“मराठी भाषा ही मुंबईचा आत्मा आहे, तो आत्मा मुंबईबाहेर जाणार नाही”; साहित्य संमेलनातच या सरकारकडून शब्द

मराठी भाषा ही मुंबईचा आत्मा आहे. त्यामुळे राज्यात आणि राज्याबाहेर होणारी मराठी साहित्य संमेलनासाठी आता सरकार मदत करणार असून ही संमेलनं सरकारने स्वतःहून घेतली पाहिजे असंही मत दीपक केसरकर यांनी व्यक्त केले आहे.

मराठी भाषा ही मुंबईचा आत्मा आहे, तो आत्मा मुंबईबाहेर जाणार नाही; साहित्य संमेलनातच या सरकारकडून शब्द
Follow us
| Updated on: Feb 03, 2023 | 8:11 PM

वर्धाः अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्यानिमित्ताने आज शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी बोलताना मराठी भाषेचा गौरव केला. मराठी भाषा टिकवली पाहिजे, वाढवली पाहिजे म्हणत त्यांनी मराठी साहित्य संमेलनांसाठी लागणारी अनुदानाच्या रक्कमेमध्ये वाढ केल्याचे सांगत 50 लाखांहून 2 कोटी असे अनुदान अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनासाठी देणार असल्याचे सांगितले. त्याच बरोबर मराठी भाषा भवन हे मुंबईमध्ये न होता ते नवी मुंबईमध्ये निर्माण करण्याचा विचार करण्याचा विचार सरकार करत होते.

मात्र सरकारने हा निर्णय बदलला असून मराठी भाषेसंदर्भात असलेली कार्यालये ही आता नवी मुंबईमध्ये न होता ती मुंबईमध्येच होणार असल्याचे सांगितले.

मराठी भाषा ही मुंबईचा आत्मा आहे. त्यामुळे मराठी भाषा भवन, सर्व मंडळे ही आता मुंबईमध्येच होणार असून त्याचा फायदा मराठी साहित्यिक, समीक्षक आणि अभ्यासकांना होणार असल्याचे दीपक केसरकर यांनी सांगितले.

मराठी भाषा ही मुंबईचा आत्मा आहे. त्यामुळे राज्यात आणि राज्याबाहेर होणारी मराठी साहित्य संमेलनासाठी आता सरकार मदत करणार असून ही संमेलनं सरकारने स्वतःहून घेतली पाहिजे असंही मत दीपक केसरकर यांनी व्यक्त केले आहे.

मराठी भाषा भवन हे सवोत्कृष्ट असले पाहिजे यासाठी सरकार प्रयत्नशील आहे. त्यासाठी संबंधित कार्यालये ही मुंबईत असावी यासाठीच ते प्रयत्न केले जात आहे. त्यामुळे नवी मुंबईत होणारे कार्याल न करता ते कार्यालय आता मुंबईमध्येच केले जाणार आहे.

त्याचबरोबर निर्माण केल्या जाणाऱ्या साहित्य भवनात आणखी दोन वर्षे राहण्याची योग्य व्यवस्था, नाट्यगृह करण्यात येणार असून त्याचा लाभ लेखकांनी घ्यावा असं आवाहनही त्यानी यावेळी केले.

विश्व मराठी साहित्य संमेलनासाठी आता राज्यातील सातही मंडळे एकत्र येऊन हे साहित्य संमेलन मोठ्या उत्साहात केली जाणार आहेत. त्यासाठी आपण आतापासूनच या मंडळाच्या सर्वांना आमंत्रित करून विश्व साहित्य संमेलन मोठ्या उत्साहात करायची आहेत असंही त्यांनी यावेळी सांगितले.

'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा.
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या...
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या....
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर.
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला.
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?.
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?.