Weather Forecast | मुंबई, कोकण, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाड्यात वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता, पुढचे 3-4 तास महत्त्वाचे !
हवामान खात्याने दिलेल्या ताज्या माहितीनुसार आता येत्या तीन ते चार तासांत पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, पुणे, सातारा, रत्नागिरी, बीड आणि परभणी जिल्ह्यांतील काही ठिकाणी पावसाची शक्यता आहे. तसा अंदाज मुंबई येथील प्रादेशिक हवामान केंद्राने व्यक्त केलाय.
मुंबई : मागील काही दिवसांपासून राज्यातील हवामानामध्ये अचानकपणे बदल झाला आहे. अरबी तसेच बंगलाच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यामुळे अनेक ठिकाणी पाऊस बरसलाय. हवामान खात्याने दिलेल्या ताज्या माहितीनुसार आता येत्या तीन ते चार तासांत पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, पुणे, सातारा, रत्नागिरी, बीड आणि परभणी जिल्ह्यांतील काही ठिकाणी पावसाची शक्यता आहे. तसा अंदाज मुंबई येथील प्रादेशिक हवामान केंद्राने व्यक्त केलाय.
हवामान खात्याने नेमकं काय सांगितलंय ?
पुढील 3 ते 4 तांसात पालघर, ठाणे, मुंबई, पुणे, सातारा, रत्नागिरी, बीड, परभणी या जिल्ह्यांत काही ठिकाणी पाऊस बरसण्याची शक्यता आहे. काही ठिकाणी वादळवारा, विजांचा कडकटडासह पाऊस हजेरी लावू शकतो, असं हवामान खात्याने सांगितलं आहे.
Thunderstorm accompanied with lightning, gusty winds & moderate to intense spells of rain very likely at isolated places in the districts of Palghar, Thane,Mumbai Raigad, Pune,Satara, Ratnagiri, Beed and Parbhani during next 3-4 hours. pic.twitter.com/WNstvilVHN
— Regional Meteorological Center,Mumbai (@RMC_Mumbai) November 18, 2021
अरबी समुद्र तसेच बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा
मागील काही दिवसांपासून राज्यातील हवामानामध्ये मोठा बदल झाला आहे. सामान्यत: दिवाळीनंतर नोव्हेंबर, डिसेंबर महिन्यात मोठ्या प्रमाणात थंडी जाणवते. मात्र मागील काही दिवसांपासून अरबी समुद्र तसेच बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे. त्याचा परिणाम राज्यातील हवामानावर पाहायला मिळतोय. राज्यात अनेक भागात थंडीची तीव्रता कमी झाली आहे. तर कमी दाबाच्या पट्ट्यामुळे राज्यातील अनेक भागात पाऊस बरसलाय.
राज्यात कोणत्या ठिकाणी पावसाची नोंद
गेल्या दोन ते तीन दिवसांमध्ये अनेक जिल्ह्यांत पावसाची नोंद करण्यात आली. रत्नागिरीमध्ये 38 मिमी, वेंगुर्ला, नांदेड, सातारा, कोल्हापूर, बारामती, पुणे, सांगलीमध्ये पावसानं हजेरी लावली. वाशिमच्या मंगरुळपीर शहरासह ग्रामीण भागात काही ठिकाणी अवकाळी पाऊस बरसला.
इतर बातम्या :
मुस्लिम आरक्षणासाठी समाजानं रस्त्यावर उतरावं का? औरंगाबादमध्ये ओवेसींचे सरकारला 5 सवाल