पावसाळ्यात हे धबधबे पाहायला जा, MTDC ने सुचविली ही 12 पावसाळी सहलींची ठिकाणे

मान्सून सुरु झाला की अबाल वृद्धांना पावसाळी पिकनिकचे वेध लागतात. यंदा सरासरी पेक्षा जादा पाऊस पडणार असल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे. तर आता महिनाभर पाऊस चांगला पडला की तयारी लागाच...एटीडीसीने देखील पावसाळी पर्यटनाची डझनभर ठिकाणे सुचविली आहेत.

पावसाळ्यात हे धबधबे पाहायला जा, MTDC ने सुचविली ही 12 पावसाळी सहलींची ठिकाणे
Randha Water fallsImage Credit source: TV9MARATHI
Follow us
| Updated on: Jun 10, 2024 | 5:43 PM

पावसाळ्यात धबधबे पाहायला जाण्याचा अनेक जण प्लान करीत असतील तर एमटीडीसी ( MTDC ) ने भटकंती करणाऱ्यांसाठी काही ठिकाणे सुचविली आहेत. या ठिकाणांवर जायचे असेल तर आपल्याला फारसा खर्च करण्याची देखील गरज नाही. परंतू पाऊस पडून साधारण महिना झाल्यानंतर अशा ठिकाणांवर जाण्यात खरी मजा असते. कारण यावेळी डोंगरातून अनेक धबधबे फेसाळत आपले तुषारांचे वैभव दाखवित असतात. मुंबई आणि पुण्याच्या आसपास असलेल्या या धबधब्यांचा आनंद घेण्यासाठी तुम्ही आतापासूनच तयार राहा..हे सर्व धबधबे आणि पाण्याची धरणं मुंबई आणि पुण्याच्या आजूबाजूलाच वसलेली आहेत. चला तर पाहूयात एमटीडीसीने कोणती स्थळे सुचविली आहेत ते…

1 ) कोंडाणा लेणी ( Kondana Caves )

कोंडाणा बौद्ध लेणी लोणावळ्यापासून सुमारे 33 किमी उत्तरेस आणि कार्ला लेण्यांच्या वायव्येस 16 किमी अंतरावर आहेत. हा 16 प्राचीन बौद्ध लेण्यांचा एक समूह आहे. या लेण्या इ.स.पूर्व पहिल्या शतकात खोदण्यात आल्या होत्या आणि प्राचीन बौद्ध स्थापत्यकला येथे पाहाता येते. पावसाळ्यात या लेणी हिरवीगार जंगलांनी आणि धबधब्यांनी वेढलेली असतात. निसर्ग प्रेमी आणि इतिहासप्रेमी यांच्यासाठी हे एक उत्तम पावसाळी भटंकती करण्याचे ठिकाण आहे. कोंडाणा लेणी राजमाची किल्ल्याच्या पायथ्याशी वसलेली आहेत, हा एक लोकप्रिय ट्रेकिंग स्पॉट आहे. मध्य रेल्वे मार्गावरील कर्जत रेल्वे स्थानकापासून सुमारे 14 किमी अंतरावर असलेल्या कोंढाणे गावातून 4 किमीच्या ट्रेकद्वारे लेण्यापर्यंत आपण पोहोचू शकता. भाताची हिरवीगार शेतं, ओढे आणि खडकाळ भागातून जाणारा हा ट्रेक सोपा आणि निसर्गरम्य आहे. लोणावळा किंवा कर्जत येथून रस्त्यानेही लेण्यापर्यंत पोहचता येथे पण येथील रस्ता अरुंद आहे

2 ) भाजा लेणी

भाजा लेणी पाहण्यासाठी तुम्हाला लोणावळ्याला यावे लागेल. तुम्ही मुंबई किंवा पुण्याहून ट्रेन पकडू शकता. लोणावळा ते माळवली लोकल ट्रेनमधून पण येता येते. भाजा लेण्या मालवली स्थानकापासून सुमारे तीन किमी अंतरावर आहेत. रस्त्याने: लोणावळा ते कार्ला लेण्यापर्यंत स्थानिक बसने देखील भाजा लेण्यापर्यंत सहज पोहचता येते.

