Wardha Murder : वर्ध्यात चारित्र्याच्या संशयातून दगडाने ठेचून पत्नीची हत्या, आरोपी पतीला अटक

इमरान खान हा भूगाव ते नांदेड मालवाहू ट्रक चालवायचा. इमरान कामावरुन आज घरी आला तेव्हा पत्नी कैकशाही घरी होती. त्याने पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत तिला शिवीगाळ करण्यास सुरवात केली. महिलेने शिवीगाळ करण्यास हटकले असता रागाच्या भरात आरोपी पतीने रस्त्याच्या कडेला असलेला दगड उचलून कैकशाच्या डोक्यात घातला.

Wardha Murder : वर्ध्यात चारित्र्याच्या संशयातून दगडाने ठेचून पत्नीची हत्या, आरोपी पतीला अटक
वर्ध्यात चारित्र्याच्या संशयातून दगडाने ठेचून पत्नीची हत्याImage Credit source: TV9
Follow us
| Updated on: Apr 12, 2022 | 9:16 PM

वर्धा : चारित्र्यावर संशय घेत पत्नी (Wife)चे डोके दगडाने ठेचून तिची हत्या (Murder) केल्याची घटना वर्ध्यातील भूगाव येथे घडली आहे. याप्रकरणी सावंगी पोलिसांनी आरोपी पतीस अटक केल्याची माहिती आहे. कैकशा इमरान खान (21) असे हत्या करण्यात आलेल्या महिलेचे नाव आहे तर इमरान खान असे हत्या करणाऱ्या आरोपी पतीचे नाव आहे. याप्रकरणी सावंगी पोलिस ठाण्यात घटनेची माहिती दोण्यात आली. घटनेची माहिती मिळताच सावंगी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह ताब्यात घेतला. मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवण्यात आला. आरोपीला सावंगी पोलिसांनी अटक केली आहे. हत्या प्रकरणाचा पुढील तपास पोलिस करीत आहेत. (Husband kills wife on suspicion of character murder in Wardha accused arrested)

चारित्र्याच्या संशयातून केली हत्या

आरोपी इमरान खान हा मूळचा पुलगाव येथील रहिवासी असून गेल्या 10 ते 15 वर्षांपासून कुटुंबासोबत भूगाव येथे वास्तव्यास आहे. इमरान खान हा भूगाव ते नांदेड मालवाहू ट्रक चालवायचा. इमरान कामावरुन आज घरी आला तेव्हा पत्नी कैकशाही घरी होती. त्याने पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत तिला शिवीगाळ करण्यास सुरवात केली. महिलेने शिवीगाळ करण्यास हटकले असता रागाच्या भरात आरोपी पतीने रस्त्याच्या कडेला असलेला दगड उचलून कैकशाच्या डोक्यात घातला. कैकशाचे डोके ठेचून त्याने तिची हत्या केली. पत्नीला रक्त्याच्या थारोळ्यात पडलेले पाहून आरोपीने तेथून पळून गेला. पोलिसांनी तात्काळ तपासाची चक्रे फिरवत इमरान खान याला ताब्यात घेतले. पुढील तपास उपविभागीय पोलिस अधिकारी पियुष जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणेदार धनाजी जळक करीत आहेत. (Husband kills wife on suspicion of character murder in Wardha accused arrested)

इतर बातम्या

Fraud: जमिनीच्या नोंदीसाठी 25 हजारची लाच घेतना तलाठी लाचलूचपतच्या जाळ्यात; कोतवालावरही कारवाई

New York Firing Brooklyn : न्यूयॉर्कमधील मेट्रो स्टेशनवर गोळीबार, पाच ठार तर अनेक जण जखमी

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.