Video : RPF जवान नसता, तर हा माणूस आज जिवंत नसता! RPF जवान नव्हे हा तर देवदूत
चित्रसेन पात्रा यांचे दोन्ही पाय फलाट आणि रेल्वेच्या खाली जात असल्याचे दिसताच आरक्षक मंगेश दुधाने हा देवदूत बनून आला आणि ‘व्हॅक्यूम ड्राॅप’ टाकून ट्रेन तात्काळ थांबवून दोन्ही हाताने त्याला बाहेर काढून जीव वाचविला.
वर्धा – रेल्वेचे (Wardha Junction) अनेक अपघात आपण सीसीटिव्हीच्या (CCTV) माध्यमातून पाहत असतो. काही क्षणाचा विलंब झाला असता, तर हा वाचला असता असा शब्द अनेकदा आपल्या तोंडातून व्हिडीओ पाहताना बाहेर पडतो. अशीच एक घटना वर्ध्यामध्ये घडली आहे. धावती रेल्वे पकडणाऱ्या एकाचा तोल गेला. तो रेल्वेसोबत सरपडत जाऊ लागला. त्यावेळी तिथं ऑन ड्युटी असलेल्या जवानाने जिवाची पर्वा न करता धाडस करून प्रवाशांचा जीव वाचवला. ही घटना वर्धा रेल्वेस्थानकावरील फलाट क्रमांक १ वर घडली. जीव वाचल्याने प्रवाशाने सुरक्षा बलाच्या रक्षकाचे (Security guard) आभार मानले आहे. ही घटना रेल्वेस्थानकावरील सिसिटीव्हीत कैद झाली आहे.
Video : RPF जवान नसता, तर हा माणूस आज जिवंत नसता! RPF जवान नव्हे हा तर देवदूत#wardhajawan #wardha @WardhaPolice #wardhajunction pic.twitter.com/veXZxi4l1m
हे सुद्धा वाचा— TV9 Marathi (@TV9Marathi) May 24, 2022
नेमकं व्हिडीओत काय आहे
वर्धा रेल्वे स्थानकावरील फलाट क्रमांक 1 अहमदाबाद-पूरी एक्सप्रेस रेल्वेगाडी आली. त्यावेळी एस 5 बोगीतून सीट क्रमांक 39 वर बसून वडोदरा ते बालूगाव हा प्रवास करणारे चित्रसेन लीलाधर पात्रा हे देखील होते. ते मुळचे पाटनशाही, बिलासपूर ओडीसा येथील रहिवासी आहेत. त्यावेळी हातात बाटली रिकामी आहे. म्हणून भरण्यासाठी खाली उतरले. उतरलेल्या फलाटावर पाण्यासाठी अधिक गर्दी असल्याने चित्रसेन यांनी दुसऱ्या फलाटावर पाणी भरण्यासाठी गेले. गाडी सुरू झाल्याचे प्रवाशाच्या लक्षात आल्यानंतर त्याने रेल्वेच्या दिशेने धाव घेतली. रेल्वेत प्रवेश करीत असताना त्याचा तोल गेला. त्याचे डोके फलाटावर घासत जात होते. ही बाब फलाटावर असलेल्या नागरिकांना दिसताच आरडाओरड केली. कर्तव्यावर असलेला आरपीएफचा रक्षक मंगेश दुधाने हा देवदूत बनून आला आणि स्वत:च्या जिवाची पर्वा न करता चित्रसेनचा जीव वाचविण्यासाठी धडपड करुन त्याचा जीव वाचविला.
‘व्हॅक्यूम ड्राॅप’ टाकून ट्रेन तात्काळ थांबवली
चित्रसेन पात्रा यांचे दोन्ही पाय फलाट आणि रेल्वेच्या खाली जात असल्याचे दिसताच आरक्षक मंगेश दुधाने हा देवदूत बनून आला आणि ‘व्हॅक्यूम ड्राॅप’ टाकून ट्रेन तात्काळ थांबवून दोन्ही हाताने त्याला बाहेर काढून जीव वाचविला.
प्रवाशाला पाणी पाजून धीर देत त्याला सुरक्षितरित्या सीटवर बसविले.मंगेश दुधाने याच्या कामगिरीबाबत त्याचे कौतुक केले जात आहे.