Wardha Crime | कुरियर, पार्सलद्वारे अंमली पदार्थांची तस्करी, नियंत्रणासाठी वर्ध्यात दोन समित्या गठीत, पोलिसांची राहणार करडी नजर

काही ठिकाणी अवैधरित्या गांजा व खसखसची लागवड होण्याची शक्यता असते. असे आढळून आल्यास स्थानिकांनी पोलीस विभागाला माहिती द्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे. अंमली पदार्थांपासून सर्वसामान्य नागरिक व शाळा महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना दूर ठेवण्यासाठी जिल्हाभर जनजागृती मोहीम राबविण्याच्या सूचना जिल्हाधिकारी प्रेरणा देशभ्रतार यांनी दिल्या आहे.

Wardha Crime | कुरियर, पार्सलद्वारे अंमली पदार्थांची तस्करी, नियंत्रणासाठी वर्ध्यात दोन समित्या गठीत, पोलिसांची राहणार करडी नजर
बैठकीच्या अध्यक्षस्थानी जिल्हाधिकारी प्रेरणा देशभ्रतारImage Credit source: tv 9
Follow us
| Updated on: Jun 05, 2022 | 9:46 AM

वर्धा : अंमली पदार्थांची मागणी व पुरवठा पार्सल, कुरियरच्या (Courier) माध्यमातून होत असल्याची माहिती आहे. त्यामुळे अंमली पदार्थांवर नियंत्रण ठेवण्यासाठी जिल्हयात दोन वेगवेगळया समित्या गठीत करण्यात आल्या आहेत. यासाठी पोलिसांची भूमिका महत्वाची आहे. त्यांच्याकडून गोपनीय पद्धतीने नजर ठेवण्यात येणार आहे. पोलिसांनी गुप्त पाळत ठेऊन कडक कारवाई करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी प्रेरणा देशभ्रतार (Prerna Deshbhratar) यांनी दिल्या आहेत. बैठकीच्या अध्यक्षस्थानी जिल्हाधिकारी प्रेरणा देशभ्रतार होत्या. यावेळी पोलीस अधीक्षक प्रशांत होळकर (Superintendent of Police Prashant Holkar), अप्पर पोलीस अधीक्षक यशवंत सोळंके, उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, उपविभागीय पोलीस अधिकारी, पोलीस निरीक्षक, अंमली पदार्थ विरोधी पथकाचे अधिकारी, अन्न व औषध प्रशासन विभाग, कृषी विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

पोलीस पथकांना विशेष दक्षता घेण्याच्या सूचना

काही दिवसांपूर्वी राज्यात काही ठिकाणी अंमली पदार्थ आढळून आल्याने शासनाने यावर प्रतिबंध घालण्यासाठी जिल्हा स्तरावर दोन समित्यांचे गठण केले आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेत जिल्हा स्तरीय अंमली पदार्थ नियंत्रण समिती तर पोलीस अधीक्षकांच्या अध्यक्षतेत अंमली पदार्थ विरोधी कार्यकारी समितीचा समावेश आहे. नेदरलॅन्ड देशातून मॅग्झीनमध्ये एलएसडी पेपर या अंमली पदार्थांची तस्करी होत आहे. अशा पदार्थांवर पोलिसांची करडी नजर राहणार आहे. यात खासगी कुरियर व्यवस्थापकांचा देखील सहभाग घेतला जाणार आहे. लगतच्या छत्तीसगड व तेलंगणा राज्यातून नागपूर येथून व तेथून जिल्हयात गांजा सारख्या अंमल पदार्थांची तस्करी केली जाते. त्यामुळे पोलीस पथकांना विशेष दक्षता घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

जिल्हाभर जनजागृती मोहीम राबविण्याच्या सूचना

काही ठिकाणी अवैधरित्या गांजा व खसखसची लागवड होण्याची शक्यता असते. असे आढळून आल्यास स्थानिकांनी पोलीस विभागाला माहिती द्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे. अंमली पदार्थांपासून सर्वसामान्य नागरिक व शाळा महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना दूर ठेवण्यासाठी जिल्हाभर जनजागृती मोहीम राबविण्याच्या सूचना जिल्हाधिकारी प्रेरणा देशभ्रतार यांनी दिल्या आहे.

हे सुद्धा वाचा

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.