Wardha : वर्धा गर्भपात प्रकरण : डॉ. रेखा कदम यांच्या घराची झडती, काळवीटाचे कातडे जप्त
वनविभागाचे कर्मचारीही घटनास्थळी दाखल झाले असून काळवीटची कातडी नेमकी कधीची आहे हे अद्याप स्पष्ट झाले नाही. याशिवाय झडतीमध्ये डॉ. कदम यांच्या घरून 10 फाईल आणि काही कागदपत्रे जप्त केल्याची माहिती मिळते.
वर्धा : आर्वी येथील अल्पवयीन मुलीच्या गर्भपातानंतर पोलिसांची झडती सुरुच आहे. दोन दिवस कदम नर्सिंग होम आणि रुग्णालय परिसरात झडती केल्यानंतर आज पोलिसांनी डॉ. रेखा कदम यांच्या घराची झडती घेतली. या झडतीमध्ये पोलिसांनी काळवीटाचे कातडे कदम यांच्या घरातून जप्त केले आहे. याप्रकरणी वनविभाग आणि पोलिसांचा पंचनामा सुरु आहे.
वनविभागाचे कर्मचारीही घटनास्थळी दाखल झाले असून काळवीटची कातडी नेमकी कधीची आहे हे अद्याप स्पष्ट झाले नाही. याशिवाय झडतीमध्ये डॉ. कदम यांच्या घरून 10 फाईल आणि काही कागदपत्रे जप्त केल्याची माहिती मिळते. आधीच गर्भपात प्रकरणामुळे चर्चेत असलेल्या डॉ. रेखा कदम यांच्या घरी आता काळवीटाचे कातडे सापडल्याने त्यांच्या अडचणीत आणखी वाढ झाली आहे.
कदम रुग्णालयात केलेल्या खोदकामात 12 कवट्या, 54 हाडे सापडली
गर्भपात प्रकरण उघडकीस आल्यानंतर कदम रुग्णालय परिसरात गुरुवारी आणि शुक्रवारी दोन दिवस वर्धा आणि नागपूर फॉरेन्सिक टीमच्या निरगाणीखाली खोदकाम करण्यात आले होते. या खोदकामात 12 कवट्या आणि 54 हाडे सापडली होती. रुग्णालय परिसर आणि विहिरीत खोदकाम करण्यात आले होते. प्रकरण उघडकीस आल्यानंतर आरोग्य अधिकारी, पीसीपीएनडीटी समितीच्या राज्य सदस्या डॉ. आशा मिरगे यांनी आर्वी येथे भेट दिली होती.
कसे आले प्रकरण उघडकीस?
आर्वी शहारातील एका 13 वर्षाच्या मुलीचा 23 आठवड्यानंतर गर्भपात करण्यात आला होता. अल्पवयीन मुलीच्या या अवैध गर्भपाताची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी संबंधितांवर कारवाई करीत त्यांना अटक केले. तसेच गर्भपात करणाऱ्या डॉ. रेखा कदम यांच्यावरही गुन्हा दाखल झाला. यानंतर डॉ. कदम या पोलिसांच्या रडारवर आल्या. कदम रुग्णालयात याआधीही असे अवैध गर्भपात झालेत का याची चौकशी पोलिसांनी सुरु केली. यानंतर पोलिसांकडे धक्कादायक खुलासे झाले. त्यानुसार पोलीस आणि फॉरेन्सिक टीमने रुग्णालय आणि आजूबाजूच्या परिसराची झडती सुरु केली. या झडतीमध्ये 12 कवट्या आणि 54 हाडे सापडली. यानंतरही पोलिसांचे धाड सत्र सुरुच आहे. आज पोलिसांनी कदम यांच्या घराची झडती घेतली. (Dr. Rekha Kadam’s house raided in wardha, antelope hides confiscated)
इतर बातम्या
Dapoli Crime: चोरीच्या उद्देशानेच दापोलीतील तिहेरी हत्याकांड, दीड लाखांचे दागिने लंपास