Wardha Crime : दारूबंदी असलेल्या जिल्ह्यात झिंगाट पार्टी, आयोजकासह फार्म मालकाला अटक

सावंगी पोलिस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या पालोती गावापासून काही दूर अंतरावर उमेश जिंदे यांच्या मालकीचे फार्म हाऊस आहे. या फार्म हाऊसवर सौरभ ठाकूर याने ‘सॅटरडे नाईट डिजे’ पार्टीचे आयोजन केले होते. यासाठी त्यांनी सोशल मीडियावर देखील मोठा गाजावाजा केला होता. या पार्टीत तरुणाईने मोठ्या संख्येत हजेरी लावली होती.

Wardha Crime : दारूबंदी असलेल्या जिल्ह्यात झिंगाट पार्टी, आयोजकासह फार्म मालकाला अटक
दारूबंदी असलेल्या जिल्ह्यात झिंगाट पार्टी
Follow us
| Updated on: Feb 27, 2022 | 5:30 PM

वर्धा : वर्धा हा दारूबंदी जिल्हा म्हणून ओळखला जातो. महात्मा गांधींच्या वास्तव्याने पवित्र झालेला हा जिल्हा सगळीकडे शांतिप्रिय जिल्हा असं म्हटलं जाते. मात्र, जिल्ह्यात ‘सॅटरडे नाईट’(Saturday Night) पार्टीचे आयोजन ही बाब काही पटणारी नव्हती. मग काय पोलिसांनी वेळीच पालोती गावासमोर असलेले फार्म हाऊस गाठून सुरु असलेल्या ‘डिजे पार्टी’(Dj Party)चा डाव उधळून लावत पार्टीचे आयोजन करणाऱ्यासह फार्म मालकाला पोलिसांनी बेड्या ठोकल्या. जिल्हा परिषद सदस्य उमेश गोपाळ जिंदे आणि सौरभ दिलीपसिंह ठाकूर अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. डीजेच्या तालावर झिंगाट असलेली तरुणाई पोलीस पोचताच तेथून सैराट झाली. एवढंच नव्हे तर या पार्टीची जाहिरात मागील दोन ते तीन दिवसांपासून युवकांच्या सोशल मीडिया ग्रुपवर फिरवली जात होती. (Police arrested the farm owner along with the organizer of the liquor party)

सॅटरडे नाईट डिजे पार्टीचे आयोजन केले होते

सावंगी पोलिस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या पालोती गावापासून काही दूर अंतरावर उमेश जिंदे यांच्या मालकीचे फार्म हाऊस आहे. या फार्म हाऊसवर सौरभ ठाकूर याने ‘सॅटरडे नाईट डिजे’ पार्टीचे आयोजन केले होते. यासाठी त्यांनी सोशल मीडियावर देखील मोठा गाजावाजा केला होता. या पार्टीत तरुणाईने मोठ्या संख्येत हजेरी लावली होती. मात्र, याची चुणूक सावंगी पोलिसांना लागताच रात्री 10.30 वाजण्याच्या सुमारास सावंगी पोलिसांनी पालोती स्थित ‘फोर कॉईन्स’ फार्म हाऊस गाठून पोलिसांनी या पार्टीचा डाव उधळून लावत दोघांना बेड्या ठोकल्या.

पोलिसांकडून 3 लाख 52 हजार 505 रुपयांचा मुद्देमाल जप्त

पोलिसांनी डिजे पार्टीवर छापा मारुन महागड्या कंपनीचा दारुसाठा आणि बिअर असा 44 हजार 505 रुपयांचा विदेशी दारुसाठा जप्त केला. तसेच 2 लाख रुपये किंमतीचा डिजे आणि ज्या कारमधून दारु आणली गेली ती कार, सीसीटीव्ही कॅमेरा डीव्हीआर असा एकूण 3 लाख 52 हजार 505 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. रात्री उशिरापर्यंत सुरु असलेल्या पार्टीत पोलिसांची एन्ट्री होताच तरुणाई सैरभैर पळू लागली. पोलिसांनी फार्महाऊसमधील दोन्ही फाटकं बंद करुन तरुणाईमध्ये चढलेली दारुची झिंग उतरविली. फार्महाऊसमध्ये सुरु असलेल्या डिजे पार्टीचा डाव पोलिसांनी उधळून लावल्यानंतर संपूर्ण फॉर्महाऊसची तपासणी करण्यात आली. पहाटे 4 वाजेपर्यंत ही कारवाई सावंगी पोलिसांकडून करण्यात आल्याची माहिती आहे. वर्ध्यात अशी पहिलीच मोठी कारवाई आहे.

पार्टीबाबत माहिती टाकून ऑनलाईन तिकिट बुकिंग उपलब्ध केले होते

ज्या फार्महाऊसमध्ये पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. तेथे यापूर्वी असे काही प्रकार घडले का? किंवा आणखी कोणते अवैध व्यवसाय तेथे चालतात का? याबाबतची तपासणी केली जाणार असून रिसॉर्टचा परवाना रद्द करण्यासाठी संबंधित विभागाला पोलिस विभागाकडून पत्रव्यवहार केला जाणार असल्याची माहिती आहे. पालोती येथे होणाऱ्या पार्टीचे नियोजन करण्यात आले होते. याबाबत सोशल मीडियावरुनही प्रसिद्धी दिल्या जात होती. विविध व्हॉट्सग्रुपवर देखील पार्टीबाबत माहिती टाकून ऑनलाईन तिकिट बुक करण्याबाबत सांगण्यात आले होते. मात्र, पोलिसांनी वेळीच ही पार्टी उधळून लावली असली तरी सोशल मीडियावर हे कुणी व्हायरल केलं, याचा शोध घेऊन कारवाई करण्याची आवश्यकता आहे. (Police arrested the farm owner along with the organizer of the liquor party)

इतर बातम्या

Nanded Crime : नांदेडमध्ये विद्यार्थ्यांच्या दोन गटात राडा, तोडफोड आणि जाळपोळीत पाच मोटारसायकलचे नुकसान

Ulhasnagar Fire : उल्हासनगरात जीन्स कारखान्याला मोठी आग, आगीत जीन्सचे रोल आणि मशिनरी जळून खाक

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.