AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Video : आसाममध्ये अडकलेल्या महाराष्ट्रातील तरुणांची अजित पवारांना साद, व्हिडिओद्वारे क्वारंटाईन सेंटरमधील असुविधा समोर

महाराष्ट्रातून जवळपास 200 तरुण आसाममध्ये लष्करी भरतीसाठी गेली होती. त्यावेळी तिथे त्यांची रॅपिड अँटिजेन चाचणी करण्यात आली. त्यात हे तरुण निगेटिव्ह आल्याचा त्यांचा दावा आहे. असं असलं तरी त्यांना एका क्वारंटाईन सेंटरमध्ये ठेवण्यात आलं आहे. तिथे त्यांना चांगलं जेवण, पाणी मिळत नाही. तसंच आसाममध्ये प्रचंड थंडी असताना या तरुणांना साधं पांघरायलाही मिळत नसल्याची त्यांची तक्रार आहे.

Video : आसाममध्ये अडकलेल्या महाराष्ट्रातील तरुणांची अजित पवारांना साद, व्हिडिओद्वारे क्वारंटाईन सेंटरमधील असुविधा समोर
आसाममध्ये अडकून पडलेल्या तरुणांची अजित पवारांना साद
Follow us
| Updated on: Jan 14, 2022 | 9:44 PM

मुंबई : लष्करी सेवेसाठी (Military Recruitment) आसाममध्ये (Assam) गेलेले महाराष्ट्रातील तरुण आसाममध्ये अडकून पडले आहेत. या तरुणांना क्वारंटाईन सेंटरमध्ये ठेवण्यात आलं आहे. महत्वाची बाब म्हणजे आम्ही कोरोना पॉझिटिव्ह नसतानाही आम्हाला क्वॉरंटाईन सेंटरमध्ये ठेवण्यात आल्याचा आरोप या मुलांचा आहे. तसंच या ठिकाणी चांगलं जेवण, पाणी उपलब्ध होत नसल्याचं या मुलांचं म्हणणं आहे. अशावेळी या मुलांनी उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांना साद घातली आहे.

महाराष्ट्रातून जवळपास 200 तरुण आसाममध्ये लष्करी भरतीसाठी गेली होती. त्यावेळी तिथे त्यांची रॅपिड अँटिजेन चाचणी करण्यात आली. त्यात हे तरुण निगेटिव्ह आल्याचा त्यांचा दावा आहे. असं असलं तरी त्यांना एका क्वारंटाईन सेंटरमध्ये ठेवण्यात आलं आहे. तिथे त्यांना चांगलं जेवण, पाणी मिळत नाही. तसंच आसाममध्ये प्रचंड थंडी असताना या तरुणांना साधं पांघरायलाही मिळत नसल्याची त्यांची तक्रार आहे. अशावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपली इथून सोडवणूक करावी अशी मागणी या तरुणांनी केली आहे. या तरुणांनी एक व्हिडीओ काढून तिथल्या परिस्थितीची माहिती देण्याचा प्रयत्नही केला आहे.

3 जानेवारीपासून तरुण आसाममध्ये अडकले!

दरम्यान, मिळालेल्या माहितीनुसार आसाममध्ये लष्करी भरती प्रक्रिया 7 आणि 8 जानेवारी दरम्यान होणार होती. त्यासाठी महाराष्ट्रातील दोनशे ते अडीचशे तरुण 3 जानेवारीला आसाम राज्यातील करबी अँगलाँग या जिल्ह्यातील दीपू शहरात दाखल झाले. तिथे त्यांची भरती प्रक्रिया पार पडणार होती. मात्र, भरतीपूर्वी या तरुणांची कोरोना रॅपीड अँटिजेन चाचणी करण्यात आली. त्यात महाराष्ट्रातील 60 ते 70 जण कोरोना बाधित झाल्याचं समोर आलं. कोरोना पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णांसाठी अन्य मुलांनाही कॉरन्टाईन सेंटरमध्ये ठेवण्यात आली.

