AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Weather Report : पुण्यात सर्वात कमी तापमानाची नोंद तर मुंबईतून थंडी गायब, हवामान विभागानं सांगितलं कारण

राज्यात नोव्हेंबर आणि डिसेंबरच्या सुरुवातीच्या आठवड्यात सुरु असलेल्या अवकाळी पावसानं विश्रांती घेतल्यानंतर मिश्र हवामान पाहायला मिळत आहे. मुंबईतील (Mumbai) थंडी गायब झाली आहे.

Weather Report : पुण्यात सर्वात कमी तापमानाची नोंद तर मुंबईतून थंडी गायब, हवामान विभागानं सांगितलं कारण
weather update
Follow us
| Updated on: Dec 13, 2021 | 8:57 AM

मुंबई : राज्यात नोव्हेंबर आणि डिसेंबरच्या सुरुवातीच्या आठवड्यात सुरु असलेल्या अवकाळी पावसानं विश्रांती घेतल्यानंतर मिश्र हवामान पाहायला मिळत आहे. मुंबईतील (Mumbai) थंडी गायब झाली आहे. तर, अंशत: ढगाळ स्थिती पाहायला मिळत आहे. दुसरीकडे पुण्यात (Pune ) रविवारी राज्यातील सर्वात कमी तापमानाची नोंद झाली आहे. पुण्यात पुढील तीन दिवसात धुके पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

मुंबईतील थंडी गायब

मुंबईतील थंडी गायब झाली असून तापमानात वाढ झाल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. उत्तरेकडील थंड वाऱ्यांचे प्रवाह थेट राज्याकडे येत नसल्याने कडाक्याच्या थंडीतील विघ्न कायम आहेत. रात्री हवेत काही प्रमाणात गारवा असला, तरी राज्यात सर्वच ठिकाणी किमान तापमान अद्यापही सरासरीच्या पुढेच असल्याने डिसेंबरमध्ये या कालावधीत अपेक्षित असलेली थंडी जाणवत नाही.

राज्यातील थंडी गायब

पुढील तीन ते चार दिवस तापमानात फार मोठ्या प्रमाणात बदल होणार नसल्याचे हवामान विभागाने स्पष्ट केले. डिसेंबरच्या सुरुवातीपासून थंडीचा कडाका वाढण्याची शक्यता असताना अरबी समुद्रातील कमी दाबाच्या क्षेत्रामुळे राज्यात पावसाळी वातावरण निर्माण झाले आणि रात्रीची थंडी गायब झाली.

पुण्यात रविवारी  कमी तापमानाची नोंद

राज्यातील सर्वात कमी तापमानाची नोंद रविवारी पुण्यात झाली. शहरात 14.1 अंश सेल्सिअस इतके किमान तापमान तर 28.6 अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झालेली आहे. पुढील तीन दिवस शहरात अंशतः ढगाळ वातावरणाची आणि धुके पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.

इतर बातम्या:

Weather Forecast : कोकणासह मध्य महाराष्ट्रात हलका पाऊस, पावसाळी वातावरण कधी संपणार? आयएमडीनं दिली माहिती

संरक्षण दलात सैन्य अधिकारी व्हायचंय, महाराष्ट्र शासनाची संस्था देतेय सेवापूर्व तयारी प्रशिक्षण, अर्ज करण्याचं आवाहन

Weather Forecast lowest temperature recorded in pune and Mumbai temperature increased

पाकिस्तानला भारताचा आणखी एक दणका!
पाकिस्तानला भारताचा आणखी एक दणका!.
5 तारखेला लग्न झालं अन् फोन आला, हळदीच्या अंगाने जवान सीमेवर परतला
5 तारखेला लग्न झालं अन् फोन आला, हळदीच्या अंगाने जवान सीमेवर परतला.
टेररीस्ट अ‍ॅक्टिव्हिटीसाठी धार्मिक स्थळांचा आसरा - विक्रम मिस्री
टेररीस्ट अ‍ॅक्टिव्हिटीसाठी धार्मिक स्थळांचा आसरा - विक्रम मिस्री.
दहशतवाद्यांचे अड्डे हेच आमचं टार्गेट,विक्रम मिस्रींनी स्पष्टच सांगितलं
दहशतवाद्यांचे अड्डे हेच आमचं टार्गेट,विक्रम मिस्रींनी स्पष्टच सांगितलं.
ड्रोन, मिसाईलला हवेतच निकामी केलं - कर्नल सोफिया कुरेशी
ड्रोन, मिसाईलला हवेतच निकामी केलं - कर्नल सोफिया कुरेशी.
एअर स्ट्राईकनंतर आता वॉटर स्ट्राईक! बगलिहार, सलाल धरणाचे दरवाजे उघडले
एअर स्ट्राईकनंतर आता वॉटर स्ट्राईक! बगलिहार, सलाल धरणाचे दरवाजे उघडले.
पाकिस्तानला धुळीत लोळवणारं एस-400 सिस्टिम काय आहे?
पाकिस्तानला धुळीत लोळवणारं एस-400 सिस्टिम काय आहे?.
हार्पी ड्रोनची ताकद अन् पाक उद्ध्वस्त, भारताकडून करारा जवाब, घडतंय काय
हार्पी ड्रोनची ताकद अन् पाक उद्ध्वस्त, भारताकडून करारा जवाब, घडतंय काय.
भारताकडून पहिल्यांदा S-400 सिस्टिमचा वापर
भारताकडून पहिल्यांदा S-400 सिस्टिमचा वापर.
बलुच नागरिकांचं टोकाचं पाऊल, पाकविरोधात बंडाचं हत्यार; कारण काय?
बलुच नागरिकांचं टोकाचं पाऊल, पाकविरोधात बंडाचं हत्यार; कारण काय?.