लाव रे तो व्हिडिओः फडणवीस-सोमय्यांचा व्हिडिओ लावून विनायक राऊतांकडून राणेंच्या भ्रष्टाचाराची पोलखोल
पत्रकार परिषदेत विनायक राऊत म्हणाले की, भाजप गुंडांचा पक्ष आहे. अंकुश राणेंचं काय झालं. सिंधुदुर्गात कुणाचं काय काय सुरू आहे, हे जर मी सांगितलं तर तुमच्या लक्षात येईल, पण मी त्या खोलात जाणार नाही. जे काचेच्या घरात राहतात त्यांनी दुसऱ्यांवर दगडफेक करू नये, अशा इशारही त्यांनी यावेळी दिला.
मुंबईः साऱ्या महाराष्ट्राला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे ( Raj Thackeray) यांचा ‘लाव रे तो व्हिडीओ’ हा राजकीय प्रचार सभातला डॉयलॉग आठवत असेल. आज केंद्रीय मंत्री नारायण राणे विरुद्ध शिवसेना या रंगलेल्या महानाट्यात त्याच्या पुढचा अंक पाहायला मिळाला. नारायण राणे (Narayan Rane) यांनी काल ट्वीट करून मातोश्रीवर ईडी धडकणार असल्याचा दिलेला इशारा आणि आज सकाळी दिशा सलीयन आणि सुशांतसिंग राजपूत या दोघांचे खून झाल्याचा आरोप केला. त्याची सव्याज परतफेड दुपारी शिवसेना नेते विनायक राऊत (Vinayak Raut) यांनी राणेंविरोधातले व्हिडिओ पत्रकार परिषदेत लावून केली. यातला एक व्हिडिओ तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा आहे. त्यांनी त्यात राणेंची कुंडली माडल्याचा दावा राऊतांनी केला. तर दुसऱ्या व्हिडिओमध्ये सध्या महाविकास आघाडीच्या भ्रष्टाचाराची पोलखोल करणारे भाजपनेते किरीट सोमय्या यांनी यापूर्वी राणेंवर भ्रष्टाचाराचे आरोप केले आहेत.
काय दिला इशारा?
पत्रकार परिषदेत विनायक राऊत म्हणाले की, भाजप गुंडांचा पक्ष आहे. अंकुश राणेंचं काय झालं आणि तुम्ही सांगता भाजप गुंडांचा पक्ष? सिंधुदुर्गात कुणाचं काय काय सुरू आहे, हे जर मी सांगितलं तर तुमच्या लक्षात येईल, पण मी त्या खोलात जाणार नाही. जे काचेच्या घरात राहतात त्यांनी दुसऱ्यांवर दगडफेक करू नये, अशा इशारही त्यांनी यावेळी दिला.
पहिल्यात व्हिडिओमध्ये काय?
राऊत यांनी या पत्रकार परिषदेत दोन व्हिडिओ लावले. पहिल्या व्हिडिओमध्ये तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नारायण राणे यांची कुंडली मांडली आहे, असा दावा राऊत यांनी केला. राणेंच्या नेतृत्वात नऊ वर्ष सिंधुदुर्गात खंडणी, मारामारी होत होती. त्यात मंचेकर गोवेकर, सत्यविजय भिसे यांचे निर्घृणपणे खून कोणी केला. ते कोणी पचवले. श्रीधर नाईकांच्या खुनात आरोपी कोण होतं, हे सर्वांना माहीत आहे. आम्हाला उघड करायला लावू नका. राणेंच्या कुंडलीचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधान परिषदेत वाचन केलं होतं. हे व्हिडिओ लावून सांगत राऊत यांनी राणे यांच्यावर कोणकोणते गुन्हे आहेत, या आरोपांचा पाढा वाचला. आता ज्या – ज्या गुन्ह्यांचा अंतर्भाव केला होता काही करायचा राहिला आहे. याप्रकरणाची उद्या गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांची भेट घेत चौकशी करण्याची मागणी करू. शिवाय सिंधुदुर्गातील आजवरच्या राजकीय हत्यांची चौकशी करा. खरे गुन्हेगार आणि प्लॅनर कोण होते, याची चौकशी करा अशी मागणी करणार असल्याचे ते म्हणाले.
दुसऱ्या व्हिडिओमध्ये काय?
विनायक राऊत यांनी यावेळी दुसरा व्हिडिओही पत्रकार परिषदेत लावला. तत्पूर्वी नारायण राणे यांनी भ्रष्टाचारावर बोलणं यासारखा विनोद असू शकत नाही, असा टोलाही हाणला. भाजप नेते किरीट सोमय्यांनीच नारायण राणेंचा कोणकोणत्या रिअल इस्टेटमध्ये कसा संबंध आहे, मनी लॉन्ड्रिंगमध्ये कसा संबंध आहे ते दाखवून दिलं आहे, असा दावा त्यांनी केला. त्या व्हिडिओमध्ये एका इंग्रजी वृत्तवाहिनीवरील बातमी दाखवली गेली. त्यात राणे आणि त्यांच्या मुलांनी मुंबईतील अविघ्न सोसायटीमध्ये 300 रुपयांचा घोटाळा केल्याचा आरोप किरीट सोमय्यांनी केला होता. याता यावर राणे काय म्हणणार, असा सवालही विनायक राऊत यांनी केला. इतर बातम्याः
Mirza Ghalib | जगण्याचं तत्वज्ञान मलमली भाषेत सांगणाऱ्या असदुल्लाह-ख़ाँ-‘ग़ालिब’ का पता…!