Wardha Crime | वर्धेत विनयभंग करून आरोपी पसार; तीन वर्षांपासून मुंबईत फुटपाथवार, अखेर अडकला पोलिसांच्या जाळ्यात

तीन वर्षांपूर्वी शैलेशने एका युवतीचा विनयभंग केला. त्यानंतर पोलिसांत तक्रार करण्यात आली. पोलीस अटक करतील, या भीतीने तो गावाबाहेर गेला. पण, तो कुठे आहे, याचा पत्ता लागत नव्हता. तीन वर्षांनंतर तो मुंबईत असल्याचं कळलं. पोलीस तीन दिवस त्याचा शोध घेत होते. शेवटी तो मुंब्रा रेल्वेस्थानकावर सापडला.

Wardha Crime | वर्धेत विनयभंग करून आरोपी पसार; तीन वर्षांपासून मुंबईत फुटपाथवार, अखेर अडकला पोलिसांच्या जाळ्यात
तीन वर्षांपासून पसार आरोपी सावंगी पोलिसांकडून अटकेत. Image Credit source: t v 9
Follow us
| Updated on: May 26, 2022 | 3:21 PM

वर्धा : शैलेश मडावी (Shailesh Madavi) याने सावंगी पोलीस (Sawangi Police) ठाण्याच्या हद्दीतील एका गावातील अल्पवयीन मुलीचा विनयभंग केला. त्याप्रकरणी त्याच्यावर 2018 मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता. मात्र तेव्हापासून तो फरार होता. अखेर सावंगी पोलिसांनी मुंबई येथे जात त्याला अटक केली. सावंगी पोलीस मुंबई येथे पोहोचले असता त्यांना आरोपी शैलेशचा थांगपत्ता नव्हता. तब्बल तीन दिवस पोलीस कर्मचाऱ्यांनी त्याचा शोध घेतला. शैलेश हा मिळेल ते काम करून फुटपाथवर राहत होता. कल्याण, दादर, मुंब्रा असा फिरत असल्याची माहिती होती. अखेर पोलिसांनी फुटपाथवरील काही मुलांना त्याचा फोटो दाखविला असता शैलेश हा मुंब्रा रेल्वेस्थानकावर दिसल्याचे त्यांनी सांगितले. अखेर पोलीस मुंब्रा रेल्वेस्थानकावर (Mumbra Railway Station) गेले आणि फुटपाथवर बसून असलेल्या आरोपी शैलेशला अटक केली.

मुंबईतून घेतले ताब्यात

अल्पवयीन मुलीचा विनयभंग करून आरोपी पसार झाला होता. मागील तीन वर्षांपासून पोलिसांच्या हातावर तुरी देणाऱ्या आरोपीचा सावंगी पोलिसांनी अटक केलीय. आरोपीला सावंगी पोलिसांनी मुंबई येथून ताब्यात घेतले. हा आरोपी मुंबई येथे फुटपाथवर वास्तव्यास होता. साटोडा येथील शैलेश देवीदास मडावी असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.

काय आहे प्रकरण

तीन वर्षांपूर्वी शैलेशने एका युवतीचा विनयभंग केला. त्यानंतर पोलिसांत तक्रार करण्यात आली. पोलीस अटक करतील, या भीतीने तो गावाबाहेर गेला. पण, तो कुठे आहे, याचा पत्ता लागत नव्हता. तीन वर्षांनंतर तो मुंबईत असल्याचं कळलं. पोलीस तीन दिवस त्याचा शोध घेत होते. शेवटी तो मुंब्रा रेल्वेस्थानकावर सापडला. गेली तीन वर्षे तो भटकत होता. मिळेल ते काम करून दिवस काढत होता. फुटपाथवर दिवस काढत होता. आधी केलेल्या चुकीचं प्रायश्चित्त करत होता. पण, परत आल्यास पोलीस आपल्याला अटक करतील, अशी त्याला भीती होती. त्यामुळं तो काही घरी परत येत नव्हता. शेवटी पोलीस तिथं गेले नि त्याला ताब्यात घेतले.

हे सुद्धा वाचा

बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.
मंत्रिमंडळात 39 पैकी 20 नव्या चेहऱ्यांना संधी, बघा कोणाची लागली वर्णी?
मंत्रिमंडळात 39 पैकी 20 नव्या चेहऱ्यांना संधी, बघा कोणाची लागली वर्णी?.
प्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांचं वयाच्या 73 व्या वर्षी निधन
प्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांचं वयाच्या 73 व्या वर्षी निधन.
महायुतीचा अखेर मंत्रिमंडळ विस्तार, कोणत्या जिल्ह्यात किती मंत्री?
महायुतीचा अखेर मंत्रिमंडळ विस्तार, कोणत्या जिल्ह्यात किती मंत्री?.
अजित दादांनी आपल्याच मंत्र्यांचे टोचले कान, '... अन्यथा वेगळा निर्णय'
अजित दादांनी आपल्याच मंत्र्यांचे टोचले कान, '... अन्यथा वेगळा निर्णय'.
प्रचंड बहुमतानंतर बहुप्रतिक्षेत मंत्रिमंडळाचा विस्तार, कोणाची वर्णी?
प्रचंड बहुमतानंतर बहुप्रतिक्षेत मंत्रिमंडळाचा विस्तार, कोणाची वर्णी?.