AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Washim Accident : वाशिममध्ये कार व दुचाकीच्या अपघातात दोन जण जागीच ठार

हा भाग अतिशय दुर्गम असून रस्स्त्यावरील खड्डे आणि अरुंद पूल यामुळे या पूलाजवळ सतत अपघात होत असतात. आतापर्यंत अनेक अपघात येथे घडली असून अनेकांना या अपघातात प्राण गमवावे लागले आहे. रस्त्यांवरील खड्डे चुकवतानाच कार आणि दुचाकीची मंगळवारी धडक होऊन अपघात घडला.

Washim Accident : वाशिममध्ये कार व दुचाकीच्या अपघातात दोन जण जागीच ठार
वाशिममध्ये कार व दुचाकीच्या अपघातात दोन जण जागीच ठार
| Edited By: | Updated on: Mar 15, 2022 | 9:29 PM
Share

वाशिम : कार व दुचाकीच्या झालेल्या भीषण अपघाता (Accident)त दोन जण जागीच ठार झाल्याची घटना जिल्ह्यातील मुंबई-नागपूर या महामार्गावरील जऊळका रेल्वे जवळ असलेल्या पुलानजीक घडली आहे. मालेगावकडे दुचाकीने जात असलेल्या कळमगव्हाण येथील दोन मजुरांना मालेगावकडून येणाऱ्या कारने काटेपूर्णा नदीच्या पुलासमोर जोरदार धडक दिल्यानं दुचाकीवरील दोन मजूर जागीच ठार (Shot Death) झाले आहेत. अपघाताची माहिती जऊळका पोलिसांना मिळताच त्यांनी अपघातस्थळी धाव घेऊन ॲम्बुलन्सद्वारे सदर अपघातातील मृत व्यक्तींना मालेगाव येथील ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनकरीता पाठविले. (Two people were killed on the spot in a car and two-wheeler accident in Washim)

रस्त्यांवरील खड्डे आणि अरुंद पूल यामुळे अपघात

सदर महामार्गावरील काटेपूर्णा नदीवरील पूल हा अपघात प्रवण स्थळ झाला असून संबंधित विभागाकडे नवीन पुलाची निर्मिती करण्याची मागणी होत आहे. हा भाग अतिशय दुर्गम असून रस्स्त्यावरील खड्डे आणि अरुंद पूल यामुळे या पूलाजवळ सतत अपघात होत असतात. आतापर्यंत अनेक अपघात येथे घडली असून अनेकांना या अपघातात प्राण गमवावे लागले आहे. रस्त्यांवरील खड्डे चुकवतानाच कार आणि दुचाकीची मंगळवारी धडक होऊन अपघात घडला.

नांदेडमध्ये कार-जीपच्या धडकेत पाच जखमी

कार आणि जीपच्या धडकेत पाच जण जखमी झाल्याची घटना अर्धापुर शहराजवळ घडली. बोलेरो जीप आणि कारची समोरासमोर धडक होऊन हा अपघात झाला. महामार्ग पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत यातील जखमींना रुग्णालयात हलवलं. या अपघातात कारमध्ये प्रवास करणारे तेलंगणा राज्यातील आदीलाबादचे पाच जण जखमी झाले आहेत. सुदैवाने यात कुठलीही जीवितहानी झाली नाही. (Two people were killed on the spot in a car and two-wheeler accident in Washim)

इतर बातम्या

खळबळजनक! बीड एसटी डेपोत गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळला वृद्ध व्यक्तीचा मृतदेह

HSC Paper Leak : पेपर फुटी प्रकरणात खाजगी शिक्षकांचं मोठं जाळं असण्याची शक्यता : सूत्र

नागपूर मनपा निवडणुकीत भाजप-राष्ट्रवादीत चढाओढ!
नागपूर मनपा निवडणुकीत भाजप-राष्ट्रवादीत चढाओढ!.
अटक वॉरंट पोलिसांच्या हाती! माणिकराव कोकाटेंना कधी होणार अटक?
अटक वॉरंट पोलिसांच्या हाती! माणिकराव कोकाटेंना कधी होणार अटक?.
कोकाटे प्रकरणी दानवेंची सरकारवर घटनेचा अनादर केल्याची टीका!
कोकाटे प्रकरणी दानवेंची सरकारवर घटनेचा अनादर केल्याची टीका!.
कोकाटेंना जामीन मिळवण्यासाठी आता कायदेशीर लढाई, वकिलांकडून मोठी अपडेट
कोकाटेंना जामीन मिळवण्यासाठी आता कायदेशीर लढाई, वकिलांकडून मोठी अपडेट.
कराड जामीन प्रकरणाच्या सुनावणीत काय-काय घडलं? वकिलांनी सारं सांगितलं
कराड जामीन प्रकरणाच्या सुनावणीत काय-काय घडलं? वकिलांनी सारं सांगितलं.
कोकाटेंना कोणत्याही क्षणी अटक, आमदारकी जाणार, कोणत्या प्रकरणी शिक्षा?
कोकाटेंना कोणत्याही क्षणी अटक, आमदारकी जाणार, कोणत्या प्रकरणी शिक्षा?.
माणिकराव कोकाटे यांच्या विरोधात अटक वॉरंट जारी, विरोधकांची मागणी काय?
माणिकराव कोकाटे यांच्या विरोधात अटक वॉरंट जारी, विरोधकांची मागणी काय?.
मुंडेंची दिल्लीवारी, शहांची भेट, कोकाटेंच्या प्रकरणानंतर पुन्हा संधी?
मुंडेंची दिल्लीवारी, शहांची भेट, कोकाटेंच्या प्रकरणानंतर पुन्हा संधी?.
सना मलिकांकडून वडील मलिकांची पाठराखण, NCP महायुतीत सामील होणार की..?
सना मलिकांकडून वडील मलिकांची पाठराखण, NCP महायुतीत सामील होणार की..?.
अजितदादांचा मुंबईत मोठा डाव, थेट सना मलिक यांच्या नेतृत्त्वात लढवणार?
अजितदादांचा मुंबईत मोठा डाव, थेट सना मलिक यांच्या नेतृत्त्वात लढवणार?.