर्मनी आणि जापानहून मागवलं जातं. हा आजार असलेल्या रुग्णाला एकदाच हे इंजेक्शन दिलं जातं. हे इंजेक्शन इतकं महाग आहे, कारण जोलगेनेस्मा त्या तीन जीन थेरेपीपैंकी एक आहे ज्या थेरेपीला युरोपात प्रयोग करण्याची परवानगी आहे.

इतर बातम्या :

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उद्या सांगलीच्या दौऱ्यावर, कृष्णा-वारणेच्या पुरामुळं झालेल्या नुकसानाची पाहणी करणार

कुणी मदत देता का मदत ? अंकलीतल्या झोपडपट्टी पूरग्रस्तांची मदतीसाठी ठाकरे सरकारकडे याचना

पोक्सो अंतर्गत गुन्हा, महिन्याभरात कारागृहात आत्महत्या, भल्या पहाटे कैद्याने स्वत:ला का संपवलं?

(Vedika Shinde of Pimpri Chinchwad suffering from Spinal Muscular Atrophy died due to breathing complications)

पाकचा ड्रोन हल्ला उधळला, ड्रोनचे भाग छतावर; घराचं नुकसान...व्हिडीओ बघा
पाकचा ड्रोन हल्ला उधळला, ड्रोनचे भाग छतावर; घराचं नुकसान...व्हिडीओ बघा.
वर्षभराच्या चिमूकल्याला घरी सोडून आई सीमेवर रवाना
वर्षभराच्या चिमूकल्याला घरी सोडून आई सीमेवर रवाना.
CSMTला क्लिनिंग मशीन ट्रॅकवर अन् मोटारमॅनने जागीच थांबवली ट्रेन...
CSMTला क्लिनिंग मशीन ट्रॅकवर अन् मोटारमॅनने जागीच थांबवली ट्रेन....
पंतप्रधान मोदी थेट आदमपूर एअर बेसवर पोहोचले, त्यानंतर..
पंतप्रधान मोदी थेट आदमपूर एअर बेसवर पोहोचले, त्यानंतर...
भारताकडे आता रशियाची S-500 मिसाईल सिस्टीम, S-400 पेक्षा खतरनाक
भारताकडे आता रशियाची S-500 मिसाईल सिस्टीम, S-400 पेक्षा खतरनाक.
...तर ते अ‍ॅक्ट ऑफ वॉर, सिंधू जल करारावरुन पाक मंत्री पुन्हा बरळला
...तर ते अ‍ॅक्ट ऑफ वॉर, सिंधू जल करारावरुन पाक मंत्री पुन्हा बरळला.
अवकाळीचा फटका; भाज्यांच्या दराने गाठली शंभरी, गृहीणींचं बजेट कोलडलं
अवकाळीचा फटका; भाज्यांच्या दराने गाठली शंभरी, गृहीणींचं बजेट कोलडलं.
गैरप्रकार झालेल्या परीक्षा केंद्राची मान्यता रद्द होणार
गैरप्रकार झालेल्या परीक्षा केंद्राची मान्यता रद्द होणार.
तीन दिवस सतर्कतेचे; राज्यात बॉम्बब्लास्टची धमकी
तीन दिवस सतर्कतेचे; राज्यात बॉम्बब्लास्टची धमकी.
प्रलंबित मागण्यांसाठी आशा सेविकांचा 20 मेपासून बेमुदत संप
प्रलंबित मागण्यांसाठी आशा सेविकांचा 20 मेपासून बेमुदत संप.