सरकारविरोधात मराठा समाज आक्रमक, 7 फेब्रुवारी रोजी राज्यभर एल्गार; चव्हाणांच्या घरासमोरही आंदोलन
सरकारच्या या नाकर्तेपणाविरोधात येत्या 7 फेब्रुवारीपासून राज्यभरात तीव्र आंदोलन करण्यात येईल. तसेच 13 फेब्रुवारी रोजी मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांच्या घरासमोर आंदोलन करण्यात येणार असल्याची घोषणा शिवसंग्रमाचे अध्यक्ष विनायक मेटे यांनी केली आहे. (vinayak mete slams maha vikas aghadi over maratha reservation issue)
मुंबई: मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून मराठा समाज पुन्हा एकदा आक्रमक झाला आहे. मराठा आरक्षणप्रश्नी राज्य सरकारचे काम ढिसाळ असून बैल गेला आणि झोपा केला अशी परिस्थिती सध्या राज्याची आहे, असं सांगत सरकारच्या या नाकर्तेपणाविरोधात येत्या 7 फेब्रुवारीपासून राज्यभरात तीव्र आंदोलन करण्यात येईल. तसेच 13 फेब्रुवारी रोजी मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांच्या घरासमोर आंदोलन करण्यात येणार असल्याची घोषणा शिवसंग्रमाचे अध्यक्ष विनायक मेटे यांनी केली आहे. त्यामुळे आगामी काळात मराठा आरक्षण प्रश्न पुन्हा पेटण्याची शक्यता वर्तवली जात आहे. (vinayak mete slams maha vikas aghadi over maratha reservation issue)
विनायक मेटे यांनी आज ‘टीव्ही 9 मराठी’शी वन टू वन संवाद साधला. यावेळी त्यांनी ही मोठी घोषणा केली. ही घोषणा करतानाच मराठा आरक्षणावरून राज्य सरकारच्या भूमिकेवर बोट ठेवले. तसेच आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांच्यावर पुन्हा एकदा टीकास्त्र सोडलं. मराठा आरक्षणासाठी व्हर्च्युअल सुनावणी घेण्याची गरज नाही. ही सुनावणी फिजिकल झाली पाहिजे. तसेच हे प्रकरणा पाच न्यायामूर्तींच्या घटनापीठाकडे न देता 11 ते 13 न्यायामूर्तींच्या घटनापीठाकडे देण्यात यावेत, अशी मागणी मेटे यांनी केली. मराठा आरक्षणावर पुढची तारीख मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे शासनाने आरक्षणावरील अंतरिम स्थगिती उठवण्याचा आग्रह धरला पाहिजे, असंही ते म्हणाले.
सरकारची भूमिका मराठा विरोधी
ज्या मराठा तरुणांच्या 2018 आणि 2019च्या नियुक्त्या रखडल्या आहेत. त्यांना तातडीने नियुक्त्या द्याव्यात. तरच समाजाला दिलासा मिळेल. सरकारची भूमिका ही मराठा समाजाच्या विरोधात आहे. मराठा आरक्षणावर बाजू कोण मांडणार? कशी मांडणार? हे सरकार सांगत नाही. त्यावर बोलायला तयार नाही. त्यामुळेच आम्ही आंदोलनाच्या मार्गाने जायचं ठरवलं असल्याचंही त्यांननी सांगितलं.
चव्हाण नाकर्ता माणूस
यावेळी मेटे यांनी चव्हाणांवरही टीका केली. अशोक चव्हाणांसारखा निष्क्रिय आणि नाकर्ता माणूस पाहिला नाही. ते काय प्रयत्न करतात ते सांगा. तोंडावर बोट ठेवून बैठकीत बसलेला असतात, अशी टीका त्यांनी केली. कॅबिनेट सगळ्यात जास्त मराठा नेते आहेत. पण तरीही आरक्षणासाठी प्रतिसाद कमी मिळतोय. मराठा नेत्यांमध्ये एकवाक्यता नाही. यात दुमत नाही. पण पायलीचे पन्नास मराठा नेते सरकारमध्ये आहेत. ते काय करतात? असा सवालही त्यांनी केला. (vinayak mete slams maha vikas aghadi over maratha reservation issue)
अनागोंदी कारभार सुरू
आम्ही साष्टपिंपळगाव येथे राजेश टोपे यांच्या विरोधात आंदोलन केलं. चव्हाणांच्या जिल्ह्यात आंदोलन केलं. पण दोघांनाही भेटायला वेळ नाही. आझाद मैदानात तरुणांनी उपोषण केलं. पण त्यांना न्याय मिळाला नाही. सरकारमधील मंत्री घटनेची शपथ घेऊन बेकायदेशीर कामे करतात, मुख्यमंत्री उघड्या डोळ्याने पाहात आहेत. सर्व अनागोंदी कारभार सुरू आहे, अशी टीकाही त्यांनी केली. (vinayak mete slams maha vikas aghadi over maratha reservation issue)
LIVE : महत्वाच्या घडामोडी https://t.co/1kNPE4Ebpc
— TV9 Marathi (@TV9Marathi) February 4, 2021
संबंधित बातम्या:
उद्धव ठाकरेंचा शब्द आमच्यासाठी अंतिम, विधानसभा अध्यक्षपदाबद्दल तेच ठरवतील : उदय सामंत
LIVE | अर्णब गोस्वामी, कंगना रनौत देशप्रेमी आहेत, संजय राऊतांचं टीकास्त्र
ज्या एका निर्णयानं इंदिरा देशप्रिय झाल्या, तोच निर्णय मोदींनी हळूहळू कसा फिरवला?
(vinayak mete slams maha vikas aghadi over maratha reservation issue)