खाण्याची आबाळ, अन्य आजार जडण्याची भीती

कॉरंटाईन सेंटरमध्ये या मुलांना जेवण, पाण्यासह अन्य सुविधा मिळत नाहीत. दीपू हे थंड हवेचे पर्यटनस्थळ आहे. असं असताना या मुलांना पांघरायला चांगल्या शॉल किंवा अन्य काहीही देण्यात आलेलं नाही. अशावेळी कोरोनाचं संकट असताना आता या मुलांना अन्य आजार जडण्याची शक्यताही निर्माण झाली आहे. त्यामुळे आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी तातडीने याची दखल घेऊन या तरुणांना राज्यात परत आणण्याबाबत उपाययोजना कराव्यात अशी मागणी या तरुणांसह त्यांच्या कुटुंबियांकडून करण्यात येत आहे.

इतर बातम्या : 

Kiran Mane | किरण माने यांना मालिकेतून काढल्यानंतर अखेर निर्मात्यांचं स्पष्टीकरण, राजकीय भूमिका घेतल्यानं हकालपट्टी नाही?

नाशिकमधील रुग्णसंख्येच्या नियंत्रणासाठी लसीकरणावर अधिक भर द्यावा, छगन भुजबळांची सूचना

जिथं कसाबला दिलं होतं प्रशिक्षण, तो ट्रेनिंग कॅम्प भारताकडून उद्ध्वस्त
जिथं कसाबला दिलं होतं प्रशिक्षण, तो ट्रेनिंग कॅम्प भारताकडून उद्ध्वस्त.
बिथरलेलं पाकडे गप्प बसेना, भारतीयांना केलं टार्गेट, कुठं सापडली मिसाईल
बिथरलेलं पाकडे गप्प बसेना, भारतीयांना केलं टार्गेट, कुठं सापडली मिसाईल.
पाकला दणका अन् चीनची तंतरली, आधी पाकला मदत आता म्हणताय, जरा संयमानं...
पाकला दणका अन् चीनची तंतरली, आधी पाकला मदत आता म्हणताय, जरा संयमानं....
हम अल्लाह के, कसम खाते है की... अल कायदाकडून भारताला टोकाची धमकी
हम अल्लाह के, कसम खाते है की... अल कायदाकडून भारताला टोकाची धमकी.
Rain Update आजही मुंबईकरांची तारांबळ उडणार? हवामान खात्याचा अंदाज काय?
Rain Update आजही मुंबईकरांची तारांबळ उडणार? हवामान खात्याचा अंदाज काय?.
ऑपरेशन सिंदूरनंतर पाक पुन्हा हादरला, लाहोरमध्ये स्फोटाचे आवाज; घडल काय
ऑपरेशन सिंदूरनंतर पाक पुन्हा हादरला, लाहोरमध्ये स्फोटाचे आवाज; घडल काय.
अब पाकिस्तान का जवाब... घुसून मारल्यानंतर बिलावल भुट्टोचा तिळपापड
अब पाकिस्तान का जवाब... घुसून मारल्यानंतर बिलावल भुट्टोचा तिळपापड.
हा होता पहलगाम हल्ल्याचा सूत्रधार, नाव-फोटो समोर, बघा कोणाशी कनेक्शन?
हा होता पहलगाम हल्ल्याचा सूत्रधार, नाव-फोटो समोर, बघा कोणाशी कनेक्शन?.
भारताने मोठी चूक केली, प्रत्येक रक्ताच्या थेंबाचा बदला... पाककडून धमकी
भारताने मोठी चूक केली, प्रत्येक रक्ताच्या थेंबाचा बदला... पाककडून धमकी.
सदावर्ते राज ठाकरेंवर भडकले, पाकिस्तानी खाज, मुझे ये नही बोलना की...
सदावर्ते राज ठाकरेंवर भडकले, पाकिस्तानी खाज, मुझे ये नही बोलना की....