Wardha Sena Rada | वर्ध्यातील शिवसेनेचा राडा मद्यपानातून, खासदार कृपाल तुमाने यांची सारवासारव
मद्यपानाच्या नशेत शिवसैनिकाने वाद घातला होता. अशी सारवासारव खासदार कृपाल तुमाने यांनी केली. वरिष्ठांना घडलेल्या प्रकारची माहिती देण्यात आली आहे. यावर वरिष्ठ निर्णय घेणार असल्याची माहिती तुमाने यांनी दिली. कार्यकर्त्यांचे रुसवे दूर करणे हेच शिवसंपर्क अभियानाचे उद्देश असल्याचं ते म्हणाले.
वर्धा : शिवसंपर्क अभियानाच्या (Shiv Sampark Abhiyan) पहिल्याच दिवशी वर्धेत शिवसैनिकांमधील आपसी वाद चव्हाट्यावर आला. खासदार कृपाल तुमाने येण्यापूर्वी शिवसंपर्क अभियानाच्या पूर्वतयारीसाठी मुंबई येथून आलेल्या पदाधिकाऱ्यांच्या समोरच शिवसेनेचे माजी उपजिल्हा प्रमुख तुषार देवढे (Former Sub-District Head Tushar Devdhe) यांनी कार्यकर्त्यांसह विश्रामगृहात अनाधिकृतपणे प्रवेश केली. तसेच पदाधिकाऱ्यांना शिवीगाळ करीत जीवे मारण्याची धमकी दिली. तसेच विश्रामगृहातील शासकीय मालमत्तेची तोडफोड केल्याची घटना घडलीय. या प्रकरणाची पूर्ण माहिती वरिष्ठाना देण्यात आली आहे. गोंधळ घालणारा शिवसैनिक हा मद्यपान करून होता, अशी माहिती खासदार कृपाल तुमाने (MP Kripal Tumane) यांनी दिलीय.
गोंधळाची माहिती वरिष्ठांना दिली
शिवसेनेच्या कार्यकर्त्यांमधील अंतर्गत वाद दूर करणे, कार्यकर्त्यांना पक्षाच्या कामात सक्रिय करण्यासाठी शिवसेनेकडून शिवसंपर्क अभियान सुरू करण्यात आले आहे. चार दिवस हे अभियान सुरू राहणार आहे. जिल्ह्याच्या प्रत्येक भागातील शिवसैनिकांची भेट मुंबई येथून आलेले पदाधिकारी घेणार आहे. सोबतच मंगळवारी विश्रामगृहात झालेल्या गोंधळाची माहिती वरिष्ठांना देण्यात आली आहे. या पदाधिकाऱ्यावर कारवाई संदर्भात लवकरच निर्णय घेण्यात येणार आहे, अशी माहिती वर्धेचे शिवसंपर्क अभियानाचे प्रमुख खासदार कृपाल तुमाने यांनी दिलीय.
शिविगाळ करणाऱ्यावर काय कारवाई होणार
वर्धा जिल्ह्यात शिवसेनेत अंतर्गत असलेला वाद सर्वश्रुत आहे. संपर्कप्रमुख अनंत गुढे यांनी केलेल्या नियुक्त्या नेहमीच वादाच्या भोवऱ्यात राहिल्या आहे. अश्याच नियुक्तीवरून हा वाद झाला. याचे पर्यावसन तोडफोडीत झाले. याप्रकरणी तोडफोड करणाऱ्यांवर तसेच शिविगाळ करणाऱ्यांवर काय कारवाई होते, हे पाहावे लागेल.
काय आहे प्रकरण
विश्रामगृहात झालेल्या राड्यावरून जिल्ह्याचे संपर्क प्रमुख आणि माजी खासदार अनंत गुढे यांनी शहर पोलीस ठाण्यात तुषार देवढे विरोधात तक्रार दाखल केली. शिवसेनेच्या वतीने 22 ते 25 मार्च या कालावधीत शिवसेना संपर्क मोहीम हे अभियान राबविण्यात येत आहे. यासाठी मंगळवारी येथील विश्रामगृहात मुंबई येथून शिवसेना संपर्क प्रमुख आणि काही पदाधिकारी दाखल झाले होते. मात्र, शिवसेनेचे माजी उपजिल्हा प्रमुख तुषार देवढे हे आपल्या कार्यकर्त्यांसह विश्रामगृहात दाखल झाले. त्यांनी विधानसभा संपर्क प्रमुख गणेश टोणे आणि जिल्हाप्रमुखांशी बाचाबाची करुन शाब्दिक वाद करीत जीवे मारण्याची धमकी दिली.