पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्याचे वादग्रस्त वक्तव्य, ‘दहशतवाद्यांकडे धर्म विचारण्यासाठी…’
नरहरी झिरवळ आता मंत्री झाले. त्यांनी पाहून, वाचून बोलले पाहिजे. १५०० मध्ये महिला खुश असतील तर आता जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुकीत दिसेल. एकीकडे महागाई वाढवली. २१०० रुपये देऊ असा उल्लेख महायुतीच्या जाहीरनाम्यात आहे. परंतु सरकारच्या नियतीत खोट आहे, अशी टीका झिरवळ यांच्यावर विजय वडेट्टीवार यांनी केली.

पहलगाम हल्ल्याबाबत महाराष्ट्रातील काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी वाद निर्माण करणारे वक्तव्य केले आहे. दशतवाद्यांनी धर्म विचारुन पर्यटकांची हत्या केल्याचा दावा चुकीचा असल्याचे वडेट्टीवार यांनी म्हटले आहे. दहशतवाद्यांकडे इतका वेळ कुठे आहे की, कोणाच्या कानात जाऊन तुमचा धर्म कोणता आहे? असे विचारतील. काही जण दहशतवाद्यांनी धर्म विचारुन गोळीबार केल्याचा दावा नाकारत आहे. दहशतवाद्यांना कोणताही जात-धर्म नसतो. या प्रकरणात दोषी असणाऱ्या व्यक्तींवर त्वरीत कारवाई करावी. या प्रकारास इतर कोणताही रंग देऊ नये, असे विजय वडेट्टीवार यांनी म्हटले आहे.
विजय वडेट्टीवार यांनी केंद्र सरकारवर टीका केली. ते म्हणाले, पहलगाम हल्लाची जबाबदारी सरकारने घेतली पाहिजे. त्या ठिकाणी सुरक्षा का नव्हती? 200 किलोमीटरपर्यंत दहशतवादी कसे आले? तुमच्या गुप्तचर यंत्रणा काय करत होत्या? सुरक्षेत चूक कशी झाली? यावर विचार केला पाहिजे. या प्रकरणात दुसरीकडे लक्ष घेऊन जाणे चुकीचे आहे, असे वडेट्टीवार यांनी म्हटले.
राज्य सरकार गोंधळात
विजय वडेट्टीवार यांनी राज्य सरकारमधील मंत्र्यांच्या वादावर बोट ठेवत सांगितले की, अलीकडे गोंधळी सरकार आहे. एक मंत्री दुसऱ्या मंत्र्यांच्या मतदारसंघात जातो आणि हिंदूत्त्व सांगतो. त्याला स्थानिक मंत्री योगेश कदम म्हणतात, की कायदा आणि सुव्यवस्था आम्हाला शिकवू नये. दोघेही मंत्री आहेत. दोघेही जबाबदार आहेत. एकीकडे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणतात, पाकिस्तानचा एकही नागरीक महाराष्ट्रात नाही. दुसरीकडे नगरविकास खात्याचे मंत्री म्हणतात, १०७ पाकिस्तानी सापडत नाही. इतका समन्वयाचा अभाव दिसत आहे. यावरुन हे सरकार किती गोंधळलेले हे दिसत आहे, अशी टीका काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी केली.
एनसीईआरटीच्या पुस्तकातून मुघलांचा इतिहास काढला. त्याबद्दल बोलताना विजय वडेट्टीवार म्हणाले, जुना इतिहास पुसून नवीन इतिहास तयार करण्याची ताकद दाखवा. इतिहासांत जे काही घडले. ते आपण जपतो. पुढच्या पिढीला काही शिकवता येईल. इतिहास संपवणे घर्मांधतेला खतपाणी घालण्यासारखे आहे. भेदभाव निर्माण करण्याची भुमिका आहे.
#WATCH | Nagpur, Maharashtra | Congress MLA Vijay Wadettiwar says, "The government should take responsibility for the #PahalgamTerroristAttack. They (the government) are saying that terrorists killed people after asking them (about their religion). Do terrorists have time for all… pic.twitter.com/88ic7AM5gf
— ANI (@ANI) April 28, 2025
मंत्री नरहरी झिरवळ यांनी लाडक्या बहिणींना २१०० रुपये मिळणार नाही, १५०० रुपयांमध्ये त्या समाधानी आहे, असे म्हटले होते. त्यावर बोलताना विजय वडेट्टीवार म्हणाले, नरहरी झिरवळ आता मंत्री झाले. त्यांनी पाहून, वाचून बोलले पाहिजे. १५०० मध्ये महिला खुश असतील तर आता जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुकीत दिसेल. एकीकडे महागाई वाढवली. २१०० रुपये देऊ असा उल्लेख महायुतीच्या जाहीरनाम्यात आहे. परंतु सरकारच्या नियतीत खोट आहे, असा झणझणीत टीका वडेट्टीवार यांनी झिरवळ यांच्या वक्तव्यावर केली.
शिक्षण विभागातील शालार्थ आयडी घोटाळ्याबाबत बोलताना विजय वडेट्टीवार यांनी सांगितले की, शिक्षक घोटाळा मोठा आहे. ईडीने, एसआयटी किंवा निवृत्त न्यायाधीश यांनी चौकशी करावी. जे संस्थाचालक दोषी आहे त्यांना सोडू नका. घोटाळा केला त्याला शिक्षा झाली पाहिजे. पण निरपराध माणसाला यात शिक्षा देऊ नका, असे