Wardha Crime | वर्ध्यात मद्यपीचा बॅचलर रोडवर धिंगाणा, कारची काच फोडली, नागरिकांनी मद्यपीला बदडले
मद्यपी कारला हाताने मारतो. पण, काच काही फुटत नाही. मग, एक दगड आणतो. त्या दगडानं कारची काच फोडतो. हे सार बाजूचे लोकं पाहत होते. तो मद्यधुंद असल्याचं त्यांच्या लक्षात आलं. मग, नागरिकांनी त्याची चांगलीच धुलाई केली.
वर्धा : वर्धेच्या बॅचलर रोडवर (Bachler Road) रविवारी रात्री मद्यपीने चांगलाच धिंगाणा घातला. हा मद्यपी रस्त्याने शिवीगाळ करत चालला होता. तो एवढ्यावरच थांबला नाही तर रस्त्यावर असलेल्या एका कारचे त्याने काचही फोडले. या मद्यपीचा धिंगाणा वाढत असल्याने तेथील नागरिक संतप्त झाले. त्याला चांगलाच चोप दिलाय. नागरिकांनी या मद्यपीची झिंग उतरवून पोलिसांच्या स्वाधीन केले. शिववैभव मंगल कार्यालय जवळ रस्त्याच्या कडेला एका महिलेची कार उभी होती. तेवढ्यातच तेथून जातं असलेला अरुण शेलार (Arun Shelar) हा दारूच्या नशेत झिंग होता. त्याने पहिले रस्त्यावर धिंगाणा घालत असताना कारला लात मारत त्याने काच फोडायला (smashed car glass ) सुरवात केली.
मद्यपी जालन्याचा असल्याची माहिती
ही बाब रस्त्यावर असलेल्या नागरिकांच्या लक्षात आली. काहींनी ही घटना मोबाईलमध्ये कैद केली. काही वेळेत परिसरातून जाणारे नागरिक जमले. त्याला चांगलाच चोप देत पोलिसांना माहिती दिली. रामनगर पोलिसांनी घटनास्थळी येत या मद्यपीला ताब्यात घेतले. मिळालेल्या माहितीनुसार हा जालना येथील रहिवासी असून मानसिक रुग्ण असल्याची माहिती आहे. ही घटना बॅचलर रोडवर रविवारी सायंकाळी घडली. त्यामुळं गाडी चालकांच्या मनात भीती पसरली होती. आपली गाडी तर कुणी फोडणार नाही ना, असं त्यांना वाटतं होतं. पण, आता आरोपीला पोलिसांना ताब्यात घेतलंय.
दगडाने फोडली कारची काच
मद्यपी कारला हाताने मारतो. पण, काच काही फुटत नाही. मग, एक दगड आणतो. त्या दगडानं कारची काच फोडतो. हे सार बाजूचे लोकं पाहत होते. तो मद्यधुंद असल्याचं त्यांच्या लक्षात आलं. मग, नागरिकांनी त्याची चांगलीच धुलाई केली. मद्यपीची नशा उतरवली. त्यानंतर कळलं की, तो काही प्रमाणत मानसिक रुग्ण आहे. त्यानंतर त्याला पोलिसांच्या हवाली करण्यात आलं. रस्त्यावरील कारची काच फोडल्यामुळं हा वेडसर असावा, असा पोलिसांचा अंदाज होता. तो तसाच असल्याची माहिती पुढं आली. पण, तो खरोखरच वेडा होता की, वेडसरपणाचं सोंग घेतलेला होता. याचा तपास आता पोलीस करत आहेत.