3 ) मढे घाट ( Madheghat)

मढे घाट हा धबधबा पुण्याच्या दक्षिण-पश्चिमेस रायगड जिल्ह्याच्या सीमेला सुमारे 62 किमी अंतरावर आहे. तोरणा किल्ला, राजगड, रायगड किल्ला आणि भाटघर धरणाच्या मागील परिसरात हा मढे घाट धबधबा आहे. या धबधब्याला लक्ष्मी धबधबा देखील म्हटले जाते.

4 ) आदराई ट्रेक ( The Aadrai )

शिवरायांचा जन्म झालेल्या जुन्नर ( पुणे ) येथून जवळ असलेला आधाराई जंगल ट्रेक तुम्हाला तुमच्या सर्व चिंता विसरण्यास भाग पाडतो. आदराई ही पायवाट विविध खळाळत्या प्रवाहांमधून आणि डोंगरावरून वाहणाऱ्या धबधब्यांमधून जाते, ज्यात एक मोठा 1,200 फूटाच्या धबधब्याचा समावेश आहे. सर्वत्र बहरलेल्या फुलांनी आणि जैवविविधतेने नटलेले आडराई जंगल पाहाण्यासारखे आहे. सर्वसामान्यांना माहीत नसलेली, ही आडराई पाऊल वाट शिकार करताना जंगलात हरविलेल्या एका स्थानिक गावकऱ्याला सापडली होती असे म्हटले जाते..तुम्ही महाराष्ट्रात पावसाळी ट्रेक शोधत असाल, तर तुम्ही आवर्जून जावे असा आधाराई ट्रेक आहे. माळशेज घाटाच्या दाट जंगलातून धबधब्यातून मंत्रमुग्ध करणारा असा हा आदराई ट्रेक असून येथे कालू धबधबा, नागेश्वर मंदिर आणि अनेक प्राचीन गुहा आहेत.

5 ) रंधा धबधबा

महाराष्ट्रातील अहमदनगर जिल्ह्यातील राजूर – भंडारदरा रस्त्यावर स्थित एक सुंदर असा रंधा धबधबा आहे. भंडारदरा बस स्टॉपपासून 10 किमी अंतरावर, पुण्यापासून 156 किमी आणि मुंबईपासून 177 किमी अंतरावर हा प्रसिद्ध रंधा धबधबा हा . हा धबधबा प्रवरा नदीवर तयार झाला आहे आणि 170 फूट उंचीवरून या धबधब्याचा जलप्रपात खाली खोल एका सुंदर घाटात जातो.

6 ) लोणावळा ते कर्जत ( Lonavala – Karjat Train Ride)

लोणावळा ते कर्जतपर्यंत 28 किलोमीटरचे अंतर आहे. तसेच मुंबईतून मध्ये रेल्वेने देखील कर्जतला जाता येते. मोठ्या संख्येने प्रवासी लोणावळ्याहून कर्जतला रेल्वेने जाण्याचा पर्याय निवडतात. लोणावळा ते कर्जत ही पहिली ट्रेन MAHALAXMI EXP (17412) आहे, जी लोणावळा येथून 04:39 वाजता सुटते. महालक्ष्मी EXP (17412) ही लोणावळा ते कर्जत दरम्यान सर्वात वेगवान आहे. ते लोणावळा येथून 04:39 वाजता निघते आणि 05:20 वाजता कर्जत जंक्शन येथे पोहोचते, हे अंतर केवळ 39 मिनिटांत कापते. लोणावळ्याहून कर्जतला जाणारी शेवटची ट्रेन PUNE ADI SF EXP (22186) आहे, जी लोणावळ्याहून रात्री 9 :00 वाजता सुटते. कर्जतपासून अनेक ठिकाणी धबधबे आहे.

