Video : शिवसैनिकांनी ‘अदानी एअरपोर्ट’चा बोर्ड फोडला, आता अदानी कंपनीकडून स्पष्टीकरण!
विमानतळाचे संचालन अदानी ग्रुपच्या (Adani Group) हाती गेल्यानंतर ‘अदानी एअरपोर्ट’ अशा पाट्या विमानतळ परिसरात लावण्यात आल्या होत्या. त्यामुळे शिवसेना कार्यकर्त्यांनी या बोर्डची तोडफोड केलीय. त्यानंतर आता अदानी कंपनीकडून या बोर्डबाबत स्पष्टीकरण देण्यात आलं आहे.
मुंबई : छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ (Chhatrapati Shivaji Maharaj International Airport) परिसरात असलेल्या अदानी कंपनीचा बोर्ड शिवसैनिकांनी फोडला आहे. पश्चिम द्रुतगती मार्गावर विमानतळ परिसरातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यासमोर हा बोर्ड लावण्यात आला होता. विमानतळाचे संचालन अदानी ग्रुपच्या (Adani Group) हाती गेल्यानंतर ‘अदानी एअरपोर्ट’ अशा पाट्या विमानतळ परिसरात लावण्यात आल्या होत्या. त्यामुळे शिवसेना कार्यकर्त्यांनी या बोर्डची तोडफोड केलीय. त्यानंतर आता अदानी कंपनीकडून या बोर्डबाबत स्पष्टीकरण देण्यात आलं आहे. (Adani Company’s explanation After Shivsena Party Workers smashed board of Adani Company)
अदानी कंपनीचं स्पष्टीकरण
“छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ मुंबई (CSMIA) येथे अदानी विमानतळांच्या ब्रँडिंगच्या संदर्भात घडलेल्या घटनांच्या बाबतीत, आम्ही ठामपणे आश्वासन देतो की अदानी विमानतळ होल्डिंग लिमिटेड (AAHL) ने फक्त पुर्वीच्या कंपनीच्या ब्रांडिंगची जागा अदानी विमानतळ कंपनीच्या ब्रँडिंगने घेतली आहे आणि छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या व टर्मिनलच्या ब्रँडिंगमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही. छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ मुंबई (CSMIA) मधील ब्रँडिंग हे भारतीय विमानतळ प्राधिकरण (AAI) च्या निकष आणि मार्गदर्शक तत्त्वांनुसार करण्यात आले आहे. तसेच अदानी विमानतळ होल्डिंग लिमिटेड (AAHL) मोठ्या प्रमाणावर विमान वाहतूक समुदायाच्या हितासाठी सरकारने दिलेल्या सर्व मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करत राहील”, असे एएएचएलच्या प्रवक्त्याने सांगितलं.
नेमकं काय घडलं?
व्हीआयपी गेट नंबर 8 आणि विलेपार्ले हायवेवरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकासमोरील बोर्ड शिवसैनिकांनी लाठ्यांनी तोडला. मुंबईतील आंतरराष्ट्रीय विमानतळाला छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव देण्यात आले आहे. मात्र तिथे अदानी विमानतळ असे लावलेले बोर्ड अजिबात सहन केले जाणार नाहीत, असं शिवसैनिकांचं म्हणणं आहे. जीवीके प्रमाणे ‘मॅनेज्ड बाय अडानी एयरपोर्ट’ असा बोर्ड ठेवण्याची सूचना शिवसेनेने केली आहे. अन्यथा जिथे फलक दिसेल, तिथे तोडफोड करण्याचा सेना नेत्यांनी इशारा दिला आहे.
अदानी समुहाकडे मुंबई विमानतळाचे संचालन
अदानी समुहाने हवाई प्रवास क्षेत्रात मोठी गुंतवणूक केली आहे. देशातील अनेक मोठमोठ्या विमानतळांचे संचालन अदानी समूहाकडे आहे. जुलै महिन्यातच मुंबईतील आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या संचलनाची संपूर्ण जबाबदारी अदानी समुहाकडे सोपवण्यात आली होती. समुहाचे सर्वेसर्वा गौतम अदानी यांनी ट्वीट करुन याविषयी माहिती दिली होती.
इतर बातम्या :
Video: मुंबईत शिवसैनिकांचा तुफान राडा, ‘अदानी एअरपोर्ट’वर संतप्त, जोरदार तोडफोड
Adani Company’s explanation After Shivsena Party Workers smashed board of Adani Company