AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Weather Forecast : कोकण, मध्य महाराष्ट्रात 29,30 तारखेला मेघगर्जनेसह पावसाची शक्यता, IMD कडून यलो अलर्ट जारी

कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील काही भागात सोमवारी आणि मंगळवारी मेघगर्जनेसह पाऊस होण्याची शक्यता आहे. राज्यातील काही भागात जोरदार वारे वाहण्याची शक्यता देखील वर्तवण्यात आलीय.

Weather Forecast : कोकण, मध्य महाराष्ट्रात 29,30 तारखेला मेघगर्जनेसह पावसाची शक्यता, IMD कडून यलो अलर्ट जारी
Weather Forecast
Follow us
| Updated on: Nov 26, 2021 | 3:07 PM

मुंबई: राज्यात कोकण गोवा, मध्य महाराष्ट्र आणि दक्षिण महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये सोमवारी आणि मंगळवारी मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता आहे. कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील काही भागात मेघगर्जनेसह पाऊस होण्याची शक्यता आहे. राज्यातील काही भागात जोरदार वारे वाहण्याची शक्यता देखील वर्तवण्यात आली. ज्येष्ट हवामान तज्ज्ञ के. एस. होसाळीकर यांनी या संदर्भातील ट्विट केलं आहे.

विविध जिल्ह्यांना यलो अ‌ॅलर्ट जारी

हवामान विभागानं सोमवारी 29 नोव्हेंबरसाठी रायगड, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांना यलो अ‌ॅलर्ट जारी केला आहे. तर, 30 नोव्हेंबरसाठी ठाणे, मुंबई, रायगड, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग, नाशिक आण अहमदगर जिल्ह्यांना यलो अ‌ॅलर्ट जारी केला आहे. तर, सोमवारी यलो अ‌ॅलर्ट देण्यात आला नसला तरी ठाणे, मुंबई आणि सोलापूर जिल्ह्यात पाऊस होण्याची शक्यता आहे. तर दुसरीकडे मंगळवारी सोलापूर, औरंगाबाद आणि पालघर जिल्ह्यात देखील पाऊस होईल, अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे.

राज्यातील तापमान वाढलं, थंडी गायब

अंदमानच्या समुद्रात गेल्या आठवडय़ात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होऊन त्याचा परिणाम राज्याच्या हवामानावर झाला. सर्वत्र किमान तापमानात वाढ होऊन हलकी थंडी गायब झाली आणि आकाश अंशत: ढगाळ झाले आहे. या काळात कोकणात काही भागांत पाऊस झाला. त्यानंतर बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले. त्यामुळे पावसाळी स्थिती दूर झाली नाही.

मुंबईतही पाऊस

भारतीय हवामान विभागानं जारी केलेल्या माहितीनुसार 29 नोव्हेंबर आणि 30 नोव्हेंबरला मुंबईत पाऊस होण्याची शक्यता वर्तवली आहे. 30 नोव्हेंबरला मुंबईला यलो अ‌ॅलर्ट दिला आहे.

इतर बातम्या:

Weather Forecast imd rains predicted unseasonal rain on 29 and 30 Nobember at kokan and central Maharashtra

ऑपरेश सिंदूरदरम्यान पाकला चकवा, डमी फाइटर जेट धाडून भारताचा माइंड गेम
ऑपरेश सिंदूरदरम्यान पाकला चकवा, डमी फाइटर जेट धाडून भारताचा माइंड गेम.
पाकची आणखी कोंडी, भारताची तालिबानशी हातमिळवणी, तहानलेला पाक व्याकूळच
पाकची आणखी कोंडी, भारताची तालिबानशी हातमिळवणी, तहानलेला पाक व्याकूळच.
'राऊत उलट्या पायाचे बांडगुळ, शरद पवारांच्या घरात भांडी घासण्याचं...'
'राऊत उलट्या पायाचे बांडगुळ, शरद पवारांच्या घरात भांडी घासण्याचं...'.
...म्हणून तेव्हा मोदींची अटक टळली, राऊतांचे खळबळजनक गौप्यस्फोट
...म्हणून तेव्हा मोदींची अटक टळली, राऊतांचे खळबळजनक गौप्यस्फोट.
भारताविरोधातील चीनच्या कुरापती अन् गुन्ह्यांचे 10 पुरावे समोर
भारताविरोधातील चीनच्या कुरापती अन् गुन्ह्यांचे 10 पुरावे समोर.
मुरिदकेच्या मरकजवर भारताचा हल्ला अन् पाक पत्रकाराचं रिपोर्टिंग व्हायरल
मुरिदकेच्या मरकजवर भारताचा हल्ला अन् पाक पत्रकाराचं रिपोर्टिंग व्हायरल.
भारतीय पर्यटकांनी टाकला तुर्कीवर बहिष्कार; सगळ्या सहली रद्द
भारतीय पर्यटकांनी टाकला तुर्कीवर बहिष्कार; सगळ्या सहली रद्द.
बीएसएफने पाकिस्तानचं ऑब्जर्वेशन टॉवर उद्ध्वस्त केलं
बीएसएफने पाकिस्तानचं ऑब्जर्वेशन टॉवर उद्ध्वस्त केलं.
तुलबुल प्रकल्प सुरू करण्याची ओमर अब्दुल्ला यांची मागणी
तुलबुल प्रकल्प सुरू करण्याची ओमर अब्दुल्ला यांची मागणी.
नरकातला राऊत... 'त्या' पुस्तकासंदर्भात बावनकुळे राऊतांना पत्र लिहीणार
नरकातला राऊत... 'त्या' पुस्तकासंदर्भात बावनकुळे राऊतांना पत्र लिहीणार.