लॉकडाऊनमध्ये प्रशासनाकडून बैलगाडीवरचं कारवाई, जनावरांच्या चाऱ्याचं काय करायचं? शेतकऱ्याचा सवाल

वर्ध्यात कोरोना नियंत्रणासाठी पाच दिवस कडक निर्बंध लागू करणयात आले आहेत. Wardha Famer fine issue

लॉकडाऊनमध्ये प्रशासनाकडून बैलगाडीवरचं कारवाई, जनावरांच्या चाऱ्याचं काय करायचं? शेतकऱ्याचा सवाल
वर्ध्यातील सेलूमध्ये बैलगाडीवर कारवाई
Follow us
| Updated on: May 11, 2021 | 1:35 PM

वर्धा: वर्ध्यात कोरोना नियंत्रणासाठी पाच दिवस कडक निर्बंध लागू करणयात आले आहेत. 8 मे सकाळी 7 वाजतापासून 13 मेच्या सकाळी 7 वाजतापर्यंत असतील. निर्बंधांच्या कालावधीत अत्यावश्यक वैद्यकीय कारणाशिवाय बाहेर पडण्यास बंदी घालण्यात आली आहे. वर्ध्यात 5 दिवसांचा कडक लॉकडाऊन लावण्याचे आदेश जिल्हाधिकारी प्रेरणा देशभ्रतार यांनी दिले आहेत.ग्रामीण भागात देखील कठोर अंमलबजावणी करावी असे आदेश देण्यात आले आहेत. यादरम्यानं सेलूच्या विकास चौक येथे महसूल विभागाने नाकाबंदी करुन विनाकारण फिरणाऱ्यांवर कारवाई केलीय. मात्र संजय फटिंग हा शेतकरी आपल्या शेतात बैलाला चारा आणि शेतातील काम करण्यासाठी बैलगाडीतून जात असताना त्याच्यावर कारवाई करण्यात आलीय. (Wardha Selu Revenue department taken action on farmer with bullock cart)

बैलांना उन्हात ताटकळत ठेवलं?

महसूल विभागानं शेतकऱ्याकडे दंडाचा तगादा लावला. मात्र, शेतकऱ्याने पैसे नसल्याचे सांगितल्याने त्याला दोन तास उन्हात बसवून ठेवले गेले. एवढेच नाही तर बैलांना व बैलगाडी वर दोन तास ताटकळत ठेवून उन्हात उभे ठेवले. बैलगाडीवरून बैल सोडून ती बैलगाडी तहसील कार्यालयाच्या दुसऱ्या बाजूला लावण्यास सांगण्यात आली. या शेतकऱ्यांवर केलेल्या कारवाईचा आता शेतकऱ्यांसह आणि शेतकरी नेत्यांकडून विरोध केला जात आहे. तर, तहसीलदार यांच्यावर लवकरात लवकर कारवाई करावी, अशी मागणी जोर धरत आहे.

महसूल प्रशासन जनावरांच्या चाऱ्याची सोय करेल का?

संजय फटिंग या शेतकऱ्याने मात्र त्याच्यासोबत घडलेली आपबीती सांगितली आहे. जनावरांचा चारा आणि त्याला लागणारे पाणी यासाठी जर शेतात जायचं नाही तर मग महसूल प्रशासन चाऱ्याची सोय करेल का असा प्रश्न संजय फटिंग यांनी उपस्थित केला आहे. याचं तालुक्यातीस सेलू शहरात नांगरणीसाठी डिझेल घायला जाणाऱ्या शेतकऱ्याला देखील 2 हजार रुपयांच्या दंडाचं चलन देण्याचा प्रकार घडला आहे. त्यामुळे शेतकऱ्याविषयी सेलू तहसीलदार इतके कठोर का असा सवाल उपस्थित केला जात आहे..समाजमाध्यमावर देखील नागरिकांकडून सेलू तहसील प्रशासनाच्या विरोधात संताप व्यक्त होत आहे, वर्धा येथील शेतकरी नेते बाळा माउसकर यांनी सांगितलं आहे.

तहसीलदारांची भूमिका काय?

सकाळी साडे सात आणि आठची वेळ होती. त्यामुळे उन्हाचा प्रश्न नाही. तो शेतकरी आहे त्याच्याशी बोलून त्याला समजवण्याचा प्रयत्न महसूल विभागानं केला त्यामुळे दंड घेतला, चलन देण्याचा प्रश्नच नाही, अशी भूमिका वर्धा जिल्ह्यातील सेलूचे तहसीलदार महेश सोनावणे यांनी घेतली.

संबंधित बातम्या:

Bhandara Hospital Fire : भंडारा जिल्हा रुग्णालय आग प्रकरणात अखेर मोठी कारवाई, सिव्हिल सर्जनसह 6 जणांचं निलंबन

Maharashtra Coronavirus LIVE Update : 38 रुग्णालयात हवेतून ऑक्सिजन निर्मिती केली जाईल – राजेश टोपे

(Wardha Selu Revenue department taken action on farmer with bullock cart)

धूप-अगरबत्ती लावण्यावरून वाद, मराठी कुटुंबाला बेमद मारहाण, अखेर मुजोर
धूप-अगरबत्ती लावण्यावरून वाद, मराठी कुटुंबाला बेमद मारहाण, अखेर मुजोर.
'तो माझाच माल, त्याला कोणाची काही...', राऊतांवर शिवसेना नेत्याचा टोला
'तो माझाच माल, त्याला कोणाची काही...', राऊतांवर शिवसेना नेत्याचा टोला.
'माझ्यासह पत्नीला वर्षापासून त्रास अन् शिवीगाळ पण आता मराठी...'- आरोपी
'माझ्यासह पत्नीला वर्षापासून त्रास अन् शिवीगाळ पण आता मराठी...'- आरोपी.
परळीत अजितदादा गटाच्या माजी नगरसेविकेच्या मुलानं कर्मचाऱ्याला धुतलं
परळीत अजितदादा गटाच्या माजी नगरसेविकेच्या मुलानं कर्मचाऱ्याला धुतलं.
'निवडणुकीनंतर माज आलाय, पुढे पुन्हा अशी घटना घडली तर...'
'निवडणुकीनंतर माज आलाय, पुढे पुन्हा अशी घटना घडली तर...'.
सकाळी 9.30ला ते दोघे आले, फोटो काढून गेले, राऊतांच्या बंगल्याची रेकी
सकाळी 9.30ला ते दोघे आले, फोटो काढून गेले, राऊतांच्या बंगल्याची रेकी.
D फॉर डॉन अन् तो मंत्रिमंडळात? जितेंद्र आव्हाडांनी दिली हिंट
D फॉर डॉन अन् तो मंत्रिमंडळात? जितेंद्र आव्हाडांनी दिली हिंट.
'हुशार्‍या मारू नका, अडीच वर्षांनंतर..'; सत्तारांचा विरोधकांना इशारा
'हुशार्‍या मारू नका, अडीच वर्षांनंतर..'; सत्तारांचा विरोधकांना इशारा.
शरद पवारांचे 'हे' दोन नेते दादांच्या भेटीला, राजकारणात भूकंप होणार?
शरद पवारांचे 'हे' दोन नेते दादांच्या भेटीला, राजकारणात भूकंप होणार?.
कल्याणात मराठी कुटुंबाला मारहाण,मनसे दिला इशारा,'येत्या २४ तासात जर..'
कल्याणात मराठी कुटुंबाला मारहाण,मनसे दिला इशारा,'येत्या २४ तासात जर..'.