केसगळतीच्या भीतीने आंघोळच सोडली, बुलढाण्यातील टक्कल व्हायरसची दहशत अजूनही कायम

केस गळण्याच्या भीतीने गावकऱ्यांपैकी काहींनी चार-पाच दिवसांपासून तर काहींनी 8 दिवस झाले तरी अंघोळच केलेली नाही. पाण्याची एवढी दहशत या गावातील लोकांमध्ये पसरली आहे की त्या पाण्याला हात लावायला देखील लोक घाबरत आहेत, त्या पाण्याने अंघोळ करणं तर दूरच राहिलं.

केसगळतीच्या भीतीने आंघोळच सोडली, बुलढाण्यातील टक्कल व्हायरसची दहशत अजूनही कायम
Follow us
| Updated on: Jan 11, 2025 | 10:16 AM

बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव तालुक्यातील काही गावांमध्ये अचानक केसगळतीचे प्रमाण वाढले आहे. ग्रामस्थांच्या केस आणि दाढीचे केस वेगाने गळत आहेत, त्यामुळे भीतीचे वातावरण आहे. अनेक दिवस उलटूनही या व्हायरसचा धूमाकूळ थांबलेला नसून त्यामुळे गावकऱ्यांवर मात्र बिकट परिस्थिती आली आहे. केस गळण्याच्या भीतीने गावकऱ्यांपैकी काहींनी चार-पाच दिवसांपासून तर काहींनी 8 दिवस झाले तरी अंघोळच केलेली नाही. पाण्याची एवढी दहशत या गावातील लोकांमध्ये पसरली आहे की त्या पाण्याला हात लावायला देखील लोक घाबरत आहेत, त्याने अंघोळ करणं तर दूरच राहिलं. पर्यायी आठवडाभरापासून अनेकांनी शरीराला पाण्याचा स्पर्शही होऊ दिलेला नसल्याने अंघोळीला रामराम ठोकला आहे. प्रशासनाने शुद्ध पाण्याची व्यवस्था करावी अशी मागणीही नागरिकांकडून करण्यात आली आहे.

व्हायरसच्या भीतीने अंघोळीला सुट्टी

टक्कल वायरस च्या भीतीने बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव तालुक्यात बोंडगाव सह अनेक गावातील लोकांनी गेल्या चार ते पाच दिवसांपासून अंघोळच केली नाहीये. बोंडगाव, कठोरा, हिंगणा, भोनगाव सह 11 गावात गावात अचानक लोकांना केस गळती सुरू झाल्याने टक्कल पडू लागले. गावातील लोक वापरत असलेल्या पाण्यात नायट्रेट सारखा विषारी घटक मोठ्या प्रमाणात आढळल्याने हे पाणी वापरण्या योग्य नसल्याचं प्रशासन सांगून मोकळ झालं. पण वापरण्यासाठी पर्यायी पाण्याची गावातव्यवस्था नसल्याने गावकरी आता अंघोळीपासून वंचित आहेत. प्रशासनाने एकीकडे गावातील पाणी वापरण्यायोग्य नसल्याचं गावकऱ्यांना सांगितलं खरं, मात्र पर्यायी पाण्याची व्यवस्था करून न दिल्याने गावकऱ्यांमध्ये संताप पाहायला मिळतोय. अंघोळ न केल्याने अंगाची दुर्गंधी येत असल्याचे अनेकांचे म्हणणे आहे.

हे सुद्धा वाचा

काय आहे प्रकरण ?

बुलढाणा, शेगांव येथे मात्र एका अज्ञात व्हायरसने धूमाकूळ घातला असून अवघ्या तीन दिवसांत चक्क टक्कल पडत असल्याने नागरिक भयभीत झाले आहेत. शेगांव तालुक्यातील बोंडगाव, कालवड, हिंगणा या गावात अज्ञात व्हायरसने थैमान घातले आहे. शेगावच्या अनेक गावांत सध्या टक्कल व्हायरसचा धुमाकूळ सुरू आहे. येथे या अज्ञात व्हायरसमुळे अनेक लोकांना केस गमवावे लागत आहेत. आधी डोक्याला खाज सुटते, नंतर केस गळून सरळ हातात येतात आणि त्यानंतर तिसऱ्या दिवशी चक्क टक्कल पडते, यामुळेच नागिरक घाबरले . शेगावजवळील अनेक गावांत हा व्हायरस पसला असून त्यामध्ये अनेक नागरिकांचे केस गेले आहेत, त्यात महिलांची संख्याही लक्षणीय होती.

