Video : तेरणा नदीच्या पुरात अडकलेल्या 6 मजुरांची हेलिकॉप्टरमधून सुटका, सुटकेचा थरार कॅमेरात कैद

अतिवृष्टीमुळे तेरणा धरण पूर्ण भरलं. त्यामुळे धरणाचे सर्व दरवाजे उघडण्यात आले. तेरणा नदीत मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग करण्यात आल्यानं नदीकाठच्या गावात मोठ्या प्रमाणात पाणि शिरलं. त्यामुळे दाऊतपूरमध्ये 6 मजूर गेल्या 36 तासापासून पुराच्या पाण्यात अडकून पडले होते. हेलिकॉप्टरच्या सहाय्यानं या मजुरांना सुखरुपपणे बाहेर काढण्यात यश आलं आहे.

Video : तेरणा नदीच्या पुरात अडकलेल्या 6 मजुरांची हेलिकॉप्टरमधून सुटका, सुटकेचा थरार कॅमेरात कैद
उस्मानाबाद रेस्क्यू ऑपरेशन
Follow us
| Updated on: Sep 28, 2021 | 6:50 PM

उस्मानाबाद : उस्मानाबाद तालुक्यातील दाऊतपूर येथे तेरणा नदीच्या पुरात अडकलेल्या 6 मजुरांना हेलिकॉप्टरच्या सहाय्याने सुखरुप बाहेर काढण्यात अखेर संध्याकाळच्या सुमारास यश आलं आहे. उस्मानाबाद जिल्ह्याला सोमवारी रात्री मुसळधार पावसानं झोडपून काढलं आहे. अतिवृष्टीमुळे तेरणा धरण पूर्ण भरलं. त्यामुळे धरणाचे सर्व दरवाजे उघडण्यात आले. तेरणा नदीत मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग करण्यात आल्यानं नदीकाठच्या गावात मोठ्या प्रमाणात पाणि शिरलं. त्यामुळे दाऊतपूरमध्ये 6 मजूर गेल्या 36 तासापासून पुराच्या पाण्यात अडकून पडले होते. हेलिकॉप्टरच्या सहाय्यानं या मजुरांना सुखरुपपणे बाहेर काढण्यात यश आलं आहे. (Air Force helicopter rescues 6 workers stranded in Terna river floods in Osmanabad)

उस्मानाबाद जिल्ह्यात मुसळधार पाऊस पडल्यानं मांजरा आणि तेरणा नद्यांना मोठा पूर आला होता. जिल्ह्यात एकूण 47 जण पुराच्या पाण्यात अडकून पडले होते. त्यातील अनेकांना स्थानिक नागरिकांनी आणि जिल्हाच्या आपत्ती व्यवस्थापन यंत्रणेनं सुखरुपपणे बाहेर काढलं. मात्र दाऊतपूर गावात 6 मजूर मागील 36 तासापासून अडकून पडले होते. त्यांना पुराच्या पाण्यातून बाहेर काढण्याचे प्रयत्न सकाळपासून सुरु होते. मात्र, पाण्याचा प्रवाह मोठा असल्यानं ते शक्य होत नव्हतं. शेवटी या मजुरांना बाहेर काढण्यासाठी जिल्हा प्रशासनानं हेलिकॉप्टरची मदत घेण्याचा निर्णय घेतला.

36 तासानंतर सुटकेचा निश्वास

त्यानंतर संध्याकाळच्या सुमारास वायू दलाचं हेलिकॉप्टर पोहोचलं. या हेलिकॉप्टरच्या मदतीनं या मजुरांना रेस्क्यू करण्यात आलं. त्यात 2 लहान मुले, दोन महिला आणि दोन पुरुषांचा समावेश आहे. हे मजूर मागील 36 तासापासून पुराच्या पाण्यात अडकून पडले होते. हे मजूर नांदेड जिल्ह्यातून कामासाठी उस्मानाबादेतील दाऊतपूरमध्ये आले होते. जिल्ह्यातील 37 जण पुराच्या पाण्यात अडकले होते. त्यापैकी 23 जणांना बाहेर काढले आहे. NDRF पथक व पुणे येथून आलेले संरक्षण विभागाचे हेलिकॉप्टरच्या मदतीने या मजुरांचा जीव वाचवण्यात यश आलं आहे.

भरीव मदत देण्याचे मुख्यमंत्री यांचे आश्वासन

उस्मानाबाद जिल्ह्यात पावसाने शेती व पिकांचे मोठे नुकसान केले असून याची माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना दिली आहे ते स्तिथीचा दर तासाला आढावा घेत असून पहिल्यांदा लोकांचे जीव वाचवा शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही असे आश्वासन मुख्यमंत्री ठाकरे यांनी दिल्याचे खासदार ओमराजे यांनी सांगितले.शेतकऱ्यांना सरकार भरीव मदत करणार आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी धीर सोडू नये, सरकार पाठीशी खंबीरपणे उभे असल्याची ग्वाही मुख्यमंत्री यांनी दिली असल्याचे ओमराजे यांनी सांगितले

आणखी 10 जणांना हेलिकॉप्टर मधून वाचवले

कळंब तालुक्यातील सौंदना या गावात पुरात अडकलेल्या 10 जणांना हेलिकॉप्टरच्या माध्यमातून बाहेर काढण्यात आलं आहे. मांजरा नदीला पूर आल्याने हे शेतकरी शेतात अडकले होते. उस्मानाबाद जिल्ह्यात आतापर्यंत 16 जणांना हेलिकॉप्टरने काढले सुखरुपपणे बाहेर काढण्यात यश आलं आहे.

यावेळी शिवसेना खासदार ओमराजे निंबाळकर, आमदार राणाजगजितसिंह पाटील, आमदार कैलास पाटील, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष सुरेश बिराजदार, कळंब उपविभागीय अधिकारी अहिल्या गाठाळ, तहसीलदार गणेश माळी, शिंदे यांच्यासह महसुल व पोलीस दलातील अधिकारी कर्मचारी उपस्थित होते. माजी गृहमंत्री डॉ पदमसिंह पाटील, उस्मानाबादचे जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल गुप्ता यांनी पूरस्तिथीची पाहणी करत शेतकऱ्यांना दिलासा दिला.

इतर बातम्या : 

Aurangabad Rain: मध्यरात्रीतून पकडला पावसानं जोर, गुलाब चक्रिवादळामुळे औरंगाबादेत पुन्हा ढगफुटी, सरींचा वेग काय होता?

बीड जिल्हा दौऱ्यात जयंत पाटलांकडून शेतीच्या नुकसानाची पाहणी, मदतीचंही आश्वासन

Air Force helicopter rescues 6 workers stranded in Terna river floods in Osmanabad

ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर
ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर.
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला.
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?.
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?.
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप.
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल.
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट.
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.