VIDEO | जप्त केलेल्या गाड्यांना भीषण आग, वाळीव पोलीस ठाण्यासमोर आगीचे तांडव
वसईच्या वालीव पोलीस ठाण्यासमोर विविध गुन्हयात जप्त केलेल्या वाहनांना भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. (vehicles caught fire Valiv police station)
पालघर : वसईच्या वालीव पोलीस ठाण्यासमोर विविध गुन्हयात जप्त केलेल्या वाहनांना भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. आज (14 मार्च) दुपारी 1 च्या सुमारास ही आग लागली होती. या आगीत अंदाजे 50 दुचाकी, दोन कार, एक टेम्पो जळून खाक झाले. आगीचं कारण अजून समजू शकलेलं नाही. (vehicles seized in various cases caught fire in Vasai Valiv police station)
आगीत लाखोंचे नुकसान
मिळालेल्या माहितीनुसार वसई येथील वालीव पोलीस ठाण्यासमोर विविध गुन्ह्यांत मागील कित्येक दिवसांपासून वेगवेगळी वाहनं जप्त करण्यात आली होती. जप्ती आल्यामुळे या वाहनांना वालीव पोलीस ठाण्यासमोरच्या रस्त्याच्या बाजूने उभं करण्यात आलं होतं. यावेळी येथे अचानक भीषण आग लागली. ही आग एवढी भीषण होती की यामध्ये अनेक वाहनं जळून खाक झाली. ताज्या माहितीनुसार 50 दुचाकी, दोन कार, एक टेम्पो एवढ्या वाहनांची आगीमुळे नासधूस झाली.
वाळीव पोलीस ठाण्यासमोरच्या वाहनांना अशा प्रकारे भीषण आग लागली, पाहा व्हिडीओ :
आग लागल्याचे लक्षात आल्यानंतर येथील वालीव पोलिसांनी तत्काळ अग्निशमन दलाशी संपर्क साधाला. वसई विरार अग्निशमन दलाने अवघ्या एका तासात या आगीवर नियंत्रण मिळवले. मात्र, या आगीमध्ये जप्त केलेल्या वाहनांचे मोठे नुकसान झाले असून लाखोंचे नुकसान झाल्याचे म्हटलं जात आहे. ही आग शॉर्टसर्किट अथवा बाजुच्या वाळलेल्या गवतामुळे लागली असावी असा अंदाज व्यक्त केला जातोय. या प्रकरणी वालीव पोलीस तपास करत आहेत.
शताब्दी एक्स्प्रेसच्या डब्याला आग
दिल्लीहून देहरादूनला जाणाऱ्या शताब्दी एक्स्प्रेसच्या डब्याला (बोगी) 13 मार्च रोजी आग लागल्याची घटना समोर आली होती. ही घटना काही काळापूर्वी येथील कांसरो स्थानकाजवळ घडली होती. कांसरो स्टेशन राजाजी व्याघ्र प्रकल्पातील कोर एरियामध्ये आहे. आग लागल्यानंतर हा डबा रेल्वेपासून वेगळा करण्यात आला होता.
PHOTO | जसप्रीत बुमराहची भावी पत्नी संजना गणेशन इतक्या वर्षाने मोठी, ‘या’ अभिनेत्याला केलं होतं डेट https://t.co/pqQ3TzN9Wp @Jaspritbumrah93 | #jaspritbumrahmarriage | #jaspritbumrahwedding | #sanjanaganesan | #Cricket | #Sports |
— TV9 Marathi (@TV9Marathi) March 14, 2021
इतर बातम्या :
PHOTO : वसंत ऋतूची चाहूल, बुलडाण्यात पळस बहरला
मोठी बातमी: ‘एनआयए’कडून 14 दिवसांच्या रिमांडची मागणी; सचिन वाझेंना केवळ एका दिवसाची पोलीस कोठडी
(vehicles seized in various cases caught fire in Vasai Valiv police station)