मोठी अपडेट समोर

या केस गळती प्रकरणात आता मोठी अपडेट समोर आली होती. शेगाव तालुक्यातील बोंडगावातील आणि खातखेड येथील पाण्यात नायट्रेट सारखा अत्यंत विषारी घटक मोठ्या प्रमाणात आढळून आला. तर पाण्याची टीडीएस लेव्हलही भयंकर वाढली असल्याचं या पाण्याच्या तपासणीत उघड झालं. त्यामुळेच गावकऱ्यांसाठी हे पाणी वापरणं विष ठरलं. परिणामी गावातील लोकांच्या केस गळतीचं प्रमाण वाढलं असल्याचं समोर आलं. खारपाणपट्ट्यातील या गावात पिण्याची पाण्याची वेगळी सोय करण्यात आली आहे. मात्र वापरण्याच्या पाण्यात नाइट्रेट सारखा विषारी घटक मोठ्या प्रमाणात आढळल्याने हे पाणी वापरण्यायोग्य देखील नसल्याचं धक्कादायक वास्तव समोर आलं.

तीनच दिवसात टक्कल पडत असल्याच्या प्रचंड तक्रारी आल्याने आरोग्य विभागाकडून शेगाव तालुक्यातील घरोघरी सर्वेक्षण सुरू केलं. चर्मरोग तज्ज्ञांचे पथकही गावात दाखल झाले आणि त्यांनी प्रथम कठोरा, बोंडगाव, हिंगणा या गावांत तपासणी सुरू केली. फंगल इन्फेक्शनचा हा प्रकार असल्याचे मत तज्ज्ञांनी प्रथमदर्शनी व्यक्त केलं असून हा आजार पाण्यामुळे होत असल्याचे प्रथमदर्शनी दिसून आलं . गावातील पाणी, स्कीनचे नमुने घेण्यात आले असून ते नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आल्याची माहिती आरोग्य विभागाला दिली होती. मात्र अद्यापही हा प्रश्न सुटला नसून पर्यायी पाण्याची व्यवस्था करून न दिल्याने गावकऱ्यांमध्ये संतापाचे वातावरण आहे.

'बूंद से गयी वो हौद से नही आतीं' गुलाबराव पाटलांचा ठाकरेंवर घणाघात
'बूंद से गयी वो हौद से नही आतीं' गुलाबराव पाटलांचा ठाकरेंवर घणाघात.
मुंबईत हवेची गुणवत्ता ढासळली, श्वसनाच्या आजारांनी त्रासले मुंबईकर
मुंबईत हवेची गुणवत्ता ढासळली, श्वसनाच्या आजारांनी त्रासले मुंबईकर.
मुंबई ते नागपूरपर्यंत सर्व महापालिका निवडणुका ठाकरे गट स्वबळावर लढणार
मुंबई ते नागपूरपर्यंत सर्व महापालिका निवडणुका ठाकरे गट स्वबळावर लढणार.
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी भाजप फुंकणार रणशिंग
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी भाजप फुंकणार रणशिंग.
Shegaon Hair Loss | केसगळतीच्या भीतीपोटी नागरिकांची 8 दिवस अंघोळच नाही
Shegaon Hair Loss | केसगळतीच्या भीतीपोटी नागरिकांची 8 दिवस अंघोळच नाही.
'एक खून करून पोट भरलं नाही?', जरांगे पाटलांचा थेट मुंडेंवर आरोप
'एक खून करून पोट भरलं नाही?', जरांगे पाटलांचा थेट मुंडेंवर आरोप.
'कोल्हेंच्या वक्तव्याची कीव, त्यांनीही...'; मित्रपक्षांकडून टीकास्त्र
'कोल्हेंच्या वक्तव्याची कीव, त्यांनीही...'; मित्रपक्षांकडून टीकास्त्र.
शरद पवार गटात अलबेल नाही? सत्तेत सहभागी होण्यासाठी 2 मतप्रवाह?
शरद पवार गटात अलबेल नाही? सत्तेत सहभागी होण्यासाठी 2 मतप्रवाह?.
वाल्मिक कराड लाडकी बहीण योजनेचा अध्यक्ष, बावनकुळेंचं समर्थन? म्हणाले..
वाल्मिक कराड लाडकी बहीण योजनेचा अध्यक्ष, बावनकुळेंचं समर्थन? म्हणाले...
'मुन्नीचं लय प्रेम पण ती बोलना, बोलली तर मुन्नीचे कपडे टराटरा...'
'मुन्नीचं लय प्रेम पण ती बोलना, बोलली तर मुन्नीचे कपडे टराटरा...'.