7 ) बेंदेवाडी धबधबा ( Bendewadi Waterfall )

पुण्याजवळील लालवाडी किंवा बेंदेवाडी धबधबा हे एक अतिशय सुंदर ठिकाण आहे. हे पुण्यापासून जवळपास 60 कि.मी. अंतरावर आहे आणि पावसाळ्यात एका दिवसाच्या सहलीसाठी खूप छान ठिकाण आहे.

8 ) सिंहगड ( Sinhagad Fort)

पुणे जिल्ह्यातील सिंहगड हा पुणे शहराच्या नैऋत्येस सुमारे 49 किमी अंतरावर असलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा एक प्राचीन किल्ला आहे. पूर्वी कोंढाणा म्हणून ओळखला जाणारा, हा किल्ला अनेक लढायांच्या केंद्र स्थानी होता, विशेष म्हणजे 1670 मधील सिंहगडाची लढाई कोणी विसरु शकत नाही. ‘गड आला पण सिंह गेला’ ही म्हण या लढाईमुळेच मराठीत आली आहे.

9 ) पानशेत ( Panshet )

पानशेतचे धरण फुटल्याचा इतिहास जुन्या पिढीला माहीती असेल. येथून सर्वात जवळचे स्टेशन पुणे आहे, जे अंदाजे 40 किलोमीटर अंतरावर आहे. तुम्ही रेल्वे स्टेशनवरून पानशेतला टॅक्सीने किंवा बसने जाऊ शकता. तुम्ही जर तुम्ही बसने जात असाल तर तुम्हाला पानशेत धरणापर्यंत जाण्यासाठी थोडेसे चालावे लागेल.

10 ) कुंडमळा ( Kundmala )

पुण्यातील (Pune) मावळ तालुक्यातील कुंडमळा धबधब्यावर (Kundmala Waterfall) घडली. पुण्यापासून 30 किमी अंतरावर असलेलं कुंडमळा हे ठिकाण आसपासच्या लोकांमध्ये फारच प्रसिद्ध आहे. इथली शांतता आणि सौंदर्य पर्यटकांसाठी आकर्षणाचं केंद्र आहे. इंद्रायणी नदीवर छोटा बांध घालण्यात आला असून तिथे लहानसा धबधबा तयार झाला आहे. जोरदार पावसामुळे इथून पाणी वाहू लागतं जे अतिशय नयनरम्य आहे.

11 ) कामशेत ( kamshet )

कामशेत पॅराग्लायडिंगसाठी प्रसिद्ध आहे आणि ते पॅराग्लायडर्सचे स्वर्ग म्हणून प्रसिद्ध आहे. नवशिक्यांसाठी हा साहसी खेळ शिकण्यासाठी अनेक पॅराग्लायडिंग स्कूल येथे आहेत. कामशेतमधील पॅराग्लायडिंगसाठी शिंदे वाडी हिल्स हा सर्वात लोकप्रिय टेक ऑफ पॉइंट आहे. कामशेतला भेट देण्यासाठी हिवाळा आणि उन्हाळा असे दोन्ही काळ उत्तम आहेत, येथे पावसाळ्यात मोठे सुंदर धबधबे पाहायला मिळतात.

12 ) कुंडलिका व्हॅली ( kundalika valley )

मुळशी येथील कुंडलिका व्हॅली खूपच प्रसिद्ध आहे. याला तामिनी घाट सुद्धा म्हणतात. मुळशीपासून 6.2-मैल अंतरावर हे ठिकाण आहे.  साधारणपणे हा एक मध्यम स्वरुपाचा आव्हानात्मक  ट्रेक आहे. ही पायवाट भटंकती करणाऱ्यासाठी  हायकिंग आणि चालण्यासाठी उत्तम आहे आणि तुम्हाला येथे फारसे लोक भेटण्याची शक्यता नाही.

तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल
तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल.
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती.
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे.
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस.
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार.
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू.
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी.
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.