Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

काय सांगता… ‘या’ जिल्हा परिषद शाळेत प्रवेशासाठी 500 विद्यार्थी प्रतीक्षेत; काय आहे खास? जाणून घ्या..

जिल्हा परिषदेच्या शाळेबाबत दुर्लक्ष होत असतानाच साखरा येथील जिल्हा परिषद शाळेत प्रवेशासाठी मात्र विद्यार्थ्यांच्या रांगाच रांग लागत आहेत.

काय सांगता… ‘या’ जिल्हा परिषद शाळेत प्रवेशासाठी 500 विद्यार्थी प्रतीक्षेत; काय आहे खास? जाणून घ्या..
Follow us
| Updated on: Jun 18, 2023 | 8:57 PM

वाशीम : सध्या आपल्या पाल्यांना उच्च दर्जाचे शिक्षण मिळावे यासाठी पालक आग्रही असतात. त्यामुळे सरकारी शाळेतून प्रवेश न घेता. अनेक पालक खासगा शाळांकडे वळत असतात. भरमसाठ फी भरूनही अनेक वेळा मुलांना प्रवेश मिळत नाही अशी परिस्थिता खासगी शाळेंची परिस्थिती आहे. एकीकडे ही परिस्थिती असतानाच आता सरकारी म्हणजेच जिल्हा परिषदेच्या शाळेत प्रवेश घेण्यासाठी अनेक विद्यार्थी आता प्रतीक्षेत असल्याचे चित्र महाराष्ट्रात दिसून येत आहे. जिल्हा परिषदेच्या शाळांबाबत सरकार पटसंख्या नसेल तर शाळा बंद करण्याच्या निर्णयावर असतानाच आता जिल्हा परिषदेतील शाळेत प्रवेश मिळावा यासाठी आता अनेक विद्यार्थी प्रयत्न करत आहेत.

शाळेसाठी शिक्षकांची मेहनत आणि ग्रामस्थांच्या सहकार्यातून स्वर्गीय अटल बिहारी वाजपेयी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे रुपडे बदलले असल्याने आता प्रवेशासाठी विद्यार्थ्यांनी रांगाच रांगा लावल्या आहेत.

विद्यार्थ्यांच्या लांबच लांब रांगा

वाशिम जिल्ह्यातील साखरा येथील शाळेसाठी 850 विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला आहे. तर जवळपास 500 विद्यार्थी शाळेत प्रवेश घेण्यासाठी प्रतीक्षेत असल्याचे दिसून येत आहेत. या शाळेसाठी विद्यार्थ्यांनी लांबच लांब रांगा लावल्याने आता जिल्हा परिषदेच्या शाळेसाठी ही आनंदाची गोष्ट असल्याचे मत व्यक्त केले जात आहे.

अनेक पालक आता प्रयत्नशील

वाशिम जिल्ह्यातील साखरा येथील जिल्हा परिषद शाळा जवळपास 35 एकरमध्ये विस्तारीत आहे. तर गावाची लोकसंख्या एक हजार आहे. या ठिकाणी शाळेची इमारत दर्जेदार व सुसज्ज अशी इमारत आहे. या शाळेत शिक्षकांची संख्या 18 असून या शाळेत प्रवेश मिळावा यासाठी अनेक पालक आता प्रयत्नशील असल्याचे दिसून येत आहे.

गुणवत्तेचा आलेख वाढता

जिल्हा परिषदेच्या शाळांबाबत अनास्था असतानाच ही शाळा मात्र आंतरराष्ट्रीय पातळीवर पोहोचली आहे. शाळेतील विद्यार्थ्यांसाठी येथील शिक्षक प्रचंड मेहनत घेत असतात. त्यांच्या या प्रयत्नांना आता ग्रामस्थांचीदेखील मदत मिळत आहे. शिक्षकांच्या प्रयत्नामुळे शाळेतील विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेचा आलेख वाढत आहे.

सरकारी निधीही भरभक्कम

विद्यार्थ्यांना अधिक दर्जेदार शिक्षण मिळावे, यासाठी जिल्हाधिकारी यांच्याकडून इमारत बांधकाम करण्यासाठी अडीच कोटी रुपये तर पाण्यासाठी तीस लाख तर शाळेत जाण्यासाठी मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेअंतर्गत चार कोटी रुपयांचा निधी वितरीत करण्यात आला आहे.

शाळेसाठी आनंदाची गोष्ट

जिल्हा परिषदेच्या शाळेबाबत दुर्लक्ष होत असतानाच साखरा येथील जिल्हा परिषद शाळेत प्रवेशासाठी मात्र विद्यार्थ्यांच्या रांगाच रांग लागत आहेत. तर अजूनही पाचशे विद्यार्थी प्रवेशासाठी प्रतीक्षेत असून येथे प्रवेश मिळावा यासाठी वाशीम शहरासह परिसरातील वीस ते पंचवीस गावांतील विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. जिल्हा परिषदेच्या शाळेच्या प्रवेशासाठी ही गोष्ट घडत असल्याने शिक्षकांसह पालकवर्गातून समाधान व्यक्त केले जात आहे.

कुंपणानेच शेत खाल्ले, दहावी मराठीचा पेपर केंद्र संचालकानेच फोडला?
कुंपणानेच शेत खाल्ले, दहावी मराठीचा पेपर केंद्र संचालकानेच फोडला?.
तारकर्ली बिचवर मोठी दुर्घटना, 5 पर्यटक बुडाले, दोघांचा मृत्यू
तारकर्ली बिचवर मोठी दुर्घटना, 5 पर्यटक बुडाले, दोघांचा मृत्यू.
'मोदींना पवार यांच्या बाजूला कसे..., ' काय म्हणाले संजय राऊत
'मोदींना पवार यांच्या बाजूला कसे..., ' काय म्हणाले संजय राऊत.
तुळजा भवानी मातेच्या मूर्तीची जागा हलविणार ? काय आहेत घडामोडी
तुळजा भवानी मातेच्या मूर्तीची जागा हलविणार ? काय आहेत घडामोडी.
धनंजय मुंडेंना कोण वाचवतंय? अंजली दमानिया यांचा थेट आरोप काय?
धनंजय मुंडेंना कोण वाचवतंय? अंजली दमानिया यांचा थेट आरोप काय?.
राज ठाकरे-उदय सामंतांच्या भेटीने भुवया उंचावल्या, मनसे नेते म्हणाले..
राज ठाकरे-उदय सामंतांच्या भेटीने भुवया उंचावल्या, मनसे नेते म्हणाले...
पुलाचं काम करून थकलेल्या मजुरांवर झोपेतच काळाचा घाला, 5 ठार
पुलाचं काम करून थकलेल्या मजुरांवर झोपेतच काळाचा घाला, 5 ठार.
सुरेश धस मस्साजोगमध्ये, देशमुख कुटुंबियंची भेट घेतल्यानंतर म्हणाले...
सुरेश धस मस्साजोगमध्ये, देशमुख कुटुंबियंची भेट घेतल्यानंतर म्हणाले....
अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन, पंतप्रधान नरेंद्र मोदींचे UNCUT भाषण
अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन, पंतप्रधान नरेंद्र मोदींचे UNCUT भाषण.
पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून मराठी भाषेचे कौतुक, म्हणाले "मी बोलण्याचा
पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून मराठी भाषेचे कौतुक, म्हणाले