AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

कोकणात दोन खासदारांचा राडा, मंत्र्यांची मध्यस्थी

आयोजित केलेल्या जिल्हा नियोजन बैठकीत भाजप खासदार नारायण राणे (Narayan Rane) आणि शिवसेना खासदार विनायक राऊत (Vinayak Raut) यांच्यामध्ये शाब्दिक बाचाबाची झाली. (Narayan Rane Vinayak Raut)

कोकणात दोन खासदारांचा राडा, मंत्र्यांची मध्यस्थी
विनायक राऊत आणि नारायण राणे
| Edited By: | Updated on: Jan 28, 2021 | 5:27 PM
Share

सिंधुदुर्ग : जिल्हा नियोजन बैठकीत भाजप खासदार नारायण राणे (Narayan Rane) आणि शिवसेना खासदार विनायक राऊत (Vinayak Raut) यांच्यामध्ये शाब्दिक बाचाबाची झाली. राणे-राऊत यांच्यामध्ये शाब्दिक वाद झाल्यामुळे नंतर जिल्हापरिषद सदस्यांनी सभागृहात राडा घातला. तिलारी धरणाचा डावा कालवा फुटल्याच्या विषयावरून राऊत-राणे या नेत्यांमध्ये वाद झाल्याचे सांगण्यात येत आहे. हा वाद टोकाला गेल्यानंतर पालकमंत्री उदय सामंत यांना मध्यस्थी करावी लागली. (war of criticism between Narayan Rane and Vinayak Raut)

भाजप खासदार नारायण राणे आणि शिवसेना नेत्यांमध्ये असलेलं वैर सर्वश्रूत आहे. नारायण राणे शिवसेनेवर टीका करण्याची संधी सोडत नाहीत. त्यातही शिवसेना सत्तेत असल्यामुळे राणे शिवसेना आणि उद्धाव ठाकरेंवर टोकाची टीका करताना दिसतात. त्यांच्या या टीकेमुळे शिवसेनेच्या नेत्यांकडूनही राणे यांच्यावर प्रतीवार केला जातो. राणेंवर टीका करण्याची एकही संधी शिवसेनेचे नेते दवडत नाहीत. याच वादाचे प्रतिबिंब सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या नियोजन बैखकीत उमटले.

उदय सामंत यांची मध्यस्थी

तिलारी धरणाचा डावा कालवा फुटल्याच्या मुद्द्यावरुन भाजप सदस्य राजन म्हापसेकर यांनी बैठकीत भूमिका मांडली. मात्र त्यांनी मांडलेल्या भूमिकेवर शिवसेनेचे सदस्य बाबुराव धुरी यांनी आक्षेप नोंदवला. नंतर हाच आक्षेप राणे आणि राऊत यांच्यामध्ये शाब्दिक वादाचं कारण बणला. हा वाद नंतर टोकाला गेल्यानंतर पालकमंत्री उदय सामंत यांना मध्यस्थी करावी लागली. सामंत यांना तिलारी धरणाच्या फुटलेल्या कालव्याबद्दल संबंधित विभागाची बैठक घेऊन प्रश्न निकाली काढण्याचे आश्वासन द्यावे लागले. सामंत यांनी आश्वासन दिल्यानंतर राऊत आणि राणे समर्थक शांत झाले.

वैद्यकीय मदाविद्यालयावरुन राणे-राऊत यांच्यात वाद

याआधीही नारायण राणे आणि विनायक राऊत यांच्यात राजकीय पातळीवर आरोप प्रत्यारोप झालेले आहे. वैद्यकीय महाविद्यालयाला परवाणगी मिळावी म्हणून नारायण राणे मातोश्रीवर दिवसातून दोन ते तीन वेळा फोन करत होते, असा आरोप विनायक राऊत यांनी केला होता. तर त्यांच्या या आरोपाला राणे यांनी पत्रकार परिषद घेऊन सडेतोड उत्तर दिले होते. तर, मी माझ्या हिमतीवर वैद्यकीय महाविद्यालय उभारले आहे. विनायक राऊत माझ्यावर आकसापोटी टीका करतात. मुळात वैद्यकीय महाविद्यालयासाठी राज्य सरकार नव्हे तर केंद्रातून परवानगी मिळते. त्यामुळे विनायक राऊत (Vinayak Raut) यांचे वक्तव्य म्हणजे त्यांचे अज्ञान दाखवणारे आहे, असे प्रत्युत्तर  नारायण राणे यांनी राऊंतानादिले होते.

दरम्यान, नारायण राणे आणि विनायक राऊत यांच्यातील शाब्दिक बाचाबाचीची जिल्ह्याच्या राजकारणात चांगलीच चर्चा रंगली आहे.

नियोजन बैठकीतील व्हिडीओ :

संबंधित बातम्या :

राऊतांचं अज्ञान, मी कधीही मातोश्रीवर फोन केला नाही: नारायण राणे

दादागिरी केली तर ‘मातोश्री’च्या आतलं-बाहेरचं सगळं बाहेर काढेन : नारायण राणे

जिवाचं काही बरं वाईट झाल्यास राज्य सरकार जबाबदार – नारायण राणे

(war of criticism between Narayan Rane and Vinayak Raut)

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.