चुकीच्या पोलिओ डोसमुळे चिमुकलीचा मृत्यू झाल्याचा आरोप, नेमकं प्रकरण काय?

पोलिओचा चुकीच्या पद्धतीने डोस दिल्यामुळे दोन महिन्याच्या मुलीचा मृत्यू झाल्याचा धक्कादायक आरोप मंगरूळपीर तालुक्यातील लिंबी येथे करण्यात आला आहे. दरम्यान श्रुष्टी आडे या बलिकेला 8 फेब्रुवारी पोलिओचा डोस दिला त्यानंतर श्रुष्टीचा मेंदू बंद झाल्यामुळे तिला पुढील उपचारासाठी अकोला येथे दाखल केले. मात्र 15 फेब्रुवारीला तिचा मृत्यू झाल्यामुळे गावात हळहळ व्यक्त केली जात आहे.

चुकीच्या पोलिओ डोसमुळे चिमुकलीचा मृत्यू झाल्याचा आरोप, नेमकं प्रकरण काय?
चिमुकलीच्या मृत्युचे कारण काय?
Follow us
| Updated on: Feb 20, 2022 | 4:15 PM

वाशिम : पोलिओचा (Polio Dose) चुकीच्या पद्धतीने डोस दिल्यामुळे दोन महिन्याच्या मुलीचा मृत्यू (Girl Death) झाल्याचा धक्कादायक आरोप मंगरूळपीर तालुक्यातील लिंबी येथे करण्यात आला आहे. दरम्यान श्रुष्टी आडे या बलिकेला 8 फेब्रुवारी पोलिओचा डोस दिला त्यानंतर श्रुष्टीचा मेंदू (Brain) बंद झाल्यामुळे तिला पुढील उपचारासाठी अकोला येथे दाखल केले. मात्र 15 फेब्रुवारीला तिचा मृत्यू झाल्यामुळे गावात हळहळ व्यक्त केली जात आहे. पोलिओचा डोस घेण्याआधी श्रुष्टीची तबेत ठणठणीत होती.पोलिओचा डोस देण्याआधी चार इंजेक्शन दिले आणि नंतर पोलिओचा डोस दिल्यानंतर तिची तबेत बिघडली तिला वाचविण्यासाठी आम्ही प्रयत्न केले. मात्र तिचा उपचारादरम्यान मृत्यू झाला त्यामुळं वडील केशव आडे यांनी संबंधित नर्स आणि डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे मृत्यू झाला आहे, असा आरोप कुटुंबियांनी केला आहे. हा प्रकार संतापजनक असून,असा प्रकार कुणासोबत घडू नये म्हणून या विरोधात मुलीचे वडील केशव आडे यांनी मुलीच्या मृत्यूस जबाबदार धरत महिला नर्स आणि सहयोगी डॉक्टर विरुद्ध कठोर कारवाई करण्यात यावी अशी तक्रार संबंधित विभागाकडे केली आहे.

रुग्णालय प्रशासन काय सांगतं?

या संदर्भात डॉक्टरांना विचारले असता पोलिओचा डोस हा शासनाच्या नियमानुसार दिला जातो, श्रुष्टीला पोलिओचा डोस 8 तारखेला दिला. गावात तिच्यासोबत दुसऱ्याही मुलांना दिला मात्र दुसऱ्या मुलांना काहीच इन्फेक्शन झाले नाही. त्यामुळं हा मृत्यू पोलिओचा डोसमुळे झाला नसावा असे जिल्हा साथरोग व माता बालसंगोपन अधिकारी डॉ. मोबिन खान यांनी सांगितलय. त्यामुळे आता हे प्रकरण तापण्याची शक्यता आहे. मुलीच्या वडिलांची बाजू आणि डॉक्टरांची बाजू दोन्ही परस्परविरोधी आहेत.

कारवाईची कुटुंबियांची मागणी

पोलिओ सारखे आजार होऊन भविष्यात अपंगत्व येऊ नये यासाठी शासनाकडून दरवर्षी पोलिओचे दोन बुंद जिंदगीचे दिल्या जातात. मात्र नर्स आणि सहयोगी डॉक्टरच्या चुकीच्या पद्धतीने दिलेल्या पोलिओचा डोस मुळें दोन महिन्यांच्या चिमुकलीचा मृत्यु झाला आहे, असा आरोप कुटुंबियांकडून करण्यात येत आहे. आता आरोग्य विभाग चौकशी करून दोषींवर कारवाई करेल अशी अपेक्षा तीच्या कुटुंबियांकडून व्यक्त करण्यात येत आहे. मात्र दोन महिन्याच्या चिमुलीचा जीव गेल्याने परिसरात शोकाकूल वातावरण आहे.

झोपेतून जागे होताच मोबाईल वापरण्याची सवय? भविष्यात गंभीर आजारांना देताय निमंत्रण!

डायबिटीसआधी शरीरात दिसतात महत्त्वाची लक्षणं! ती लक्षणं ज्याकडे चुकूनही दुर्लक्ष नको

दमा रुग्णांसाठी ‘हे’ पदार्थ ठरतात धोकादायक, आजच बदला आपला डाएट

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.