Wardha Incident : वर्ध्यात स्टिल कंपनीत बेल्टमध्ये पडल्याने एकाचा मृत्यू, कामगारांची आर्थिक मदत देण्याची मागणी

मयत कामगार कमलेश गजभिये हा मूळचा भंडारा येथील रहिवासी असून तो कामानिमित्त वर्धा येथे राहतो. मागील दहा वर्षापासून कमलेश उत्तम गालवा कंपनी भुगाव येथे ऑपरेटर या पदावर काम करीत होता. नेहमीप्रमाणे तो मिक्सिंग अँड नेड्युलायझिंग ड्रम विभागात रात्रपाळीची ड्युटी करत होता.

Wardha Incident : वर्ध्यात स्टिल कंपनीत बेल्टमध्ये पडल्याने एकाचा मृत्यू, कामगारांची आर्थिक मदत देण्याची मागणी
सांकेतिक छायाचित्र
Follow us
| Updated on: Feb 13, 2022 | 4:04 PM

वर्धा : वर्ध्यातील उत्तम गालवा कंपनीमध्ये एमएनडी या भागात कन्वर्ट बेल्ट (Convert Belt)मध्ये दबून एका ऑपरेटर (Operator)चा जागीच मृत्यू झाल्याची घटना आज पहाटे सुमारास घडली आहे. कमलेश गजभिये असे मयत कामगाराचे नाव आहे. या घटनेमुळे भुगावच्या उत्तम गालवा येथील स्टील कंपनीतील कामगारांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. या घटनेमुळे कामगारांमध्ये संताप असून सेफ्टी उपकरणे आणि येथे वारंवार होणारे तांत्रिक बिघाड यावर नाराजी व्यक्त केली जात आहे. मयत कामगाराचा मृतदेह सेवाग्राम रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे. विशेष म्हणजे कंपनी प्रशासनाकडून या घटनेबाबत आणि कामगाराच्या मृत्यूबाबत साधी चौकशीही करण्यात आली आहे. (Worker dies after falling into belt at Bhugaon Steel Company)

दहा वर्षांपासून उत्तम गालवा कंपनीत होता कार्यरत

मयत कामगार कमलेश गजभिये हा मूळचा भंडारा येथील रहिवासी असून तो कामानिमित्त वर्धा येथे राहतो. मागील दहा वर्षापासून कमलेश उत्तम गालवा कंपनी भुगाव येथे ऑपरेटर या पदावर काम करीत होता. नेहमीप्रमाणे तो मिक्सिंग अँड नेड्युलायझिंग ड्रम विभागात रात्रपाळीची ड्युटी करत होता. दरम्यान अचानक बेल्टमध्ये पडून त्याचा जागीच मृत्यू झाला. जेथे दोन पेक्षा अधिक माणसांची गरज आहे तेथे एकावरच काम भागवले जाते आहे. बऱ्याच वेळेनंतर ही घटना तेथील हेल्परच्या लक्षात आली. त्याने आरडाओरडा केल्याने संबंधित विभागातील सर्व कर्मचारी येऊन मशीन बंद केली व कन्व्हर्टर बेल्टमध्ये दबून असलेला मृतदेह बाहेर काढला. मशिनमधून मृतदेह बाहेर काढायला अर्धा तास लागला. त्यानंतर शवविच्छेदन करण्यासाठी मृतदेह सेवाग्राम रुग्णालयात नेण्यात आला. हा सर्व प्रकार होऊनही कंपनीच्या संचालक मंडळातर्फे विचारपूस करण्यात आली नसल्याचे उपस्थित कर्मचाऱ्यांनी सांगितले. मृतकाच्या परिवाराला आर्थिक मदत देण्याची मागणी सर्व कर्मचारी वर्गाने केली आहे.

पुणे-सोलापूर महामार्गावर भीषण अपघात

टोलनाक्याजवळ उभ्या असलेल्या ट्रकला स्विफ्ट कारने धडक दिल्याने झालेल्या अपघात दोन जण ठार झाल्याची घटना दौंड तालुक्यात पुणे-सोलापूर महामार्गावर घडली आहे. बाबू आनाप्पा कोळी आणि शिवयोगी गणपती देसाई अशी मृत्यू झालेल्यांची नावे आहेत. कासुर्डी टोलनक्याजवळ मालवाहतूक ट्रक उभा होता. याच दरम्यान पुण्याकडून सोलापूरच्या दिशेने जाणाऱ्या स्विफ्ट कारमधील चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने कार थेट उभ्या असलेल्या मालवाहू गाडीला धडक दिली आहे. अपघातातील जखमींना खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. (Worker dies after falling into belt at Bhugaon Steel Company)

इतर बातम्या

आर्यन मॅन हार्दिक पाटीलच्या घरावर पेट्रोल बॉम्ब हल्ला करणारा पोलिसांच्या ताब्यात, 9 महिने पोलिसांना दिला गुंगारा

Nashik Murder| 50 लाखांची मागणी बेतली डॉ. सुवर्णा वाजेंच्या जीवावर, चिठ्ठीतून काय झाला उलगडा?

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.