झुकायला अन् वाकायला तयार, जेव्हा वडेट्टीवार ओबीसींच्या काळजाला हात घालतात, वाचा 15 मोठे मुद्दे
विजय वडेट्टीवार यांनी एकाच वेळेस पंकजाला गुरुबंधू म्हटलं तर बावनकुळेंच्या तिकिट न मिळण्यावर भावना व्यक्त केल्या. पाहुयात त्यांच्या भाषणातले 15 मोठे मुद्दे
मुंबई : लोणावळ्यात ओबीसी, व्हीजेएनटी चिंतन मंथन शिबीर पार पडलं. ह्या शिबीराला राज्यातल्या बहुतांश मोठ्या ओबीसी नेत्यांनी हजेरी लावली. त्यात मग भाजपकडून पंकजा मुंडे, बावनकुळेही होते आणि काँग्रेसकडून प्रदेशाध्यक्ष पटोले, मंत्री विजय वडेट्टीवारही. ह्या शिबीरात सर्वच नेत्यांची भाषणं झाली पण काळजाला हात घालण्याचा प्रयत्न केला तो वडेट्टीवारांनी. एकाच वेळेस त्यांनी पंकजाला गुरुबंधू म्हटलं तर बावनकुळेंच्या तिकिट न मिळण्यावर भावना व्यक्त केल्या. पाहुयात त्यांच्या भाषणातले 15 मोठे मुद्दे. (Vijay Wadettiwar comment on OBC reservation and 15 important points of his speech in OBC conference)
1. मी गोपीनाथ मुंडे यांचा शिष्य आहे. पंकजा मुंडे आणि मी गुरुबंधू. ओबीसीवर अन्याय झालाय. तुम्ही आम्ही एकत्र आलो तर हा अन्याय दूर होईल.
2. प्रस्थापितांच्या विरोधात लढणे सोपं नाही, बावनकुळे साहेब माझा नेता ओबीसी आहे, त्यामुळे मला तिकीटाची भिती नाही.
3. झुकायला आणि वाकायला तयार आहे समाजासाठी मला रोज धमक्या येतात, त्या टोकाच्या येतात धमक्या देणाऱ्यांनो, आम्ही तुमच्या विरोधात नाही आणि राहणारही नाही.
4. महाराष्ट्रात तीन दिवस फिरलो तरी 25 लाखांची सभा होईल. झुकती है दुनिया झुकाने वाले चाहिये.
5. ओबीसीचं खातं भेटले तेव्हा चपराशीही नव्हता, उधारीवर चालवतो खातं. समाज कल्याणच्या भरवशावर हे खातं चालवतो. ओबीसी खात्यातल्या जागा भरायला पैसे नाही म्हणता, कार्यालयाला जागा नाही. काही दिवस रुसलो होतो, मग वाटलं पण चुकी झाली.
6. विरोधी पक्षनेता होतो, ओबीसीचं नेतृत्व करतो. वाटलं महसूल खातं मिळेल, पण भेटले हे खातं. का भेटते ओबीसी आहे ना मी. पंकजा ताईलाही ग्रामविकास खातं भेटलं होतं.
7. निवडणूका झाल्या, कोरोना वाढला तर निवडणूक आयोगाला जबाबदार धरा, आणि गरज भासल्यास त्यांच्यावर गुन्हे दाखल करा. हे मी मुख्यमंत्र्यांना सांगणार आहे
8. माझं काय होईल ते होईल, पण ओबीसीच्या मुद्यावर मी शांत बसणार नाही आपलं अडले चर सगळेच बाप म्हणावं लागतं. फडणवीस साहेबांना घेऊन जाऊ वेळ पडली तर पंतप्रधानांच्या पाया पडू.
9. या आठवड्यात आयोगाला पत्रव्यवहार करु, त्यांना डाटा गोळा करायला हवं ते देऊ.
10. कोरोना आहे. आम्ही निवडणूक आयोगाला मणुष्यबळ देणार नाही. काय करायचं ते करा. कुठून आणणार मनुष्यबळ? यूपी वरुन का?
11. काय होईल ते होऊ द्या, गेलो तर जमानत घ्यायला या.
12. कोरोना लाट गेली, की ओबीसींचा पहिला विराट मोर्चा औरंगाबाद येथे होणार.
13. जेवढे पैसे सारथी मिळतील, तेवढेच पैसे महाज्योतीला मिळतील. मी बसलोय इथे. एक सारथी मराठा समाजासाठी आणि ओबीसींतल्या 425 जातींसाठी महाज्योती
14. आमच्या खात्यात पैसे आले तर परत जाऊ देणार नाही. मी माझी संघटना काढत नाही. सर्व संघटनांनी मिळून लढाई लढायची आहे
15. वाघ आमच्या इशाऱ्याने चालतो
इतर बातम्या :
मी गोपीनाथ मुंडेंचा शिष्य, पंकजांना वडेट्टीवार म्हणतात, आपण गुरुबंधू, वाचा ओबीसी परिषदेत काय घडतंय?
(Vijay Wadettiwar comment on OBC reservation and 15 important points of his speech in OBC conference)